नाशिक : कर्मचारी भविष्यनिर्वाह निधी संघटनेने (ईपीएफओ) पात्र कर्मचाऱ्यांना उच्च निवृत्तिवेतन (पेन्शन) प्राप्त करून घेण्याकरिता पर्याय अर्ज (ऑप्शन फॉर्म) प्रक्रिया सुरू आहे. सध्या येत्या ३ मार्चपर्यंत ऑनलाइन अर्जाची मुदत असून १ सप्टेंबर २०१४ पूर्वी निवृत्त झालेले पात्रताधारक कर्मचारी सध्या अर्ज करू शकतील.
या तारखेनंतर निवृत्त झालेल्या कर्मचाऱ्यांसाठीदेखील लवकरच अर्ज भरण्याची सुविधा उपलब्ध होईल. सोशल मीडियावरील अफवांवर विश्वास न ठेवता, ‘ईपीएफओ’च्या अधिकृत संकेतस्थळावरील परिपत्रकांचा आधार घ्यावा. पात्रताधारक व्यक्तींनी अर्ज करावा, असे आवाहन कर्मचारी भविष्यनिर्वाह निधी संघटनेच्या (ईपीएफओ) नाशिक विभागाचे आयुक्त अनिलकुमार प्रीतम यांनी केले. (SAKAL Samvad Anilkumar Pritam statement Apply for pension dont fall prey to rumours nashik news)
‘सकाळ’च्या सातपूर कार्यालयात झालेल्या ‘सकाळ-संवाद’ कार्यक्रमात प्रीतम यांनी मनमोकळा संवाद साधला. त्यांचे स्वागत ‘सकाळ’च्या उत्तर महाराष्ट्र आवृत्तीचे संपादक डॉ. राहुल रनाळकर यांनी केले. तर विभागातील अधिकारी ललित लहामगे यांचे स्वागत ‘सकाळ’चे वरिष्ठ व्यवस्थापक (हिशेब) प्रकाश जोशी यांनी केले. कार्यक्रमाचे संयोजन ‘सकाळ’चे वरिष्ठ व्यवस्थापक (एचआर) संजय पाटील यांनी केले.
आयुक्त अनिलकुमार प्रीतम यांनी निवृत्तिवेतनाची तथ्ये आणि पथ्थे समजावून सांगताना या विषयाची सविस्तर माहिती दिली. ते म्हणाले, की १ सप्टेंबर २०१४ पूर्वी निवृत्त झालेल्या कर्मचाऱ्यांबाबत मुख्यालायाकडून गेल्यावर्षी २९ डिसेंबरला तसेच या वर्षी २५ जानेवारीला अशी दोन परिपत्रके काढली आहेत.
त्याआधारे निवृत्त कर्मचारी (पेन्शरर्स) यांनी www.epfindia.gov.in या वेबसाईटवर डिजिटली/ऑनलाइन अर्ज फाइल करता येईल. कर्मचारी भविष्य निधी योजना, १९५२ परिच्छेद २६ (६) नुसार पाच हजार किंवा साडेसहा हजाराच्या पगार सिलिंगपेक्षा अधिक गुंतवणूक केली असेल व कर्मचारी पेन्शन योजना १९९५ च्या सदस्याने पूर्व-दुरुस्ती योजनेच्या परिच्छेद ११(३) मध्ये नमूद केलेल्या संयुक्त पर्यायाचा वापर केला असेल व त्यांनी केलेल्या सदर पर्याय भविष्य निधी कार्यालयाने अमान्य केले असतील, त्यांना ऑनलाइन पर्याय अर्ज (ऑप्शन फॉर्म) करता येईल.
सर्वोच्च न्यायालयाने निवृत्तिवेतन योजनेसंदर्भात ४ नोव्हेंबर २०२२ ला दिशानिर्देश दिले होते. त्याची अंमलबजावणी केली जात आहे. त्यानुसार येत्या ३ मार्चपर्यंत पात्रताधारक कर्मचाऱ्यांकडून वाढीव निवृत्तिवेतनासाठी ऑनलाइन पर्याय अर्ज (ऑप्शन फॉर्म) भरून घेतला जात आहे.
सध्या १ सप्टेंबर २०१४ पूर्वी निवृत्त झालेल्यांना अर्ज भरण्याची सुविधा उपलब्ध आहे. तर या तारखेनंतर निवृत्त झालेल्यांना येत्या दोन-तीन दिवसांत अर्ज भरण्याची सुविधा उपलब्ध असेल.
सध्या सोशल मीडियासह अन्य विविध पातळ्यांवर काही अफवा किंवा माहिती पसरविली जात आहे. परंतु या बाबींवर विश्वास न ठेवता ‘ईपीएफओ’च्या संकेतस्थळावर उपलब्ध असलेले अधिकृत परिपत्रक संदर्भित करण्याचे आवाहन आयुक्त प्रीतम यांनी केले.
हेही वाचा : ..ही काळजी घ्या नाहीतर खिसा होईल साफ!
...तरच मिळणार वाढीव निवृत्तिवेतन
पर्यायी अर्ज दाखल केल्यानंतर संबंधितांचा अर्ज नियोक्त्याकडे (एम्प्लॉयर) हस्तांतरित होईल. अर्जातील तपशिलाची खातरजमा करून नियोक्त्यांकडून अर्ज ऑनलाइन माध्यमातून ईपीएफओ कार्यालयाकडे हस्तांतरित होईल. विभागीय स्तरावरील कार्यालयात पात्रतेच्या निकषांची पडताळणी करताना निवृत्तिवेतन (पेन्शन) बाबत उचित कार्यवाही केली जाईल.
निवृत्ती वेतनधारकांबाबत नाशिक विभाग देशात दुसरे
राज्यातील व देशातील विविध शहरांतून निवृत्त होऊन नाशिकला स्थायिक झालेल्यांची संख्या मोठी आहे. त्यामुळे नाशिकसह नगर, जळगाव, धुळे, नंदुरबार जिल्ह्यांचा समावेश असलेल्या नाशिक विभागात निवृत्तिवेतनधारकांची (पेन्शनर्स) संख्या लक्षणीय आहे.
नाशिक विभागामार्फत एक लाख ७५ हजार निवृत्त अधिकारी-कर्मचाऱ्यांना निवृत्तिवेतन अदा केले जात आहे. या संख्येबाबत नाशिक विभागाचा देशात दुसरा क्रमांक लागतो. सध्या पहिल्या क्रमांकावर कोल्हापूर विभाग असल्याची माहितीही आयुक्त प्रीतम यांनी दिली.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.