SAKAL Special : चालता.. बोलता

निवडणुका कधी होणार, याची माहिती नसली तरी, अनेकांकडून तयारी सुरू आहे.
Voting
Votingesakal
Updated on

आमचा काही योग दिसत नाही

स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका लांबणीवर पडल्या आहेत. निवडणुका होत नसल्याने माजी सदस्यांसह इच्छुकांची घालमेल सुरू आहे. निवडणुका कधी होणार, याची माहिती नसली तरी, अनेकांकडून तयारी सुरू आहे.

लोकांच्या गाठीभेटी घेत, कार्यक्रमांना इच्छुक हजेरी लावत आहेत. प्रत्येक ठिकाणी त्यांना निवडणुका कधी, हाच प्रश्न विचारला जात आहे. झाले असे की, जिल्हा परिषदेत एक इच्छुक दाखल झाला.

त्यावर एका कार्यकर्त्याने त्यांना नमस्कार घालत काय चाललंय, कधी येता जिल्हा परिषदेत. आम्ही तुमची वाट बघत आहोत. येथे कामे होत नाही. लवकर या, असे सांगितले. त्यावर त्या इच्छुकाने सांगितले की, तयारी तर जोरात आहे.

मात्र, आमचा योग काही दिसत नाही. निवडणुका कधी होतील, हे सांगता येत नाही. त्यामुळे सारं अंधातरी असल्याचे बोलून दाखवले. त्यानंतर दोघांनी चायचा प्याला घेत इच्छुक आल्या पावले निघून गेले.

Voting
SAKAL Special : चालता-बोलता

बालाजीला बँकेची शाखा पाहिजे राव

सहकरी बँकांची निवडणूक म्हटली, की शासकीय कर्मचाऱ्यांच्या अंगावर काटाच येतो. त्यात मतमोजणीच्या टेबलवरचा गोंधळ तर विचारायलाच नको. तर झाले असे की, नावातच ‘नाम’को असलेल्या बँकेची निवडणूक नुकतीच पार पडली.

यात विरोधी पॅनलमध्ये ‘फुसके’ उमेदवार असल्याने मतमोजणीचे फार टेन्शन नव्हते. पण एकदाचे काम संपवलेले बरे म्हणून कर्मचारी पटापट कामाला लागले. आपल्या टेबलवर आलेल्या सर्व चिठ्ठ्यांची मोजणी झाल्यावर थोडे रिलॅक्स होण्यासाठी बसले.

पण इतक्यात फर्मान आले, की दुसऱ्या राज्यातील मतपेट्यांची मोजणी करा. त्यात एक कर्मचारी म्हटला, की बँकेने आता बालाजीला शाखा काढायला पाहिजे राव. मतपेटी घ्यायला तरी तिथे जाता येईल. यालाच ‘कामात राम’ म्हणतात आता बोला!

Voting
SAKAL Special : चालता-बोलता

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.