SAKAL Special: चालता-बोलता !

police
policeesakal
Updated on

पोलिस थेट घरी येतात, तेव्हा...

राजकीय नेत्यांना कामाचा तसा फार व्याप असतो. प्रत्येक कामाची जबाबदारी कार्यकर्त्यांवर सोपवून नेते मोकळे होतात. त्यामुळे लोकांची कामेही वेळेत मार्गी लागतात आणि जनसंपर्कही टिकून राहतो. सातपूर भागातील काळे आणि शिंदे असेच दोन नेते नगरसेवक होतात.

त्यांनी रहिवासी दाखला देण्यासाठी काही विश्वासू कार्यकर्त्यांची नियुक्ती केली होती. या कार्यकर्त्यांनी एका महिलेला रहिवासी दाखला दिला आणि त्या दाखल्याच्या आधारे तिने पॅनकार्ड व इतर कागदपत्रे तयार केली.

त्याच कागदपत्रांच्या आधारे विशेष तपास पथकाचे पोलिस थेट भाऊंच्या घरीच येऊन धडकले. पोलिस आपल्या घरी कशाला आले असतील, म्हणून ‘भाऊं’नी चौकशी केली तर त्यांचे लेटरहेड पोलिसांनी दाखविले.

भाऊंच्या कार्यकर्त्यांनी रहिवासी दाखला दिलेली महिला ही दहशतवाद्यांना सामील असल्याचा पुरावा पोलिसांना मिळाला होता. त्यामुळे पोलिस आपल्या घरी आल्याचे कळल्यावर भाऊंची झोपच उडाली. पोलिसांची मनधरणी करण्यात भाऊंचे अनेक दिवस ‘खर्ची’ पडले, तेव्हा कुठे हा विषय संपला. (SAKAL Special chalta bolta comedy tragedy political satire nashik)

police
SAKAL Special: चालता-बोलता !

.. अन्‌ ग्रामस्थांची फौज मिनी मंत्रालयात

गावचे प्रश्न शासन दरबारी मांडण्यासाठी काही गावकरी धडपडत असतात. मात्र, काही गावात असेही सामाजिक कार्यकर्ते तयार झाले असून, ते सतत विविध प्रश्नांबाबत निवेदन, पत्र देत मागणी करीत असतात.

जणू काही गावचे सर्वच प्रश्न सोडविण्याचा त्यांनी विडा उचललेला आहे. असेच एक कार्यकर्ते विठोबा ज्ञानदान मिनी मंत्रालय अर्थात जिल्हा परिषदेत आपल्या गावचे प्रश्न मांडत असतात. गावातील रस्ता हरविला, हा त्यांचा प्रश्न अगदी राज्यपातळीवर गाजला.

अशाच एका प्रश्नाबाबत लक्ष वेधण्यासाठी ते प्रशासन प्रमुखांकडे गेले. त्या वेळी प्रशासन प्रमुखांनी गावातील प्रश्न मांडण्यासाठी आपण कायम एकटेच येतात. गावाचे प्रश्न असतात, मग ग्रामस्थ का येत नाहीत? तुम्हीचे सारे प्रश्न मांडतात, असे उपरोधिक सुनावले.

त्यावर विठोबा दुसऱ्याच दिवशी ग्रामस्थांची फौज घेऊन मिनी मंत्रालयात दाखल झाले अन गावाचे प्रश्न त्यांनी मांडले. गावकऱ्यांची ही फौज पाहून प्रशासनावर मात्र आता डोक्याला हात लावण्याची वेळ आली होती.

police
SAKAL Special: चालता...बोलता !

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.