SAKAL Pudhcha Paul : कुटुंब ते करिअर आणि फायनान्स ते फिटनेसमध्ये येणाऱ्या सर्व आव्हानांना सामोरे जाण्यासाठी लागणारा आत्मविश्वास देण्यासाठी, त्यांच्यासाठी नाजूक ठरणाऱ्या प्रश्नांची उत्तरे देण्यासाठी सकाळ वृत्त समूह आणि कॅनेस्टेन यांच्या संयुक्त विद्यमाने नाशिकमध्ये घेऊन येत आहे ‘पुढचं पाऊल’.
शनिवारी (ता. ६) सकाळी साडेदहाला येथील गंगापूर रोडवरील रावसाहेब थोरात सभागृहात कर्तबगार महिलांशी संवादाची संधी उपलब्ध होत आहे. सोबत गप्पा, खेळ, बक्षीसे, तज्ज्ञ डॉक्टरांशी चर्चा, लकी ड्रॉ असे बरेच काही असेल. (SAKAL Pudhcha Paul opportunity to interact with accomplished women Saturday program for women nashik news)
चित्रकार, शिक्षण-सामाजिक क्षेत्रातील कार्यरत डॉ. शेफाली भुजबळ, सहकार भारतीच्या प्रदेशाध्यक्षा आणि नाशिक जिल्हा महिला सहकारी बँकेच्या अध्यक्षा डॉ. शशीताई अहिरे, लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या अधीक्षक शर्मिष्ठा वालावलकर,
संदीप फाउंडेशनच्या डॉ. सारिका पाटील, वॉव ग्रुपच्या अश्विनी न्याहारकर या कर्तबगार महिला उपस्थित राहणार आहेत. त्यांच्यासोबत दिलखुलास गप्पा मारतानाच त्यांचा जीवन प्रवासही समजून घेता येईल. महिलांसाठी प्रवेश विनामूल्य असेल. अल्पोपहाराची सोय करण्यात येईल.
एक स्त्री आपल्या कुटुंबाच्या सुखासाठी अनेक त्याग करते. हे गेली कित्येक शतके सुरु आहे. पण, आजच्या काळात महिलांनी स्वतःला खूप सक्षम केले आहे.
सगळ्या अडचणींवर मात करत महिला सर्व क्षेत्रात पुरुषांच्या खांद्याला खांदा लावून काम करत आहेत. यासोबतच घर, कुटुंब, सामाजिक कार्य अशा अनेक जबाबदाऱ्या चांगल्या प्रकारे पार पाडत आहेत. हे रहस्य उलगडून सांगणार आहेत.
हेही वाचा : संतुलित आहारातून रोखा फॅटी लिव्हरचा आजार
कॅनेस्टेन पावडर हे बायर फार्मास्युटिकल प्रायव्हेट लिमिटेड या जगप्रसिद्ध फार्मास्युटिकल्स आणि बायोटेक्नॉलॉजी कंपनीचे उत्पादन बुरशीप्रतिबंधक (ॲन्टीफंगल) क्षेत्रात पहिल्या क्रमांकावर आहे. कार्यक्रमास उपस्थित राहणाऱ्या महिलांना त्यांचे ‘फ्री सॅम्पल' मिळणार आहे.
अधिक माहितीसाठी आणि सहभागासाठी तसेच नोंदणीसाठी ८५९१७३४५१० या व्हॉटस्ॲप क्रमांकावर संपर्क साधावा. त्वचा तज्ज्ञ डॉ. तेजा कुलकर्णी या महिलांना त्वचेच्या काळजीबद्दल मार्गदर्शन करणार आहेत. याशिवाय अनेक तज्ज्ञ मान्यवरांशी संवाद साधण्याची संधी येथे असेल.
कार्यक्रम खालीलप्रमाणे
० कधी-६ मे २०२३
० किती वाजता-सकाळी १०.३० वाजता
० स्थळ : रावसाहेब थोरात सभागृह, गंगापूर रोड, नाशिक
० इन्फोबॉक्स (दोन)
अन्य शहरातील कार्यक्रम
० ठाणे : १३ मे २०२३ रोजी दुपारी ४ वाजता
० स्थळ : कांती विसारीय हॉल, गावदेवी मैदानाजवळ, ठाणे.
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.