SAKAL Special : चालता-बोलता! राज ठाकरे आप्पांसाठी सभा घेतील?

SAKAL Special : महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासाठी महायुतीला बिनशर्त पाठिंबा जाहीर केल्यावर मनसैनिक धडाडीने उमेदवारांच्या प्रचाराला लागले.
Raj Thackeray (file photo)
Raj Thackeray (file photo)esakal
Updated on

राज ठाकरे आप्पांसाठी सभा घेतील?

महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासाठी महायुतीला बिनशर्त पाठिंबा जाहीर केल्यावर मनसैनिक धडाडीने उमेदवारांच्या प्रचाराला लागले. खुद्द राज ठाकरे हेही प्रचाराच्या रिंगणात उतरले असून, त्यांनी कोकणात नारायण राणे यांच्यासाठी सभा घेतली.

यासह त्यांच्या अजून काही सभांचे नियोजन करण्यात आले आहे. नाशिकमध्ये महायुतीचे हेमंत गोडसे उमेदवार आहेत. एकेकाळचे मनसैनिक राहिलेल्या गोडसेंनी २००९ मध्ये मनसेतर्फे लोकसभा निवडणूक लढवून चांगलीच मते मिळविली होती.

मात्र पुढच्या काही दिवसांत मनसेला सोडचिठ्ठी दिली होती. मनसेला रामराम केलेल्या गोडसे आप्पांच्या प्रचारासाठी राज ठाकरे सभा घेतील का, याची उत्सुकता नाशिकरांना लागली आहे.

(SAKAL Special chalta bolta Raj Thackeray entered campaign arena and held meeting for Narayan Rane)

Raj Thackeray (file photo)
SAKAL Special : चालता- बोलता! कांदा वादा करतो की काय

एका बॅनरवर दोन आप्पा कसे?

विजय करंजकर यांच्या शिवसेना प्रवेशानिमित्त मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत बुधवारी मनोहर गार्डन येथे मेळावा झाला. शिवसेनेचा पदाधिकारी मेळावा, असे स्वरूप मेळाव्याला असले तरी प्रत्यक्षात करंजकर यांचाच बोलबाला मेळाव्यात दिसून आला. खासदारकीच्या निवडणुकीच्या तयारीचा भाग म्हणून करंजकर यांच्यावर रचलेली गाणे मेळाव्यात लावली गेली.

त्यामुळे गोडसे यांचा प्रचार फिका पडला. व्यासपीठावरील बॅनरवर गोडसे यांचा फोटोच गायब असल्याने मनोमिलन झाल्याचा दावा मुख्यंत्र्यांनी केला असला तरी तो प्रत्यक्षात पावलोपावली जाणवत होता. शिवसेनेच्या शिंदे गटात दोन आप्पा आले असले तरी बॅनरवरून एक आप्पा गायब झाल्याने तो चर्चेचा विषय ठरला. (latest marathi news)

Raj Thackeray (file photo)
SAKAL Special : चालता-बोलता! श्रीराम मंदिराचा प्रश्न मिटला, तर आमचा का नाही ?

सलीम कुत्ता पुन्हा चर्चेत

मुंबई बाँबस्फोट प्रकरणी शिक्षा भोगत असलेल्या सलीम कुत्ता याच्या सोबत ‘मै हू डॉन’ या गाण्यावर नृत्य करताना शिवसेना जिल्हाप्रमुख सुधाकर बडगुजर यांचा व्हिडिओ काही दिवसांपूर्वी व्हायरल झाला होता. त्याचाच आधार घेऊन विधानसभेत चौकशीची घोषणा करण्यात आली. चौकशीचे पुढे काय झाले?

याबाबत अद्याप माहिती नसली तरी मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीतील मेळाव्यात मात्र तो विषय पुन्हा चर्चेला आला. पालकमंत्री दादा भुसे यांनी मुख्यमंत्र्यांनीच आता लक्ष देण्याचा सल्ला दिला, तर मुख्यंत्र्यांनीही मागोवा घेणार असल्याचे सांगून प्रतिस्पर्ध्यांना गर्भित इशारा तर दिला नाही ना? अशी चर्चा होती.

Raj Thackeray (file photo)
SAKAL Special : चालता- बोलता! साहेब, आता थांबायचे नाय...

डॉक्टरांची अशीही सारवासारव

एकापाठोपाठ एक निवडणूक सभा होत असल्याने मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या चेहऱ्यावर व आवाजात तणाव दिसत होता. या तणावातूनच त्यांनी गोडसेंचा उल्लेख डॉक्टर असा केल्यानंतर सभागृहात हशा पिकला. परंतु मुख्यमंत्र्यांनी दहा वर्षे खासदार झालेला माणूस त्या क्षेत्रात डॉक्टर झालाच की, असे सांगत सारवासावर केली.

Raj Thackeray (file photo)
SAKAL Special : चालता-बोलता! उमेदवारांची मनधरणी

शिक्षक नसलेला सर

शिक्षकांना समाजात आदराचे स्थान असते. पिढी घडविण्याचे सत्कार्य शिक्षकांकडून होत असल्याने त्यांच्याबद्दल जनमानसात ही भावना रुजली असावी. पण, हल्ली प्रत्येक गावात जसा एक आमदार, खासदार असतो, तसेच शिक्षकांच्या बाबतीत व्हायला लागले आहे. टोपण नावाने कुणाला गुरुजी म्हणतात, तर कुणाला सर.

पण, त्याचा अर्थ असा नाही की तो शिक्षक झाला. तर झाले असे, की लोकसभेच्या निवडणुकीत एका मतदारसंघात एक उमेदवार उभा राहिला. रोजंदारीने काम करणाऱ्या या उमेदवाराने स्वत:च्या नावापुढे सर अशी उपाधी लावली आहे.

शिक्षक नसताना केवळ नामसाधर्म्याचा फायदा उठविण्यासाठी खेळलेली ही खेळी उमेदवारांची विचारधारा सिद्ध करणारी आहे. असो, त्याचा कितपत फायदा होईल, हे येत्या काळात स्पष्ट होईलच.

Raj Thackeray (file photo)
SAKAL Special : चालता-बोलता! गडी निघाला एकटा

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.