SAKAL Pudhcha Paul : कुटुंब ते करिअर आणि फायनान्स ते फिटनेसमध्ये येणाऱ्या सर्व आव्हानांना सामोरे जाण्यासाठी लागणारा आत्मविश्वास देण्यासाठी, त्यांच्यासाठी नाजूक ठरणाऱ्या प्रश्नांची उत्तरे देण्यासाठी सकाळ मध्यम समूह आणि कॅनेस्टेन यांच्या संयुक्त विद्यमाने नाशिकमध्ये घेऊन येत आहे ‘पुढचं पाऊल’.
शनिवारी (ता.६) सकाळी साडेदहाला येथील गंगापूर रोडवरील रावसाहेब थोरात सभागृहात कर्तबगार महिलांशी संवादाची संधी उपलब्ध होत आहे. सोबत गप्पा, खेळ, बक्षीसे, तज्ज्ञ डॉक्टरांशी चर्चा, लकी ड्रॉ असे बरेच काही असेल. (SAKAL Pudhcha Paul Saturday interaction with accomplished women Actress Monalisa Bagal presence nashik news)
‘झाला बोभाटा' चित्रपटातील अभिनेत्री मोनालिसा बागलने २०१६ मध्ये दत्ता मिरकुटे दिग्दर्शित ‘प्रेम संकट' या चित्रपटातून चित्रपटसृष्टीत पदार्पण केले. मोनालिसासह चित्रकार, शिक्षण-सामाजिक क्षेत्रातील कार्यरत डॉ. शेफाली भुजबळ, सहकार भारतीच्या प्रदेशाध्यक्षा आणि नाशिक जिल्हा महिला सहकारी बँकेच्या अध्यक्षा डॉ. शशीताई अहिरे,
लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पोलिस अधीक्षक शर्मिष्ठा वालावलकर, संदीप फाउंडेशनच्या डॉ. सारिका पाटील, वॉव ग्रुपच्या अश्विनी न्याहारकर, नाशिक जिल्ह्यातील पहिल्या यू-ट्यूब एज्युकेटर श्वेता सोनवणे-चव्हाण,
श्री सप्तशृंगी शिक्षण संस्थेच्या अध्यक्षा आणि नाशिक महापालिकेच्या स्थायी समितीच्या महिला अध्यक्षा हिमगौरी आहेर-आडके या कर्तबगार महिला उपस्थित राहणार आहेत. त्यांच्यासोबत दिलखुलास गप्पा मारतानाच त्यांचा जीवन प्रवासही समजून घेता येईल. महिलांसाठी प्रवेश विनामूल्य असेल. अल्पोपाहाराची सोय करण्यात येईल.
एक स्त्री आपल्या कुटुंबाच्या सुखासाठी अनेक त्याग करते. हे गेली कित्येक शतके सुरु आहे. पण, आजच्या काळात महिलांनी स्वतःला खूप सक्षम केले आहे.
सगळ्या अडचणींवर मात करत महिला सर्व क्षेत्रात पुरुषांच्या खांद्याला खांदा लावून काम करत आहेत. यासोबतच घर, कुटुंब, सामाजिक कार्य अशा अनेक जबाबदाऱ्या चांगल्या प्रकारे पार पाडत आहेत. हे रहस्य उलगडून सांगणार आहेत.
कॅनेस्टेन पावडर हे बायर फार्मास्युटिकल प्रायव्हेट लिमिटेड या जगप्रसिद्ध फार्मास्युटिकल्स आणि बायोटेक्नॉलॉजी कंपनीचे उत्पादन बुरशीप्रतिबंधक (ॲन्टीफंगल) क्षेत्रात पहिल्या क्रमांकावर आहे.
कार्यक्रमास उपस्थित राहणाऱ्या महिलांना त्यांचे ‘फ्री सॅम्पल’ मिळणार आहे. त्वचा तज्ज्ञ डॉ. तेजा कुलकर्णी या महिलांना त्वचेच्या काळजीबद्दल मार्गदर्शन करणार आहेत. याशिवाय अनेक तज्ज्ञ मान्यवरांशी संवाद साधण्याची संधी येथे असेल.
