SAKAL Special: चालता- बोलता...!

शहरात होमेथॉन या भव्य प्रॉपर्टी एक्स्पोचे आयोजन करण्यात आले आहे. याच्या उद्‌घाटन सोहळ्याप्रसंगी पोलिस आयुक्त संदीप कर्णिक मंचावर आले.
sandip karnik and sudhakar badgujar
sandip karnik and sudhakar badgujar
Updated on

...बहुधा बडगुजर यांच्या प्रकरणात मोठी ‘अपडेट’ असेल

शहरात होमेथॉन या भव्य प्रॉपर्टी एक्स्पोचे आयोजन करण्यात आले आहे. याच्या उद्‌घाटन सोहळ्याप्रसंगी पोलिस आयुक्त संदीप कर्णिक मंचावर आले. लागलीच आयोजकांतर्फे त्यांच्या स्वागत सत्काराची घोषणा करण्यात आली. सत्कारासाठी आयोजक हातात फुलांचा बुके घेऊन, तर हा क्षण कॅमेऱ्यात टिपण्यासाठी छायाचित्रकार सज्ज झाले.

मात्र, आयुक्तसाहेबांना याचवेळी एक फोन आला होता. त्यामुळे सत्कार करण्यासाठी व छायाचित्र काढण्यासाठी आतुर असलेल्यांना आयुक्तसाहेबांनी दोन मिनिटे थांबा, अशी विनंती दोन ते तीन वेळा केली. त्यामुळे सत्कार काही मिनिटांसाठी लांबला अन् उपस्थित प्रेक्षकांमध्ये चर्चांना उधाण आले.

आयुक्तसाहेब सध्या सुधाकर बडगुजर यांची कसून चौकशी करीत आहेत. बहुधा बडगुजर प्रकरणातील मोठी ‘अपडेट’ त्यांच्यासमोर आली असेल म्हणून इतक्या वेळ हा महत्त्वाचा ‘कॉल’ सुरू आहे. आयुक्तसाहेबांनी फोन ठेवला अन् सत्कार स्वीकारला. मात्र, या प्रसंगाने उपस्थितांना चर्चेचा विषय मिळाला. (SAKAL Special chalta bolta nashik political satire crime comedy tragedy news )

राऊतांना ‘नाइंटी’चा डोस...

आक्रमक शैलीतील आंदोलने असो किंवा भाषण यासाठी काही राजकीय नेत्यांनी स्वत:ची वेगळी ओळखच निर्माण केली आहे. अशाच आक्रमक शैलीसाठी परिचित असलेले ‘नीतेश’राव सध्या महाराष्ट्रभर गाजत आहेत.

विधानसभा गाजविल्यानंतर नुकतेच ते नाशिकला येऊन गेले. जाता-जाता त्यांनी आपल्या शैलीत राऊतांना ‘नाइंटी’चा डोस दिला. सकाळी उठल्याबरोबर ‘संजू’भाऊंना लागते. त्याशिवाय, ते बोलूच शकत नाही. हवे तर ते नाशिकला आल्यावर त्यांच्या तोंडाला ‘ब्रेथ ॲनालायझर’ लावून पाहा. नाही त्यातून सत्य उघड झाले तर माझे नाव बदलून ठेवा, असे सांगायलाही त्यांनी मागे-पुढे पाहिले नाही.

sandip karnik and sudhakar badgujar
SAKAL Special: चालता-बोलता !

लई चर्चा नको, नाही तर बदली होईल...

शिक्षण दानाचे काम करणाऱ्या शिक्षकांचे सर्वाधिक प्रश्न असतात. या प्रश्नांसाठी शिक्षक नेहमी आग्रही राहतात. त्यासाठी आंदोलन, उपोषणास्त्रही उगारतात. शिक्षकांचे कितीही प्रश्न सोडविले, तरी त्यांचे प्रश्न सुटत नाहीत. जिल्हा परिषदेच्या शिक्षण विभागात नेहमीत शिक्षक प्रश्न सोडविण्याचे काम सुरू असते.

मात्र, सध्या हे ठिकाण बदलले असून, सामान्य प्रशासन विभागाची धुरा सांभाळत असलेले शिस्तप्रिय अधिकारी हे कर्मचारी असो की शिक्षक... त्यांचे प्रश्न सोडवत आहेत. वेळेत वेतन हा शिक्षकांचा महत्त्वाचा प्रश्न या शिस्तप्रिय अधिकाऱ्याने मार्गी लावला. याशिवाय, निवृत्तांचे निवृत्तिवेतनही महिन्याच्या एक तारखेला मिळत आहे.

शिक्षक प्रश्नांबाबत शिक्षक संघटनांनी शिस्तप्रिय अधिकाऱ्यांची भेट घेतली. यात, शिक्षकांनी एक तारखेला वेतन मिळत असल्याने ‘साहेब, तुमची सर्वत्र चर्चा आहे,’ असे सांगितले. शिस्तप्रिय अधिकाऱ्यांचे कौतुक करण्यासाठी जणू शिक्षकांमध्ये स्पर्धाच लागली होती. अखेर शिस्तप्रिय अधिकाऱ्याने ‘लई चर्चा करू नका, लई चर्चा झाली की त्या अधिकाऱ्याची बदली होते,’ असे सांगितले. त्यावर शिक्षकांनी आवरतं घेतलं.

sandip karnik and sudhakar badgujar
SAKAL Special : चालता-बोलता

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.