Sakal Pudhacha Paul : क्षमता ओळखत स्वतःला सिद्ध करा; कर्तबगार महिलांचा सल्‍ला

sakal pudhcha paul Prove yourself by realizing your potential Advice from successful women nashik news
sakal pudhcha paul Prove yourself by realizing your potential Advice from successful women nashik newsesakal
Updated on

Nashik News : कौटुंबिक प्रपंचात व्‍यस्‍त असताना घरातील महिलेने स्वतःकडे दुर्लक्ष करायला नको. आपल्‍यातील क्षमता ओळखून त्‍यानुसार क्षेत्राची निवड करत स्वतःला सिद्ध करा, असा सल्‍ला विविध क्षेत्रातील कर्तबगार महिलांनी दिला.

‘सकाळ माध्यम समूह’ आणि कॅनेस्‍टेन यांच्‍या संयुक्‍त विद्यमाने गंगापूर रोडवरील रावसाहेब थोरात सभागृहात झालेल्‍या ‘पुढचं पाऊल’ कार्यक्रमातून सहभागी महिलांना मार्गदर्शन केले. (sakal pudhcha paul Prove yourself by realizing your potential Advice from successful women nashik news)

या चर्चासत्रामध्ये लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्‍या पोलिस अधीक्षक शर्मिष्ठा वालावलकर, श्री सप्तश्रृंगी शिक्षण संस्‍थेच्‍या अध्यक्षा तथा भाजप महिला आघाडीच्‍या अध्यक्षा हिमगौरी आडके- आहेर, मेट भुजबळ नॉलेज सिटीच्‍या मुख्य प्रशासक डॉ. शेफाली भुजबळ, सहकार भारतीच्‍या प्रदेशाध्यक्षा आणि जिल्‍हा महिला सहकारी बँकेच्‍या अध्यक्षा डॉ. शशीताई अहिरे,

वॉव ग्रुपच्‍या अश्‍विनी न्‍याहारकर, संदीप फाउंडेशनच्‍या प्रा. डॉ. सारिका पाटील, यु- ट्यूब एज्‍युकेटर श्‍वेता सोनवणे- चव्‍हाण आदींनी सहभाग नोंदविला. या सत्राचे समन्‍वय परी ठोसर- जोशी यांनी केले. प्रश्‍नोत्तराच्‍या माध्यमातून विविध क्षेत्रातील या कर्तबगार महिलांनी आपल्‍या जीवनातील वाटचाल व संबंधित क्षेत्रात यशस्वितेसाठी मार्गदर्शन केले.

बोल कर्तबगार महिलांचे..

शर्मिष्ठा वालावलकर (अधीक्षक, लाचलुचपत प्रतिबंधक विभाग) : महिला या उपजतच धाडसी असतात. त्‍यांची स्वतःची किंमत ठेवल्‍यास, स्वतःवर प्रेम केल्‍यास, स्वतःचा आदर ठेवल्‍यास समाज, कुटुंबीयदेखीलही त्‍यांची किंमत करतील, त्‍यांचा आदर ठेवतील. पुरोगामी महाराष्ट्रात आज स्‍त्री-पुरुष असा फारसा भेद कुठल्‍याही क्षेत्रात राहिलेला नाही.

त्‍यातही समर्पण भावनेने स्वतःला झोकून देत काम केल्‍यास अधिकारी म्‍हणून सन्‍मानाची वागणूक मिळते, असा पोलिस खात्‍यातील माझा अनुभव राहिला आहे. महिला संवेदनशील असल्‍याने, त्‍या कुठल्‍याही समस्‍येवर प्रभावी उपाय शोधण्यात सक्षम असतात.

हिमगौरी आडके- आहेर (अध्यक्षा, भाजप महिला आघाडी)- प्रत्‍येक ठिकाणी स्‍पर्धा असली तरी पुरुषांप्रमाणे महिलांनाही आज समान संधी मिळू लागल्‍या आहेत. मिळालेल्‍या संधीचे सोने करताना इतरांसाठी आदर्श निर्माण करण्याचा प्रयत्‍न करण्याची आवश्‍यकता आहे.

हेही वाचा : संतुलित आहारातून रोखा फॅटी लिव्हरचा आजार

sakal pudhcha paul Prove yourself by realizing your potential Advice from successful women nashik news
Sinnar Unseasonal Rain : सिन्नरमध्ये अवकाळी पावसासह सोसाट्याचा वारा

शासकीय योजनांविषयी माहिती कोणीतरी आपल्‍यापर्यंत पोचवले, अशी अपेक्षा करायला नको. त्‍याऐवजी महिलांनी स्‍वयंस्‍फूर्तीने आपल्‍यासाठीच्‍या योजनांची माहिती करून घ्यावी. विविध क्षेत्रात यशस्‍वी होताना आपल्‍यासारख्या इतर महिलांना संबंधित क्षेत्रातील दार खुले करण्याचे आवाहन त्‍यांनी यावेळी केले.

