अभोणा (जि. नाशिक) : ‘रस्ता दुरुस्तीसाठी सापडेना मुहूर्त’ या मथळ्याखाली ‘सकाळ’ने शुक्रवारी (ता. ४) वृत्त प्रसिद्ध केले. सोशल मीडियावरही हे वृत्त व्हायरल होऊन, नागरिकांनीही प्रतिसाद दिला. संबंधित विभागाने या वृत्ताची दखल घेऊन, रस्त्याच्या डांबरीकरणाचे काम तत्काळ सुरू केले आहे. (SAKAL Impact repair of Abhona road started after sakal follow up nashik news)
पश्चिम पट्ट्यातीलच नव्हेतर, इतर तालुक्यातही या वृत्ताची दखल घेऊन विविध विभागांनी कामाचा धडाका सुरू केल्याचे चित्र आहे. अतिवृष्टीमुळे सदर कामांना विलंब झाला. वाहतुकीस अडथळा नको म्हणून, मुरूम टाकून तात्पुरत्या स्वरूपात बुजण्याचे काम झाले होते. मात्र पावसाळा संपला तरी पक्क्या दुरुस्तीच्या कामाला सुरवात झाली नव्हती.
‘सकाळ’ने ‘रस्ते दुरुस्तीसाठी सापडेना मुहूर्त’ असे वृत्त प्रसिद्ध करताच दुरुस्तीच्या कामाला गती आली. वाहनचालकांना व स्थानिकांना मोठा दिलासा मिळाला आहे. त्याबद्दल सोशल मीडियावर तसेच स्थानिक नागरिक व वाहनचालकांनी समाधान व्यक्त केले आहे.
"खराब रस्त्यांमुळे नागरिकांना प्रचंड त्रास झाला. ‘सकाळ’ने नेहमीच ग्रामीण भागातील विविध समस्यांना वाचा फोडली आहे. खराब रस्त्यांच्या वृत्तामुळे डांबरीकरणाच्या कामाला गती मिळाली. संबंधित विभागाने कायमस्वरूपी पक्क्या रस्त्याचे काम केल्यास, वारंवार दुरुस्तीची वेळ येणार नाही." -प्रवीण जाधव, श्रीकृष्ण नगर, अभोणा
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.