कार्यक्रम खालीलप्रमाणे
० कधी-६ मे २०२३
० किती वाजता-सकाळी १०.३० वाजता
० स्थळ : रावसाहेब थोरात सभागृह, गंगापूर रोड, नाशिक
० अधिक माहितीसाठी आणि सहभागासाठी तसेच नोंदणीसाठी ८५९१७३४५१० या व्हॉटस्ॲप क्रमांकावर संपर्क साधावा
शर्मिष्ठा घारगे-वालावलकर
नाशिकमधील लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या अधीक्षक आहेत. मूळच्या सांगलीच्या असून भौतीकशास्त्रामधील एम. एस्सी., पुणे विद्यापीठातून एल. एल. बी. ही पदवी संपादन केले. वाचन, स्वयंपाक, प्रवास हे छंद आहेत.
महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या २००६ च्या परीक्षेत पोलिस उपअधीक्षक निवड झाली. २०१०-१२ मध्ये पहिली पोस्टिंग' पुणे ग्रामीणमध्ये पोलिस उपअधीक्षकपदी झाली. २०१२-१४ मध्ये धाराशीवच्या उपविभागीय अधिकारी म्हणून काम पाहिले.
तुळजापूर विभागाचे काम पाहताना ५० पेक्षा अधिक गुन्ह्यांचा स्वत: तपास केला. तसेच दरोड्याच्या गुन्ह्यांचा यशस्वी तपास करताना गुन्हेगारांवर मोक्का लावण्यात यश आले. तुळजापूर येथे नवरात्रात सुमारे २५ लाखांपेक्षा अधिक भाविक येत असल्याने ‘क्राऊड कंट्रोलिंग'चे आव्हान यशस्वी रित्या पेलले.
२०१४-१८ मध्ये सोलापूर शहर गुन्हे शाखेत सहायक पोलिस आयुक्त म्हणून संधी मिळाली. गुन्हे शाखेची जबाबदारी घेणाऱ्या पहिल्या अधिकारी होत. शंभरपेक्षा अधिक मालमत्तेच्या गुन्ह्यांचा तपास झाला. १०० कोटींपेक्षा अधिक आर्थिक फसवणुकीच्या गुन्ह्यांचा यशस्वी तपास केला.
बदली झाल्यावर लोकआग्रहास्तव बदली आदेश सरकारला मागे घ्यावा लागला होता. २०१९-२१ मध्ये नाशिक ग्रामीण अपर पोलिस अधीक्षकपदाची जबाबदारी पार पाडली. २०२१-२२ मध्ये राज्य गुप्तवार्ता नाशिक विभागाच्या पोलिस उपायुक्त म्हणून काम पाहिले.
२०२२ मध्ये लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या अधीक्षक म्हणून पदभार स्वीकारल्यापासून लाचखोरांविरोधातील कारवाईला वेग आला आहे.
डॉ.शेफाली समीर भुजबळ :
शिक्षण, सामाजिक व सांस्कृतिक क्षेत्रासह संशोधनामध्ये रस आहे. कोणे (ता. त्र्यंबकेश्वर), नागोसली (ता. इगतपुरी), गौळाणे (ता. नाशिक) या दत्तक गावांच्या विकासात सहभाग राहिला. वयाच्या दहाव्या वर्षापासून भरतनाट्यमचा सुरु केलेला अभ्यास आणि साधना आजतागायत सुरु आहे.
कला आणि साहित्य क्षेत्र, वाचनासह ॲक्रेलिक कॅनव्हास पेंटिंग क्षेत्रात विशेष आवड आहे. सध्या ‘पैठणी-कॉफी टेबल बुक'चे लेखन सुरु आहे. मुंबई विद्यापीठाच्या मिठीबाई महाविद्यालयातून वनस्पतिशास्त्र विषयातील बी. एस्सी. ही पदवी संपादन केली.
कार्यकारी सचिव ही पदविका घेतली. मुंबई विद्यापीठातून मार्केटिंग मॅनेजमेंट विषयात पदवी घेतली असून उदयपूरच्या पॅसिफीक विद्यापीठातून कॉर्पोरेट सोशल रिस्पॉन्सिब्लिटी या विषयाची पी. एचडी. मिळवली.
शिवाय पुण्याच्या सावित्रीबाई फुले विद्यापीठातून ‘रोल ऑफ स्पिरीच्युलिटी इन ऑर्गनायझेशनल डेव्हलपमेंट विथ स्पेशल रिफरन्स टू मॅनेजमेंट इन्सिट्यूट इन गोल्डन ट्रॅंगल' या विषयावरील पी. एचडी. चे शिक्षण सुरु आहे.