डॉ. शेफाली भुजबळ (मुख्य प्रशासक, मेट भुजबळ नॉलेज सिटी) : कुठल्‍याही क्षेत्रात यशस्‍वी होण्यासाठी महिलांनी आपली इच्‍छाशक्‍ती जागृत ठेवली पाहिजे. शिक्षणाला, नवीन कौशल्‍ये आत्‍मसात करण्यासाठी वय, प्रसंग, कौटुंबिक जबाबदाऱ्या आदी अडथळे ठरु शकत नाही. पुढाकार घेताना महिला कुठल्‍याही क्षेत्रात नावलौकिक मिळवू शकतात. कौटुंबिक जबाबदाऱ्या सांभाळणाऱ्या महिलांनी आपल्‍या छंद, आवडी जोपासल्‍या पाहिजे.

डॉ. शशीताई अहिरे (प्रदेशाध्यक्षा, सहकार भारती) : महिला पदवी, पदव्‍युत्तर पदवी असे उच्चशिक्षण घेऊनही बहुतांश वेळा त्‍यांना व्‍यवहारी ज्ञान नसते. गृहिणीची जबाबदारी असली तरी आर्थिक साक्षर होत कुटुंबाचा आर्थिकस्‍तर उंचावण्यासाठी महिलांनी योगदान दिले पाहिजे. कौशल्याच्या जोरावर व्‍यवसाय उभारत सक्षमीकरणावर भर देणे आजच्‍या काळाची गरज आहे. महिला सक्षमीकरणासाठी केंद्र, राज्‍य शासनाच्‍या भरपूर योजना असून, याबाबत माहिती करून घेत, योजनांचा लाभ महिलांनी घेतला पाहिजे.

अश्‍विनी न्‍याहारकर (अध्यक्षा, वॉव ग्रुप) : किटी ग्रुपच्‍या माध्यमातून महिला- महिलांमध्ये स्‍पर्धा करण्याऐवजी या व्‍यासपीठाचा सामाजिक कामासाठी उपयोग करून घेतला. ग्रुपच्‍या माध्यमातून आवडी-निवडीनिहाय फोरम स्‍थापन करून प्रत्‍येकाला कौशल्‍ये सादर करण्याची संधी उपलब्‍ध करून दिली. समाजकारणात महिला चांगले योगदान देऊ शकतात, हे आम्‍ही अनेक उदाहरणांतून समाजासमोर मांडलेले आहे.

sakal pudhcha paul Prove yourself by realizing your potential Advice from successful women nashik news
NMC News : शहरात झोपडपट्ट्या झाल्या उदंड; महापालिकेचे दुर्लक्ष

प्रा. डॉ. सारिका पाटील (सहाय्यक प्राध्यापक, संदीप फाउंडेशन) : प्रत्‍येक व्‍यक्‍तीमध्ये क्षमता असतात. परंतु महिला स्वतःला प्राधान्‍य देत नसल्‍याने बहुतांश वेळा त्‍यांच्‍या क्षमता दुर्लक्षित राहून जातात.

आत्‍मविश्‍वास जागृत करताना महिलांनी विविध क्षेत्रात स्वतःला सिद्ध करायला हवे. परिवर्तन घडविण्यासाठी शिक्षण हे प्रभावी माध्यम आहे. नियमित शिक्षणातून केवळ पदवी मिळू शकते. यामुळे त्‍यापलीकडे जाऊन अतिरिक्‍त कौशल्‍ये आत्‍मसात करताना परिपूर्ण होण्याचा प्रयत्‍न केला पाहिजे.

श्‍वेता सोनवणे- चव्‍हाण (यु- ट्यूब एज्‍युकेटर) : सधन कुटुंबातून आलेली असताना स्‍वतःच्‍या पायावर उभे राहण्याचा प्रयत्‍न लग्‍नापूर्वी व आता लग्‍नानंतरही करताना त्‍यात यशस्‍वीदेखील झाले. प्रत्‍येकात काहीतरी कलागुण दडलेले असतात.

विशेषतः महिलांनी आपल्‍यातील गुणकौशल्‍यांच्‍या जोरावर युट्यूब व यांसारख्या व्‍यासपीठावर सादरीकरण करताना यशोशिखर गाठता येऊ शकते. आपण आयुष्यात काहीच करू शकलो नाही, अशी खंतमनात राहणार नाही, याची खबरदारी घेतली पाहिजे.

sakal pudhcha paul Prove yourself by realizing your potential Advice from successful women nashik news
NMC To PWD : सार्वजनिक बांधकाम विभागाकडून उड्डाणपुलासाठी टाळाटाळ; महापालिकेकडून सचिवांना स्मरणपत्र

योग्‍य काळजीतून त्‍वचेचे विकार ठेवा दूर : डॉ. कुलकर्णी

वेगवेगळ्या कारणांमुळे त्‍वचेच्या विविध विकारांमध्ये वाढ झालेली आहे. योग्‍य काळजी घेताना त्‍वचेच्या विकारांना दूर ठेवावे, असा सल्‍ला त्‍वचारोग तज्‍ज्ञ डॉ. तेजा कुलकर्णी यांनी दिला. विशेष सत्रातून त्‍यांनी सादरीकरण करताना त्‍वचेची निगा कशी राखावी, याबद्दल मार्गदर्शन केले. यावेळी डॉ. कुलकर्णी म्‍हणाल्‍या, की प्रत्‍येक व्‍यक्‍तीच्‍या त्वचेच्या प्रकारानुसार व ऋतुमानानुसार गरजा वेगवेगळ्या असतात.

