SAKAL Special: चालता- बोलता....!

Nashik Misal Pav
Nashik Misal Pavesakal
Updated on

नाशिकची मिसळच फेमस

मी पुण्याहून बदलून आलेलो असल्याने इकडे कुठले हॉटेल छान आहे, हे माहिती नाही. मात्र पुण्यात मिसळ छान मिळते, असे म्हणताच उपस्थितांनी सांगितले, अहो, पुण्याने तर नाशिकची कॉपी केली. इकडची मिसळ ओरिजनल आहे.

नाशिक मिसळसाठी फेमसच आहे. त्यामुळे येणारा प्रत्येक माणूस नाशिकची मिसळ खातोच. नाशिकमध्ये अनेक हॉटेल मिसळसाठीच फेमस आहेत. यापूर्वी अनेकांनी तर्रीदार मिसळीचा आस्वादही घेतला आहे.

अधिकारी नवीनच असल्याने ते म्हणाले, मला तर पुणेरी मिसळच आवडते. सध्या तरी पुण्याचीच मिसळ बेस्ट आहे, असे बोलल्याने एकच हशा पिकला. (SAKAL Special chalta bolta comedy tragedy political satire misal pav nashik news)

पहिला सभासद पुढे बसणार

शैक्षणिक संस्था, सहकारी बँक आदी क्षेत्रांत सभासदांची संख्या मोठी असते. या संस्थांमध्ये संस्थापक सभासद असतात. तसेच संस्था स्थापन करत्यावेळी झालेले सभासद असतात. त्यामुळे या सभासदाचा रुबाब संस्था, बॅंकेत गेल्यावर मोठा असतो.

आम्ही संस्थापक सभासद आहोत, संस्था उभी करण्यासाठी जिवाचे रान केले, असे उदगार त्यांचे कायम असतात. अशा सभासदांची जणू सवय सभासद, पदाधिकाऱ्यांना झालेली असते. जिल्ह्यातील नावलौकिक असलेल्या नाशिक मर्चंट्स को. ऑपरेटिव्ह बॅंकेच्या सर्वसाधारण सभेत असाच एक सभासद दाखल झाला. पहिल्या रांगेत बॅंकेचे संचालक स्थानापन्न झाले होते.

त्या वेळी हा सभासद दाखल होऊन पहिल्या रांगेतील खुर्चीवर बसला. त्या वेळी मागील रांगेतील सभासदाने ‘अहो मागे बसा, पुढे संचालक बसलेले आहेत,’ असे सुनावले. त्या वेळी संबंधित सभासदाचा बाणा जागा झाला.

मी अकरावीला असताना बॅंकेचा सभासद झालो आहे. (स्व.) हुकूमचंद बागमार यांच्यापूर्वी मी बॅंकेचा सभासद आहे. पंचवटीत त्या वेळी एकच शाखा होती, असे सांगत मी पुढे बसणार, असे सांगितले. त्यावर संचालकांनी त्यांना जागा देऊन त्या सभासदापासून सुटका करून घेतली.

लग्नाला नक्की यायचं हं..!

लग्न सोहळा म्हटले, की निमंत्रणही आलेच. मग अगदी आपल्या मित्रमंडळींपासून नातेवाईक, ऑफिसमधील सहकारी या सर्वांना आवर्जून बोलावले जाते. शासकीय कार्यालयातील एका महिला कर्मचाऱ्याचा विवाह ठरतो.

कार्यालयातील सर्वांना निमंत्रण देत असताना अचानकपणे एक ओळखीचे तिथे दाखल होतात. त्यांना तर निमंत्रण द्यावेच लागेल. मग बॅगमधून काढली पत्रिका, लिहिले नाव आणि दिली त्या व्यक्तीच्या हातात.

त्यांनीही अभिनंदन करत या पत्रिकेचा स्वीकार केला. माहेर, सासरकडची औपचारिक माहिती घेतल्यानंतर शेवटचा प्रश्न म्हणून लग्नाचे ठिकाण विचारले.

वधूनेही अगदी सहजपणे उत्तर दिले, साताऱ्याला... लग्नपत्रिका तर हातातच होती, आता कसे सांगू, की इतक्या दूर कसे येणार; पण नाइलाजाने हो म्हटले आणि लग्नाचा विषय तिथेच सोडून त्यांनी कार्यालयातून धूम ठोकली.

Nashik Misal Pav
SAKAL Special : चालता- बोलता

औषधामुळे तर खोकला झाला..!

एका कार्यक्रमातील गर्दीत एक जण भलताच खोकलत होता. एकदा खोकला सुरू झाला, की चार-सहा मिनिटे काही थांबायचं नावच घेईना. संबंधिताचे हाल पाहून एकाने पाणी देऊ केले. तरी खोकला काही थांबेना.

मग दोघा-तिघांमध्ये चर्चा सुरू झाली, की ‘इतकं का अंगावर काढावं बरं, चटकन औषध घ्याव ना’ असे एकजण पुटपुटला. त्‍यावर दुसरा विनोदवीर म्‍हणाला, ‘‘औषधामुळे तर खोकला झाला असेल...’’ आता हा विनोद काही कुणाला कळला नाही.

मग कुतूहलापोटी विचारणा झाली, की औषधाने कसा बरं खोकला होईल. त्‍यावर विनोदवीर म्‍हणाला, ‘‘अहो, सध्या गार वारा आहे. त्‍यात भाऊने थंड थंड मद्य घेतलं असेल, मग काय खोकला होणारच.’’

इतक्‍यावर न थांबता ‘आता झालाच आहे ना... मग अमुक ब्रॅन्डच मद्य घेतलं ना की लगेच खोकला बरा होईल’ असा दावा करत उत्तरला अन्‌ खोकलणाऱ्यासह तिघे-चौघे खिदखिदून हसल्‍याने लोकांना हसवायचा त्‍याचा हा प्रयोग यशस्‍वीदेखील झाला.

Nashik Misal Pav
SAKAL Special : चालता- बोलता

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.