SAKAL Special : चालता- बोलता! नीट, नीट अन वीट

SAKAL Special : विविध वैद्यकीय महाविद्यालयांतील पदवीसाठी आवश्यक असलेली केंद्रीय प्रवेश परीक्षा म्हणजेच ‘नीट’ रविवारी (ता. ५) नाशिकमध्ये विविध केंद्रांवर पार पडली.
NEET Admission
NEET Admissionesakal
Updated on

नीट, नीट अन वीट

विविध वैद्यकीय महाविद्यालयांतील पदवीसाठी आवश्यक असलेली केंद्रीय प्रवेश परीक्षा म्हणजेच ‘नीट’ रविवारी (ता. ५) नाशिकमध्ये विविध केंद्रांवर पार पडली. मोठी स्पर्धा आणि कठीण अभ्यासक्रम यामुळे दोन वर्षे विद्यार्थ्यांचा या परीक्षेसाठी कस लागतो. असेच एक कुटुंब आई-वडील, भाऊ, वहिनी, घरातील मुलींबरोबर इंदिरानगर परीक्षा केंद्रावर आले होते.

मुलीला परीक्षेला सोडल्यावर सावलीत हे कुटुंब बसले होते. याच दरम्यान पत्रके वाटत एक मुलगा त्यांच्याजवळ आला. तेव्हा त्यांनाही तो पत्रक देऊ लागला. वडिलांनी विचारले की कसले पत्रक आहे? तर तो म्हटला, की ‘नीट’ परीक्षेसंदर्भात क्लासेस घेणाऱ्या क्लासचे माहितीपत्रक आहे.

यावर ते गृहस्थ म्हणाले, की भाऊ बस कर गड्या आता, दोन वर्षांपासून घरात ‘नीट’, ‘नीट’ आणि फक्त ‘नीट’ हा शब्द ऐकून ‘वीट’ आला आहे. आज एकदाची ही परीक्षा पार पडली, की आम्ही ‘नीट’ घरी जाणार आहोत आणि निकालाची वाट पाहणार आहोत. त्यामुळे तुझा क्लास नको आणि तुझे माहितीपत्रकही नको. हे ऐकल्यावर आसपास असणाऱ्यांत मोठा हशा पिकला. इतर पालकांनीही अगदी बरोबर अशी प्रतिक्रिया नोंदवत आपल्या भावना व्यक्त केल्या.

(SAKAL Special chalta bolta Neat, neat unbrick )

NEET Admission
SAKAL Special : चालता-बोलता : मला उमेदवारी करायची आहे

यांच्याही बाईट घ्या रे...

निवडणुका म्हटले, की एक प्रकारची लगीनघाईच असते. नेत्यांना प्रचारासाठी वेळ कमी पडतो. म्हणून ते रात्रीचा दिवस करतात. त्यात उन्हाचा पारा एवढा वाढलाय, की भरदुपारी घराबाहेर पडणे अशक्य होते. अशा रणरणत्या उन्हात दिंडोरीच्या नेत्यांनी शहरात एका हॉटेलवर पत्रकार परिषद बोलावली.

नेत्यांनी आपले म्हणणे मांडले आणि नाष्टा सुरू झाला. इतक्यात एक नेते तिथे पोहोचले आणि त्यांचा पारा चढला. मला दोनला सांगितले आणि इथे धावपळ करीत आलो तर पत्रकार परिषद झाली. पण. मग मला कशाला बोलावले, असे म्हणत त्यांनी एक-एक ‘कदम’ पुढे टाकत त्रागा केला. त्यांचा राग स्वाभाविक होता.

पण, आता करणार काय तर ‘दुधाची तहान ताकावर’ भागविण्यासाठी ‘मामां’नी शक्कल लढवली. यांचा एक बाईट घ्या रे... असे म्हणत त्यांनी नाराज नेत्यांची मनधरणी करण्याचा प्रयत्न केला. पण, ‘जो बुंद से गई, ओ हौद से आती नही’ याची जाणीव असलेल्या या नेत्याने लागलीच काढता पाय घेतला, आता बोला!

NEET Admission
SAKAL Special : चालता- बोलता! एबी फॉर्मवरील स्पेलिंगने चुकविला काळजाचा ठोका

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.