त्‍यामुळे सरधोपट एकाच पद्धतीचा अवलंब चुकीचा ठरतो. केवळ ऊन, धुळ व प्रदूषणाचाच नव्‍हे तर वाढलेल्‍या स्‍क्रीन टाईममुळे यूव्ही किरणांचाही त्‍वचेवर गंभीर परिणाम होतो आहे. फंगल इन्‍फेक्‍शनचे रुग्‍ण आधी क्‍वचित सापडायचे.

परंतु आज घराघरांत हा आजार फोफावत आहे. संतुलित आहार, पुरेशी झोप, शरीराची स्‍वच्‍छता राखताना त्‍वचेच्‍या विकारांना दूर ठेवणे शक्‍य असते. तसेच काही त्रास जाणवल्‍यास मोघम उपचार करून घेण्याऐवजी तज्‍ज्ञांच्‍या मार्गदर्शनाखाली उपाययोजना करण्याचा सल्‍ला डॉ. कुलकर्णी यांनी दिला.

प्रत्‍येकात अभिनय कौशल्‍य दडलेले : मोनालिसा

इतर सामान्‍य मुलींप्रमाणे मीदेखील ‘सीए’ अभ्यासक्रमाचे शिक्षण घेत होते. यादरम्‍यान चित्रपटात अभिनयासाठी विचारणा झाली व सिनेक्षेत्रातील प्रवास अनाहूतपणे सुरु झाला. खर पाहिले तर प्रत्‍येक व्‍यक्‍ती हा हसतांना, बोलताना एकप्रकारे अभिनयच करत असतो. चित्रपटात काम करताना पात्र समजून घेत त्‍यांची भूमिका पार पाडायची असते.

sakal pudhcha paul Prove yourself by realizing your potential Advice from successful women nashik news
Kalaram Mandir Kirtan Mahotsav : श्री काळाराम संस्थानात मंत्रघोषात कीर्तन; 3 दिवस भरगच्च कार्यक्रम

प्रत्‍येकात अभिनय कौशल्‍ये दडलेले असतात, त्‍यांना व्‍यासपीठ देण्याची आवश्‍यकता असते, असे मत अभिनेत्री मोनालिसा बागल हिने व्‍यक्‍त केले. येत्‍या १२ मेस प्रदर्शित होत असलेल्‍या ‘रावरंभा’ चित्रपटाविषयी माहिती देताना ती म्‍हणाली, की लहानपणापासून छत्रपती शिवाजी महाराज यांच्‍याविषयी आदर असल्‍याने, आयुष्यात त्‍यांच्‍याशी निगडित काहीतरी करण्याचा मानस होताच.

छत्रपती शिवरायांच्‍या मावळ्यांच्या जीवनावर आधारित या चित्रपटात भूमिका साकारण्याची संधी मिळाल्‍याचे स्‍वप्‍नपूर्ती झाली आहे. अलीकडे वाचन कमी झालेले असल्‍याने इतिहासावर आधारित चित्रपट आवर्जून बघताना आपला गौरवशाली इतिहास जाणून घेण्याचा सल्‍ला तिने उपस्‍थितांना दिला.

तर अभिनेत्री अश्‍विनी बागल म्‍हणाली, की अभिनय क्षेत्रात काम करेल, असे कधीही वाटले नव्‍हते. परंतु संधी मिळाल्‍याने नवीन प्रवासाला सुरवात करते आहे. आज प्रत्‍येक क्षेत्रात आव्‍हानांना तोंड द्यावे लागते. महिलांनी स्‍वतःला कमी न लेखता भक्‍कमपणे उभे राहिले पाहिजे, असा सल्‍ला तिने उपस्‍थित महिलांना दिला.

मनोरंजनात्‍मक खेळात रमल्‍या सखी

‘पुढचं पाऊल’ कार्यक्रमानिमित्त धमाल मनोरंजनावर आधारित खेळांचे आयोजन करण्यात आले होते. हाय हिल्‍सवर कॅटवॉक करत, तर कधी टंगट्विस्‍टरमध्ये स्‍पर्धक महिलांना पछाडत सहभागी महिलांनी बक्षीसाची लयलूट केली. प्रत्‍येक वयोगटातील महिला स्‍पर्धकांचा या खेळांमध्ये उत्‍स्‍फूर्त सहभाग राहिला. अगदी कॅडबरीपासून तर वेगवेगळ्या स्वरूपाच्या भेटवस्‍तू देऊन विजेत्‍या स्‍पर्धकांना मान्‍यवरांच्‍या हस्‍ते गौरविण्यात आले.

sakal pudhcha paul Prove yourself by realizing your potential Advice from successful women nashik news
Nashik News : गणेशवाडी भाजीबाजार इमारत ओस; इमारतीत सर्वत्र अस्वच्छता, दुर्गंधी

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.