SAKAL Special: चालता-बोलता

sairat
sairatesakal
Updated on

चित्रपट म्हणूनच पहा,‘सैराट’ होऊ नका....

एक दुजे के लिये, तेरे नाम, बाजीगर या चित्रपटांची नावे तर तुम्हाला माहितीच असतील. मराठीतही ‘सैराट’ हा प्रेमकथेवर आधारित चित्रपट चांगलाच गाजला. त्याला शासनाकडून पुरस्कारही मिळाला. पण या चित्रपटामुळे राज्यात प्रेमविवाहांच्या घटनांमध्ये वाढ झाल्याचे बोलले जाते.

याविषयी बालहक्क आयोगाकडे प्रश्न उपस्थित झाल्यावर त्यांनाही आश्चर्यच वाटले. ‘सैराट’जर आपल्या जीवनाची दशा अन्‌ दिशा ठरवणार असेल तर अशा चित्रपटांविषयी काय बोलायचे. त्यांच्याकडे चित्रपट म्हणूनच बघितले पाहिजे. नाहीतर पोलिसांना ‘साऊथ स्टाइल वागावे लागेल, असा इशाराच दिला. (SAKAL Special chalta bolta comedy tragedy political satire movie nashik)

बाजारातून आणला कढीपत्ता...

कोणतेही आंदोलन, सभा आणि प्रचारात घोषणांना महत्त्व असते. त्यामुळेच राजकीय नेत्यांच्या सभा गाजतात. याच घोषणांचा वापर जर, शासकीय कर्मचाऱ्यांकडून झाला तर त्याची बातच काही वेगळी असते.

झाले असे की, मंगळवारी (ता.५) महाराष्ट्र राज्य अंगणवाडी कर्मचारी कृती समितीतर्फे जिल्हा परिषदेवर मोर्चा काढत निर्देशन करण्यात आली. प्रलंबित मागण्यांसाठी अंगणवाडी सेविका आक्रमक झाल्या होत्या.

आपण आकांताने ओरडूनही कोणीच लक्ष देत नसल्याने एक कर्मचारी घोषणा द्यायला लागली. ‘बाजारातून आणला कढीपत्ता.. झेडपीच्या सीईओं बेपत्ता... असे एक, दोन नव्हे तर, या घोषणांचा पाऊसच त्यांनी जिल्हा परिषदेच्या आवारात पाडला.

घोषणांच्या पावसात चिंब झालेल्या अधिकाऱ्यांनी लागलीच आंदोलनकर्त्यांची भेट घेऊन निवेदन स्वीकारले आणि घोषणांमधून स्वतःचा मुक्तता करून घेतली.

sairat
SAKAL Special : चालता-बोलता...!

चलती का नाम गाडी...

आपल्या दारासमोर चार चाकी वाहन असावे अशी प्रत्येकाची इच्छा असते, मग ते वाहन कुठल्याही कंपनीचे अथवा सेकंड हॅन्ड का असेना. वाहन दारासमोर हवेच असा सध्या एक ट्रेंड आहे. मात्र चारचाकी वाहनाचा हव्यास एकाला भलताच नडला.

त्याचे असे झाले, अगदी कमी किमतीत व आपल्या प्रेस्टीजला शोभेल अशी कार मिळाल्याने एक जण आनंदित झाला. आनंदाच्या भरात त्याने समस्त मित्रमंडळींना एकत्र करून पार्टीला जाण्याचे नियोजन केले.

स्वतःसह एकूण पाच जणांनी दमदार पार्टी केली. पार्टी करून घरी येताना परतीच्या मार्गावर अचानक गाडी बंद पडली. त्यावेळी गाडीचे गुणगान जाणारे मात्र शिव्यांची लाखोली वाहू लागले. गाडीला धक्का मारण्याची वेळ आल्याने सर्वांचीच झिंग उतरली.

धक्का मारत असतानाच मागील चाक निखळून पडले. गाडी का सुरू होत नाही हे तपासण्यासाठी ज्ञान नसतानाही बोनेट खोलले. बोनेट खोलल्यानंतर गाडीचा बाह्य रंग वेगळा व आतील रंग वेगळा असल्याचे लक्षात आले.

कसाबसा गॅरेजवाला सापडल्यानंतर त्यांनी गाडीची संपूर्ण हिस्टरी सांगितली, त्यावेळी डोक्याला हात मारल्याशिवाय पर्याय राहिला नाही. कारण हीच गाडी कधी काळी त्याच्याकडे अपघात म्हणून रिपेरिंगला आली होती.

त्यामुळे गाडी आलिशान व कमी किमतीत मिळाली म्हणून हरखून जाण्यात काहीच अर्थ नसल्याचे संबंधिताला लक्षात आल्यानंतर ‘चलती का नाम गाडी’चा प्रयोग कधीच न करण्याची शपथ घेतली.

sairat
SAKAL Special: चालता-बोलता

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.