SAKAL Samvad: शरीराची निगा राखणे, हीच परमेश्‍वराची सेवा : हृदयरोगतज्ज्ञ डॉ. अनिरुद्ध धर्माधिकारी

Dr. Aniruddh Dharmadhikari
Dr. Aniruddh Dharmadhikariesakal
Updated on

SAKAL Samvad : शरीर हे परमेश्‍वराने दिलेली देण आहे आणि आपल्या शरीराची निगा राखणे, हीच खरी परमेश्‍वराची सेवा आहे.

हृदयरोग आणि अध्यात्म यांचा खूप जवळचा संबंध असून, अध्यात्मातून जीवनातील ताणतणाव दूर होण्यास मदत होऊन ताणतणावातून निर्माण होणाऱ्या व्याधी यामुळे टाळता येऊ शकतात, असे प्रतिपादन प्रसिद्ध हृदयरोगतज्ज्ञ डॉ. अनिरुद्ध धर्माधिकारी यांनी केले. (SAKAL Samvad Cardiologist Dr Aniruddha Dharmadhikari statement Taking care of body service of God nashik)

‘सकाळ’च्या सातपूर कार्यालयात शुक्रवारी (ता. ३) आयोजित ‘हृदयरोग आणि अध्यात्म’ संवाद सत्रात ते बोलत होते. प्रारंभी ‘सकाळ’च्या उत्तर महाराष्ट्र आवृत्तीचे संपादक डॉ. राहुल रनाळकर यांनी पुस्तक भेट देऊन त्यांचे स्वागत केले.

यानंतर प्रसिद्ध हृदयरोगतज्ज्ञ डॉ. धर्माधिकारी यांनी प्रश्‍नोत्तरे स्वरूपात उपस्थितांशी दिलखुलास संवाद साधला. त्यांनी हृदयरोगाची कारणे, लक्षणे, प्रतिबंधात्मक उपाय, निगडित अध्यात्मावर विस्तृत मार्गदर्शन केले.

ते म्हणाले, की निरोगी आयुष्य जगण्यासाठी योग्य लाइफस्टाईल महत्त्वाची आहे. पुरेसा व्यायाम, प्राणायाम, योगसाधनेमुळे आरोग्य सुदृढ राखण्यास मदत होते.

ताणतणावाच्या व्यवस्थापनाबाबत सविस्तर माहिती देताना डॉ. धर्माधिकारी म्हणाले, की रोजच्या धकाधकीच्या जीवनात प्रत्येकाला ‘स्ट्रेस’चा सामना करावा लागतो. प्राणायामामुळे रोजच्या जगण्यातील ‘स्ट्रेस’ प्राणायामाने दूर करता येतो.

याद्वारे ताणतणावामुळे निर्माण होणाऱ्या व्याधींना दूर ठेवता येते. निरोगी जीवनासाठी नामस्मरण फार मोठी भूमिका बजावते. रोज दहा मिनिटे नामस्मरण केल्यास ताणतणावावर विजय मिळविता येतो.

त्याचबरोबर निरोगी जीवनासाठी झोपही आवश्‍यक आहे. किमान सहा तास झोप तरी प्रत्येकाने घ्यायला हवी. व्यक्तिपरत्वे दिनचर्येनुसार तास कमी-जास्त होऊ शकतात. जे सहा तासांपेक्षा कमी झोप घेतात, त्यांच्यात प्रामुख्याने हृदयरोगाचा धोका अधिक आढळून येतो.

Dr. Aniruddh Dharmadhikari
SAKAL Samvad | वेतनधारकांनी ई- नॉमिनेशन भरत टाळावेत वाद : आयुक्‍त अनिल कुमार प्रीतम

ते म्हणाले, की ज्या गोष्टी शरीरांना अपायकारक आहेत, त्या निग्रहाने टाळायला हव्यात. अलीकडे उपवासात बरेच अपायकारक पदार्थ आहारात आले आहेत. ज्या गोष्टी आरोग्यास हानिकारक आहेत, त्याच बाबी उपवासाच्या ताटात आपल्याला दिसून येतात.

साबूदाणा भारतीय पदार्थ नाही; पण तो कधी भारतीयांचा उपवासाचा पदार्थ झाला कळेलच नाही. उपवास हा शास्त्रशुद्ध पद्धतीनेच करायला हवा. उपवासाने पचनसंस्थेचे आरोग्य सुधारायला हवे, मात्र अपायकारक पदार्थांच्या सेवनामुळे उद्देशप्राप्ती होत नाही.

या वेळी उपस्थितांनी विचारलेल्या प्रश्‍नांची डॉ. धर्माधिकारी यांनी उत्तरे देऊन शंकांचे निरसन केले.

केवळ दहा टक्के दुखणे ह्रदयाशी संबंधित

डॉ. अनिरुद्ध धर्माधिकारी म्हणाले, की छातीत होणाऱ्या दुखण्यांपैकी केवळ दहा टक्के दुखणे हे हृदयाशी संबंधित असते. हृदयरोगाचे दुखणे हे सलग नसते, ते फार काळ टिकत नाही.

अर्ध्या तासाहून अधिक वेळ छातीत वेदना झाल्यास हृदयविकाराचा झटका येत असल्याचे सांगून तो आल्यास करण्यात येणाऱ्या प्रतिबंधात्मक उपायांची त्यांनी माहिती दिली. तसेच, आधुनिक उपचारपद्धतीवर मार्गदर्शन केले.

Dr. Aniruddh Dharmadhikari
Sakal Samvad : वनसंपत्तीचे संवर्धन व संरक्षण प्रत्येकाची जबाबदारी : पंकज गर्ग

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.