मुख्यमंत्र्यांच्या हाती मशाल...
उद्धव ठाकरेंच्या नेतृत्वात वाटचाल करत असलेल्या शिवसेनेची कमान मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आपल्या हाती घेतली. या बरोबरच त्यांना पक्ष अन् पक्षाचे चिन्ह अर्थात धनुष्यबाण देखील प्राप्त झाला. अन् ठाकरेंच्या हाती आली मशाल.
गुरुवारी (ता. ८) महाराष्ट्र पोलिस अकादमी येथे ३४ व्या राज्य पोलिस क्रीडा स्पर्धेचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते क्रीडा ज्योत प्रज्वलित करून स्पर्धेचे उद्घाटन झाले. आता मशाल म्हणजे उद्धव ठाकरे असे राज्यात समीकरण झाले आहे. उद्घाटनासाठी एकनाथ शिंदेंनी मशाल हाती घेतल्याने हा चर्चेचा विषय ठरला.
आधीच ठाकरेंचा धनुष्यबाण हाती घेतलेले शिंदे आता मशाल हाती घेऊ पाहताहेत, ठाकरेंनी याकडे गांभीर्याने लक्ष द्यावे नाहीतर मशालही हातची जायची. अशा काहीशा महत्त्वपूर्ण चर्चा हा सोहळा याची डोळा पाहणाऱ्यांमध्ये रंगला होता.
(sakal special chalta bolta mashal in Chief Minister hand nashik news)
...तर अजून जास्त गर्दी होईल..!
लोकसभा निवडणुकीत उमेदवारीच्या पार्श्वभूमीवर शहरात नुकताच एक कार्यक्रम झाला. मित्र परिवार व हितचिंतकांकडून व्यासपीठ गाठत संबंधित उमेदवाराला समर्थन दर्शविले जात होते. पण या गर्दीत आगळेवेगळे नमुने आढळून नाही आले तर नवलच. एकजण व्यासपीठावर आला अन् मनोगत सुरू केलं.
आधी चार शब्द कौतुकाचे उच्चारल्यानंतर सद्गृहस्थ थेट विषयावर आले. वेळ सायंकाळची होती. त्यामुळे सदगृहस्थ म्हणाले, समर्थनार्थ चांगली गर्दी जमली आहे. सर्वांच्या भोजनाची व्यवस्थाही येथे केली आहे. निवडणुका म्हटल्यावर अशा सभा, बैठका होत राहणार आहेत.
त्यामुळे भविष्यात ‘तामसिक’ (मांसाहारी) खाद्य पदार्थ ठेवले तर आणखी गर्दी होऊ शकेल, असा अजब सल्ला त्यांनी मनोगतातून दिला. इतक्यात सभागृहात झालेल्या हास्यकल्लोळातून संबंधिताला लाजल्यासारखे झाले अन् त्याने मनोगत आटोपते घेतले.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.