Sakal Special : चालता...बोलता...!

अयोध्यात प्रभू श्रीरामचंद्राच्या मूर्तीचा सोमवारी प्राणप्रतिष्ठा सोहळा होणार आहे. या कार्यक्रमाची देशभरात जोरदार तयारी सुरू आहे.
ram mandir
ram mandir esakal
Updated on

..बरं झालं सुटी मिळाली

अयोध्यात प्रभू श्रीरामचंद्राच्या मूर्तीचा सोमवारी प्राणप्रतिष्ठा सोहळा होणार आहे. या कार्यक्रमाची देशभरात जोरदार तयारी सुरू आहे. कार्यक्रमाच्या पार्श्वभूमीवर अयोध्यसह विविध धार्मिक शहरे सजविण्यात आली आहेत. कुठे मंदिराची स्वच्छता सुरू आहे, कुठे राम मंदिरांमध्ये महाआरतीचे आयोजन करण्यात आले आहे.

नाशिकमध्येही भरगच्च कार्यक्रम होणार आहेत. मोतीचूर लाडूचे वाटप होणार आहे. रामकुंड परिसरात दिवे लावले जाणार आहेत. काळाराम मंदिरात महाआरती होणार आहे. या उत्सवासाठी केंद्र सरकारने अर्ध्या दिवसाची सुटी जाहीर केली आहे. राज्यातही शासनाने शासकीय सुटी जाहीर केली आहे.

याच पार्श्वभूमीवर जिल्हा परिषदेतील विविध विभागांत सुटी मिळाल्याची चर्चा रंगली होती. यात एका कर्मचाऱ्याने सांगितले, की या ऐतिहासिक कार्यक्रम ‘याचि देही याचि डोळा’ बघावयाचा असल्याने सतत मोबाईलमध्येच डोके असते. बरे झाले सुटी दिली. नाही तरी, त्या दिवशी कामात मन लागले नसते. सुटी मिळाल्याने कार्यक्रमाचा फुल एन्जॉय होईल, असे सांगत निघून गेला.

(sakal special chalta bolta it is good got leave nashik news )

उद्धव ठाकरे कोणता झेंडा घेतील हाती...

येत्या २३ जानेवारीला शिवसेनाप्रमुख हिंदूहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे यांच्या जयंतीदिनी शिवसेनेत फूट पडल्यानंतर पहिल्यांदाच ठकरे गटातर्फे शहरात पक्षाचे राज्यव्यापी अधिवेशन होणार आहे. मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनीदेखील दोन वर्षांपूर्वी याच मुहूर्तावर आपल्या पक्षाचे अधिवेशन घेत राजकीय भूमिका अन् पक्षाच्या ध्वजात बदल केला होता.

उद्धव ठाकरेंच्या पक्षाची सध्याची परिस्थिती पाहता या मुहूर्तावर उद्धव ठाकरेदेखील आपल्या बंधूंप्रमाणे भूमिका आणि पक्षाचा झेंडा बदलतील का, अशी चर्चा रंगताना दिसून येत आहे.

साईबाबा की जय..!

लहान मुले कधी समोरच्या व्यक्तीची पोलखोल करतील, हे सांगता येत नाही. त्यातल्या त्यात शाळेतील विद्यार्थी तर फारच वात्रट असतात. एका शाळेचे मुख्याध्यापक इमाने इतबारे बसने अप-डाउन करायचे. डोक्याला ऊन लागू नये म्हणून ते रुमाल बांधून प्रवास करीत. वय पन्नाशी पार असल्याने सगळे केस सफेद झालेले. त्यामुळे दाढीही सफेद झाली होती.

डोक्याला रुमाल बांधल्यावर अगदी साईबाबांस्वरूप त्यांचे चित्र तयार व्हायचे. हेच या वात्रट विद्यार्थ्यांनी हेरले आणि मुख्याध्यापक बसमध्ये बसले की ही मुले बसच्या बाहेरून ‘साईबाबा की जय’ म्हणून ओरडायचे. शेवटी मुख्याध्यापकांनी नमते घेतले आणि स्वत:ची दाढी काढून टाकली, आता बोला..!

ram mandir
SAKAL Special : चालता...बोलता...!

बुडाखालीच अंधार

अनेकदा प्रशासन नागरिकांना चांगल्या सवयी लावाव्यात म्हणून नियमानुसार कारवाई करीत असते. त्यास पोलिस यंत्रणाही अपवाद नाही. विशेषतः वाहतूक शाखेकडून शहरात ठिकठिकाणी विनाहेल्मेट, ट्रिपल सीट असे वाहतूक नियमांचे उल्लंघन करणाऱ्या वाहनचालकांविरोधात दंडात्मक कारवाई केली जाते. पोलिसांच्या या कारवाईमुळे अनेकदा बेशिस्त वाहनचालक वाहतूक पोलिसांना पाहून रस्ताही बदलतात.

मात्र, गंगापूर रोडवर असलेल्या पोलिस आयुक्तालयासमोरून बिनधास्तपणे महाविद्यालयीन युवक विनाहेल्मेट, ट्रिपल नव्हे, तर बऱ्याचदा फोरसीट दुचाकीवरून भरधाव जातात. एवढेच नव्हे, तर पोलिस मुख्यालयातून शरणपूर रोडकडे जाण्यासाठी असलेल्या रस्त्यावरून, अगदी पोलिस अधिकाऱ्यांच्या नजरेसमोरून काही युवक हे विनाहेल्मेट व ट्रिपल सीट वाहन चालवून नेतात. त्यांच्यावर मात्र कोणीही कारवाई करीत नाही. बुडाखाली अंधार म्हणतात ते यालाच, असेच सजग नागरिकांचे याबाबत म्हणणे झाले.

रंगेहाथ पकडल्यावर काय बोलणार?

आपल्याकडे ‘कामात राम’ ही म्हण फार प्रसिद्ध आहे. याचा अर्थ एकाच कामात दोन उद्दिष्टे साध्य करणे, असा होत असला तरी वेगवेगळ्या अंगांनी या म्हणीचा उपयोग होऊ लागला आहे. ही संपूर्ण कथा सांगण्याचा उद्देश म्हणजे महोत्सवानिमित्त देशभरातील युवक नाशिकला येऊन गेले. त्यात काहींनी नेमून दिलेल्या कामाला प्राधान्य दिले. काहींनी भलतेच उद्योग केले.

त्यातल्या त्यात एका टीममधील युवक-युवतींच्या घोळक्यात अडकलेला असताना त्याला आयोजकांनी रंगेहाथ पकडले. आता काय बोलायचे म्हणून त्याने थोडी सारवासारव केली; पण थेट वरिष्ठांपर्यंत हा विषय पोहोचल्याने भाऊंना लागलीच महोत्सवातून काढता पाय घ्यावा लागला. आता घरी गेल्यावर काय होईल, माहीत नाही.

ram mandir
SAKAL Special : चालता-बोलता

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.