नाशिक : सध्या मोबाईलच्या अतिवापरापासून अन्य विविध कारणांनी पती- पत्नीपासून सर्वच नातेसंबंधांमध्ये दुरावा वाढतो आहे. नाते टिकविणे ही कुण्या एकाची जबाबदारी नसून, संयुक्त प्रयत्नातून नात्यातील गोडवा टिकविला पाहिजे, असे मत अभिनेत्री अमृता सुभाष आणि अभिनेता संदेश कुलकर्णी यांनी मंगळवारी (ता.२४) व्यक्त केले. (SAKAL Samvad Amruta Subhash Sandesh Kulkarni and heartwarming dialogue nashik news)
‘पुनश्च हनिमून’ या नाटकाच्या सादरीकरणासाठी नाशिकला आलेल्या अमृता सुभाष व संदेश कुलकर्णी यांनी ‘सकाळ’ सातपूर कार्यालयात भेट दिली. ‘सकाळ संवाद’ कार्यक्रमातून याप्रसंगी तनिष्का सदस्यांशी दिलखुलास संवाद साधताना त्यांच्या कार्याची माहितीदेखील जाणून घेतली.
नाट्य व्यवस्थापक जयप्रकाश जातेगावकर, युवा कलाकार मंगेश काकड याप्रसंगी उपस्थित होते. कार्यक्रमाचे संयोजन तनिष्काचे समन्वयक विजयकुमार इंगळे यांनी केले. अभिनेत्री अमृता सुभाष म्हणाली, की जणू हे आपल्या जीवनावर आधारित नाटक आहे, असा विचार प्रत्येक जोडप्याला नाटक बघताना येतो.
विशिष्ट परिस्थितीत एकमेकांशेजारी असूनही मोबाईलवरून संवाद साधला जातो आहे, ही वस्तुस्थिती आहे. केवळ पती-पत्नी नव्हे तर प्रत्येक नात्यात दुरावा येत असून, यावर भाष्य करणारे हे नाटक आहे.
अभिनेता संदेश कुलकर्णी म्हणाला, की जोडप्यांमध्ये वाढता तणाव ही सामाजिक समस्या बनली असून, नात्यांमधील धगधगते वास्तव नाटकातून दाखविलेले आहे. या माध्यमातून आरसा दाखविण्याचे काम केले असले तरी यातून अवघड विषय चर्चेसाठी खुला करण्याचा प्रयत्न केलेला आहे. यावेळी प्रश्नोत्तरे आणि गप्पांच्या माध्यमातून विविध विषयांवर चर्चा करण्यात आली.
रत्ना वाघ यांचा सत्कार
श्री. इंगळे यांनी, बसचे मॉडेल तयार करणाऱ्या रत्ना वाघ यांच्या जिद्दीबद्दल माहिती दिली. त्यानंतर तनिष्का व्यासपीठातर्फे सौ. वाघ यांचा अमृता सुभाष यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. श्री.कुलकर्णी यांनी परिवहन मंत्री अशी उपाधी सौ.वाघ यांनी दिली. तर अमृता सुभाष यांनी 'बस बाई बस' म्हणत मिस्कील शैलीत त्यांच्या कौशल्यांचे कौतुक केले.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.