त्यांनी मुंबईतील शिपींग एमएनसी कंपनीत दहा वर्षे काम केले. विमा क्षेत्रात दीर्घकाळ कामाचा अनुभव आहे. गेल्या १६ वर्षांपासून मेट भुजबळ नॉलेज सिटीच्या मुख्य प्रशासक म्हणून कार्यरत आहेत. तेजस्विनी, आयकॉन, ग्रीड लीडरशीप, वूमेन ॲचिव्हर्स, जैन फाउंडेशन, बेस्ट एज्युकेशनिस्ट अशा विविध पुरस्कारांनी सन्मानित आहेत.
हेही वाचा : संतुलित आहारातून रोखा फॅटी लिव्हरचा आजार
डॉ. शशिताई अहिरे :
महाराष्ट्र राज्य सहकारी भारतीच्या प्रदेशाध्यक्षा, दि नाशिक जिल्हा महिला सहकारी बँकेच्या अध्यक्षा, मुंबईच्या महाराष्ट्र अर्बन को-ऑपरेटिव्ह बँक्स फेडरेशनच्या संचालिका आणि दि नाशिक जिल्हा नागरी सहकारी बँक्स असोसिएशनच्या संचालिका म्हणून कार्यरत आहेत.
आदिवासी आणि दुर्गम भागातील महिलांना समाजाच्या मुख्य प्रवाहात आणण्यासाठी आदिवासी महिला बचत गटाची निर्मिती करुन त्यांना वित्त पुरवठा करण्यास मदत केली. तसेच जिल्हा बँकेच्या माध्यमातून महिला बचत बचत गटातील महिलांना लघू उद्योग आणि व्याजाच्या विविध सवलती मिळवून देण्याचे काम केले.
सहकार भारतीच्या माध्यमातून नागरी सहकारी बँकांना लागू असलेल्या सर्व सरकारी योजना सहकारी बँकांना लागू करण्यासाठी व नागरी सहकारी बँकांच्या अडचणी सोडवण्यासाठी केंद्रीय मंत्री अमित शहा यांच्याकडे पाठपुरावा केला.
हिमगौरी आहेर-आडके :
नाशिकमधील श्री सप्तशृंगी शिक्षण संस्थेच्या अध्यक्षा आहेत. या कामात त्यांना वडील डॉ. बाळासाहेब आहेर यांचे मार्गदर्शन लाभले. या संस्थेची कनिष्ठ महाविद्यालयासह सीबीएसई शाळा आहे. तसेच एक आयुर्वेद महाविद्यालय आणि रुग्णालय, मराठी शाळा आहे.
आय. टी. मधील बी. ई. ही पदवी कमिन्स अभियांत्रिकी महाविद्यालयातून संपादन केली. तसेच मार्केटिंग आणि फायनान्समध्ये एम. बी. ए. म्हणून पदवी मिळवली. शिक्षण पूर्ण करत असताना कलेची आवड निर्माण झाली आणि एकांकिका नाट्य स्पर्धेत पुरस्कार मिळाला.
पुरुषोत्तम करंडकने सन्मानित करण्यात आले. राजकीय पार्श्वभूमी लाभली असून भारतीय जनता पक्षाच्या महिला मोर्चाच्या शहराध्यक्षा आहे. नाशिक महापालिकेच्या स्थायी समितीचे अध्यक्षपदी काम पाहिले.
२०१८ मध्ये पुण्यात आचार्य अत्रे, २०१९ मध्ये कर्मयोगी आणि नाशिक सिटीझन फोरमतर्फे सर्वोत्कृष्ट नगरसेवक, २०२० मध्ये गोदा सन्मान पुरस्काराने सन्मानित करण्यात आले आहे. श्री सप्तशृंगी आयुर्वेद महाविद्यालयाचा २०२२ मध्ये सर्वोत्कृष्ट संस्था म्हणून गौरव झाला आहे.
श्वेता सोनवणे-चव्हाण :
नाशिकमधील पहिल्या महिला यू-ट्यूब एज्युकेटर आहेत. कांद्यासाठी प्रसिद्ध असलेल्या लासलगावमध्ये राहतात. आय. टी. अभियंता आणि आंतरराष्ट्रीय गणित शिक्षक आहेत. गणित सुलभ आणि आनंददायी बनवण्याची आवड आहे.
