SAKAL Special : चालता-बोलता! आम्ही करतोय तेवढे उद्योग पुरे

SAKAL Special : विधान परिषदेच्या वरिष्ठ सभागृहात समाजातील विविध घटक जसे, की शिक्षक, पदवीधर तसेच समाजातील विविध क्षेत्रांतील उल्लेखनीय काम करणाऱ्यांना संधी दिली जाते.
legislative council
legislative councilesakal
Updated on

आम्ही करतोय तेवढे उद्योग पुरे

राज्यात विधानसभेबरोबरच विधान परिषदेची निर्मिती करण्यात आली आहे. विधान परिषदेच्या वरिष्ठ सभागृहात समाजातील विविध घटक जसे, की शिक्षक, पदवीधर तसेच समाजातील विविध क्षेत्रांतील उल्लेखनीय काम करणाऱ्यांना संधी दिली जाते. असे असले, तरी हल्ली या सभागृहात राजकीय पक्षांकडून सोयीसाठी राजकीय व्यक्तींची नियुक्ती होत आहे.

तर झाले असे, की उद्योगमंत्र्यांनी व्यापारी व व्यावसायिकांची एकत्रित बैठक आयोजित केली होती. बैठकीत व्यापाऱ्यांनी त्यांचे प्रश्न तर मांडले. या प्रश्नांची सोडवणूक करण्यासाठी विधान परिषदेवर व्यापारी गटातून एक आमदार असावा, असे विचार मांडले.

त्यावर, मंत्रिमहोदय यांनी प्रत्युत्तर देत आम्ही करतोय तेवढे उद्योग पुरे आहेत. तुमच्या समस्या सोडविण्यासाठी आम्ही आहोत. त्यामुळे व्यापाऱ्यांचा विधान परिषदेत जाण्याचा प्रस्ताव हा मांडल्याक्षणीच बारगळल्याची चर्चा आहे.

(SAKAL Special chalta bolta one MLA from traders group on legislative council to resolve issues of traders)

legislative council
SAKAL Special : चालता-बोलता! राज ठाकरे आप्पांसाठी सभा घेतील?

वो पुरानी यादे

एकेकाळी शहरात आजूबाजूच्या ग्रामीण गावातून नागरिक यायचे. आले म्हणजे आठवड्याचा बाजारहाट करायचे. गोडधोड खायचे. तर काहीजण त्या वेळी असलेल्या चित्रपटगृहात चित्रपटही पाहून जायचे. काहीजण जर जोडीने यायचे. काहींना तर दोन-चार वर्षांतून कधीतरी यायला जमायचे.

असे एक वृद्ध दांपत्य अशोक स्तंभावरील विकास थिएटरच्या आवारात आले. दांपत्य मोठ्या हौशीने थिएटरकडे पाहात आत आले. परंतु आवारातील एकूण परिस्थिती पाहून ते थोडेस हबकले. थिएटरवर कोणत्याही चित्रपटाचे पोस्टर नव्हते. आजोबा जरा थांबले. पण आजीबाई तरातरा पुढे गेल्या.

त्यांनी एकाला विचारले, ‘‘भाऊ हे सिनेमाचच थिएटर ना...’’ हो, पण ते बंद पडले कैक वर्षांपासून. बाबा हसले, ‘‘लय वर्षांनो आलो, चला’ असे म्हणताच पुढे गेलेल्या आजीबाई पुन्हा बाबांच्या मागंमागं गेटच्या बाहेर पडल्या. दोघांनी परत एकदा थिएटरकडे वळून पाहिलं आणि वडापावच्या दुकानाकडे गेले. पण त्यांच्या चेहऱ्यावरचे भाव सांगून गेले, ‘वो पुरानी यादे....’ (latest marathi news)

legislative council
SAKAL Special : चालता-बोलता! गडी निघाला एकटा

हसू पोटातल्या पोटात दाबले

आपल्या महाराष्ट्राचे लाडके व्यक्तिमत्त्व, सर्वाधिक वेळ काम करणारे, सर्वसामान्यांना न्याय हक्क मिळवून देणारे ऽऽऽ असे आमचे, तुम्हा, आम्हा सर्वांचे लाडके मुख्यमंत्री ऽऽऽ यांचे व्यासपीठावर आगमन होत आहे... अशी उद्‌घोषणा झाली आणि दरवाजातून मुख्यमंत्र्यांऐवजी मंत्रिमहोदय प्रकटले. सभागृहात थोडा हास्यकल्लोळ झाला.

कारण जास्त हसलो, तर मंत्रिमहोदयांचा पारा चढायचा. म्हणून लोकांनी आपले हसू पोटातल्या पोटात दाबले. बराच वेळ झाला तरी महोदय काही सभागृहापर्यंत येईना. मग वेळ कसा काढायचा, म्हणून सभेला उपस्थित संघटनांची खात्री करून घेतली. ज्यांची नावे घ्यायची राहिली आहेत, त्यांना स्टेजजवळ बोलवून घेतले.

त्यांच्याकडून संघटनेचे नाव लिहून घेत असतानाच महोदयांचे आगमन झाले. व्यासपीठावरील विशेष खुर्ची त्यांनी बाजूला करायला लावली. सर्वसामान्यांचे सर्वसामान्य सरकार असल्याची प्रचीती त्यांनी दाखवून दिली. पुढे महोदयांनी लांबलचक भाषण केलं आणि ते निघून गेले.

legislative council
SAKAL Special : चालता-बोलता! उमेदवारांची मनधरणी

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.