रविवार म्हटला, की मित्रांचे भेटणे आणि पार्टी ठरलेली असते. असे काही ज्येष्ठ नागरिक असलेल्या मित्रांनी पार्टीचे नियोजन केले. निसर्गाच्या सान्निध्यात पुन्हा बालपणाप्रमाणे मुक्तपणे हिंडण्याचा बेत आखला.
मित्रांची भर पडत गेली तसा बेतही वाढत गेला. मटनाचा बेत, त्यासाठी बोकड घेतला आणि गाड्या काढून आदिवासी परिसरात गेले.
(SAKAL Special chalta bolta political satire comedy tragedy teacher party mutton food nashik news)
आदिवासी पाड्यावरचाच स्वयंपाकी आणला. स्वयंपाक होऊपर्यंत प्लॅस्टिकच्या ग्लासातील पेयांनी झिंग वाढू लागली. अनेकांचे लक्ष मटनाच्या तर्रीदार रश्शाकडे लागले होते. या मित्रांपैकी एक होते निवृत्त शिक्षक.
ते सारखे भाजीच्या पातेल्याकडे जायचे आणि वास घेऊन परत यायचे. भारी झालाय बरंका असे म्हणायचे. त्यांनी स्वयंपाक्याला सांगूनही ठेवले, पहिल्या रश्शाची चव मलाच द्यायची. तशी स्वयंपाक्याने त्यांना आवाज दिला.
त्याला समजलं, रस्सा झाला.. ते गेले आणि कागदी द्रोणमध्ये रस्सा घेतला. कागदी द्रोणमधील रस्स्याला फुरका मारताच रस्सा त्यांच्या अंगावर सांडला, सारा शर्ट भरला. द्रोण तसा फेकून तो धुण्यासाठी पळाले. इतरांना वाटले मास्तरला चढली म्हणून ते पळायले. पण रश्श्याने मास्तरला पळवले हे अनेकांना कळलेच नाही...
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.