‘मॅथ्स स्कॅम' नावाचे यू-ट्यूब चॅनल चालवतात. गणिताच्या सोप्या युक्त्या आणि टिप्स देतात. यू-ट्यूब चॅनलचे ६७५के, फेसबुकचे ४०८के, इन्स्टाग्रामचे १६७के सदस्य आहेत. दुबईतील संस्थेशी संबंधित आहे. देशासह १५ वेगवेगळ्या देशातील विद्यार्थ्यांना गणिताचे धडे देतात.
गणिताची भीती वाटते आणि मूलभूत व वैदिक गणिताच्या युक्त्या शिकू इच्छिणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी अभ्यासक्रमाची रचना केली आहे. ‘एकत्र गणित जिंकू या !' यासाठीचा संवाद महत्त्वाचा मानतात.
डॉ. सारिका पी. पाटील :
संदीप इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी अँड रिसर्च सेंटरमध्ये सहाय्यक प्राध्यापक म्हणून कार्यरत आहेत. यापूर्वी त्यांनी नवजीवन इन्स्टिट्यूट ऑफ मॅनेजमेंटमध्ये अध्यापन केले. शिवाय यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठासाठी समुपदेशक म्हणून काम पाहिले.
पुण्याच्या सावित्रीबाई फुले विद्यापीठातून संस्थात्मक व्यवस्थापनात पीएच. डी. मिळवली असून नागपूरच्या राष्ट्रसंत तुकडोजी महाराज विद्यापीठातून कार्मिक व्यवस्थापन प्रवाहात पदव्युत्तर शिक्षण पूर्ण केले. अमरावतीच्या संत गाडगेबाबा विद्यापीठातून त्यांनी वाणिज्य शाखेतील पदवी मिळवली.
संदीप फाउंडेशन आणि संदीप विद्यापीठाच्या भरती प्रमुख म्हणून जबाबदारी सांभाळली. व्यवस्थापन अभ्यास विभाग, परीक्षा, शिक्षक समन्वयक म्हणून काम पाहिले. अभियांत्रिकीच्या विद्यार्थ्यांसाठी ‘रिझ्युम रायटिंग', ‘व्यवसाय अक्षरे कशी लिहावीत', ‘टीम बिल्डींग' विषयक विविध व्यक्तिमत्त्व विकास सत्रे घेतली आहेत.
नाशिकमध्ये २६ जानेवारी २०२० ला खानदेश मराठा मंडळातर्फे सामाजिक मेळावा घेतला. यवतमाळमधील विविध शैक्षणिक उपक्रमात सहभाग राहिला. यवतमाळमधील महिला कुणबी समाज आणि सांस्कृतिक कार्यक्रमासाठी आमंत्रित होत्या.
अश्विनी न्याहारकर :
बाल कल्याण समिती, बाल न्यायच्या माजी सदस्या आहेत. ‘वॉव ग्रुप'च्या संस्थापक आहेत. महिला आणि बाल क्षेत्रात योगदान राहिले असून ‘वॉव ग्रुप'च्या माध्यमातून नाशिकमध्ये जागतिक महिला दिनाला वॉव वूमन्स दुचाकी रॅलीच्या आयोजनात त्या सक्रिय सहभागी असतात. महिलांच्या दुचाकी रॅलीने एक आयाम प्रस्थापित केला आहे. महाराष्ट्र दिनी महाराष्ट्राची लोकधारा, नवरात्रीचा उत्सव अशा कार्यक्रमात सहभागी असतात. नाशिकमध्ये भरणाऱ्या जागतिकस्तरावरील कृषीथॉन प्रदर्शनाच्या आयोजनात सक्रिय असतात.
डॉ. तेजा कुलकर्णी :
पुण्याच्या बी. जे. वैद्यकीय महाविद्यालयातून त्यांनी एम. बी. बी. एस. पदवी संपादन केली. तसेच बीजेएमसी आणि ससून रुग्णालयातून त्यांनी त्वचा आणि व्हीडी या विषयातील एम. डी. ही पदव्युत्तर पदवी प्रथम क्रमांकाने संपादन केली.
गेल्या २३ वर्षांपासून नाशिकमध्ये त्वचारोग तज्ज्ञ म्हणून कार्यरत आहेत. त्वचा, केस आणि नखांशी संबंधित सर्व प्रकारच्या समस्यांवर उपचाराचा अनुभव आहे. कॉस्मेटोलॉजी क्षेत्राचाही अनुभव आहे. काया स्कीन क्लिनिकमध्ये वरिष्ठ सल्लागार म्हणून काम केले आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.