SAKAL Special : चालता-बोलता! उमेदवारांची मनधरणी

SAKAL Special : निवडणूक म्हटले, की उमेदवारांना चांगलाच भाव चढतो. त्यातल्या त्यात अपक्ष उमेदवारांची मनधरणी करायचे म्हटले, की विचारायलाच नको.
Candidate
Candidate esakal
Updated on

उमेदवारांची मनधरणी

निवडणूक म्हटले, की उमेदवारांना चांगलाच भाव चढतो. त्यातल्या त्यात अपक्ष उमेदवारांची मनधरणी करायचे म्हटले, की विचारायलाच नको. दिंडोरी मतदारसंघातील असाच एक उमेदवार माघार घेण्यासाठी जिल्हाधिकारी कार्यालयात पोचला. पण अधिकाऱ्यांच्या दालनापर्यंत तो काही पोचेना. मागे-पुढे बघत-बघत चालू लागला.

यांना माघार घ्यायची आहे की नाही, असे वाटू लागल्यावर त्यांच्या मित्राने अखेर विचारणा केलीच, ‘तुम्ही माघार घेणार आहात की नाही’. यावर भाऊ म्हणतात, ‘हो, मी माघार घेण्यासाठीच आलोय; पण आमचे देवळ्याचे काही माणसं येत आहेत. त्यांना येऊ द्या!’ शेवटी उमेदवार त्यांच्या कानाजवळ गेला आणि काहीतरी कानमंत्र दिला.

कानमंत्र मिळताच उमेदवार पळतपळत गेला आणि अर्ज मागे घेतला. उमेदवारी अर्ज मागे का घेतला म्हणून त्याला विचारले तर, समविचारी पक्ष असल्याने पक्षादेश पाळावा लागतो, असा अजब खुलासा करून निघून गेला. मग तास-दीडतास का घुटमळत होते, असा विचार करत लोकांनी डोकं खाजवायला सुरवात केली, आता बोला!

(SAKAL Special chalta bolta, One candidate from Dindori Constituency withdrew his application)

Candidate
SAKAL Special : चालता- बोलता! एबी फॉर्मवरील स्पेलिंगने चुकविला काळजाचा ठोका

जमिनीवरचे अण्णा

नेत्यांची वागण्याची, बोलण्याची खास शैली असते. काही नेते मवाळ असतात, तर काही तोंडाळ. याचा त्यांना कधी कधी फटकाही बसतो म्हणा. पण सत्ता गेली, की शहाणपणही जाते. तशीच गेल्या पाच वर्षांपूर्वी सत्ता गेलेले ‘अण्णा’ सध्या खुद्दारांच्या पक्षात आहेत. चिन्ह बदलले असेल, पण रुबाब कायम असल्यामुळे त्यांची आजही चलती दिसून येते.

गेल्या वेळी ज्या उमेदवाराचे काम केले त्याच्या विरोधी उमेदवाराचे काम सध्या त्यांच्याकडे आहे. त्यांच्यासाठी एका उमेदवाराची मनधरणी करून माघार घेण्यासाठी ते जिल्हाधिकारी कार्यालयात पोचले. तेथे येताच त्यांनी ‘एकसे बढकर एक’ किस्से सांगायला सुरवात केली. आपण विमानातून प्रवास केल्यामुळे आपल्यावर वरिष्ठांनी शंका घेतली.

पण आपला इमान पक्षाशी असल्याने आपण कुठेही जाणार नाही, हे सांगत असताना त्यांनी एक शेरही म्हटला. शेर चांगला वाटला म्हणून कॅमेरामनने तो टिपण्याचा प्रयत्न केला. पण याच कॅमेऱ्यामुळे मी पडलो, याची जाणीव असलेल्या अण्णांनी कॅमेरा बंद करण्याची विनंती केली. आपण आता जमिनीवरचे नेते झालो आहोत, याची जणू आठवणच त्यांनी करून दिली.

Candidate
SAKAL Special : चालता- बोलता! साहेब, आता थांबायचे नाय...

महाविकास आघाडी रॅलीला ‘खुन्नस’

लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर महाविकास आघाडी उमेदवाराच्या समर्थनार्थ सोमवारी (ता. ६) सकाळी सिडको परिसरात रॅली काढण्यात आली. ही रॅली भाजपच्या एका माजी नगरसेवकाच्या कार्यालयाजवळ पोचली. दरम्यान, या माजी नगरसेवकाने रॅलीसमोर उभे राहून धनुष्यबाणाचे चिन्ह दाखवत हातवारे केले.

त्यामुळे महाविकास आघाडीचे कार्यकर्ते चांगलेच संतापले. परंतु दोन्ही बाजूंच्या समर्थकांनी संयम ठेवल्यामुळे पुढील अनर्थ टळला. यासंदर्भाचा व्हिडिओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल झाला. त्यामुळे महाविकास आघाडी व महायुतीच्या समर्थकांत भविष्यात विकासापेक्षा अशाच प्रकारचे राजकीय युद्ध बघायला मिळते की काय, अशी चर्चा उपस्थित मतदाररांमध्ये रंगताना दिसून आली.

Candidate
SAKAL Special : चालता- बोलता! नीट, नीट अन वीट

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.