SAKAL NIE: चला, बालमित्रांनो किल्ले बनवूया...! यशवंतराव चव्हाण सेंटर, मयूर अलंकार, पवार बुक डेपो प्रायोजक

Sakal NIE
Sakal NIESakal
Updated on

SAKAL NIE : शिवछत्रपतींच्या कर्तृत्वाचे पोवाडे गात अवघ्या महाराष्ट्रात आजही किल्ले उभे आहेत. प्रत्येक किल्ल्याचा इतिहास वैशिष्ट्यपूर्ण तर आहेच, शिवाय तो सुवर्णाक्षरांनी सजलेला आहे. (SAKAL NIE kids forts making workshop Sponsored by Yashwantrao Chavan Centre Mayur Alankar Pawar Book Depot nashik)

किल्ल्यावरील वास्तू तटबंदी, नगारखाना, राजदरबार, जलव्यवस्थापन हा नेहमीच मराठी माणसाच्या कुतूहलाचा विषय राहिला आहे. या किल्ल्याबद्दल आजही मराठी मनात मोठा आदर आणि अभिमानही आहे.

या किल्ल्यासारखे छोटे- छोटे मातीचे किल्ले साकारले जावेत आणि नव्या पिढीला महाराष्ट्रातील शौर्याचा इतिहास कळावा, या उद्देशाने ‘सकाळ एनआयई’, यशवंतराव चव्हाण सेंटर जिल्हा केंद्र, नाशिकची प्रसिद्ध सराफ पतपेढी मयूर अलंकार यांच्यातर्फे रविवारी (ता. ५) किल्ला बनवा कार्यशाळा होणार आहे.

दिवाळीनिमित्त सर्वच शाळांना लवकरच सुट्टी लागणार आहे. दिवाळीची सुटी आणि मुलांनी बनवलेले किल्ले यांचे फार पूर्वीपासून अनोखे नाते आहे.

किल्ल्याची सुंदर प्रतिकृती साकारण्यासाठी ‘सकाळ एनआयई’ आणि यशवंतराव चव्हाण सेंटर जिल्हा केंद्र, नाशिकची प्रसिद्ध सराफ पतपेढी मयूर अलंकार यांच्या सहकार्याने तिसरी ते नववीच्या विद्यार्थ्यांसाठी रविवारी किल्ला बनवण्याची कार्यशाळा होणार आहे.

गंगापूर रोडवरील अभिनव बाल विकास मंदिर, केटीएचएम कॉलेजशेजारी येथे सकाळी साडेनऊ ते दुपारी बारा या वेळेत ही कार्यशाळा होईल. कार्यक्रमाच्या ठिकाणी मुलांसाठी माती व पाण्याची व्यवस्था केली आहे.

Sakal NIE
Sakal NIE : वडिलांच्या स्मरणार्थ वर्षभर ‘सकाळ एनआयई’; केंद्रप्रमुख किशोर रायते यांच्याकडून शाळांना पन्नास अंक भेट

किल्ला सजविण्यासाठी मावळे, प्राणी, पक्षी झेंडा स्वतः आणायचे आहे. विद्यार्थ्यांच्या कलागुणांना वाव मिळावा, हा यामागील उद्देश आहे.

सहभागासाठी नोंदणी आवश्‍यक

‘सकाळ एनआयई’ सभासदांना मोफत प्रवेश असून, इतर विद्यार्थ्यांना ५० रुपये शुल्क आहे. सहभागी विद्यार्थ्यांना प्रमाणपत्र मिळेल, तसेच एमजी रोड येथील पवार बुक डेपोचे संचालक अतुल पवार यांच्यातर्फे सहभागी विद्यार्थ्यांना रायटिंग एक्झाम पॅड मिळेल.

त्याचबरोबर यशवंतराव चव्हाण सेंटरतर्फे सह्याद्रीचा सुपुत्र हे पुस्तक सहभागी विद्यार्थ्यांना मिळणार आहे. या कार्यशाळेसाठी गोकुळ इन्फ्रास्ट्रक्चरचे संचालक कैलास पाटील यांचे सहकार्य लाभले आहे.

सहभागासाठी नोंदणी आवश्यक आहे. अधिक माहिती व सहभागासाठी ‘सकाळ एनआयई’ प्रतिनिधी मनोहर शिंदे (९६०४८२८६७२) यांच्याशी संपर्क साधावा.

Sakal NIE
Sakal NIE : मोबाईलमधून मुलांना बाहेर काढण्यासाठी ‘एनआयई’

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.