Sakal Special : चालता...बोलता...! जय श्रीराम नव्हे, जय सियारामचा नारा द्या

अयोध्येतील प्रभू श्रीराम मूर्ती प्राणप्रतिष्ठेनिमित्त धार्मिक आणि राजकीय वातावरण ढवळून निघाले आहे.
Ayodhya Ram Mandir
Ayodhya Ram Mandiresakal
Updated on

जय श्रीराम नव्हे, जय सियारामचा नारा द्या

अयोध्येतील प्रभू श्रीराम मूर्ती प्राणप्रतिष्ठेनिमित्त धार्मिक आणि राजकीय वातावरण ढवळून निघाले आहे. राज्यासह शहरातील विविध भागांत रामभक्तांचा उत्साह ओसंडून वाहत आहे. राजकीय पातळीवर राम कोणाचा हे दाखवण्याची जणू स्पर्धाच लागली आहे.

भाजपकडून ठिकठिकाणी कार्यक्रमांचे आयोजन केले. त्याला विरोधकांनी उत्तर देण्याचा प्रयत्न केला. तर झाले असे की, सकाळपासून सोशल मीडियावर शुभेच्छांची देवाण घेवाण सुरू होती. त्यात काँग्रेसच्या कार्यकर्त्यांकडून ओघानेच जय श्रीरामचा नारा देण्यात येत आहे.

ही बाब, शहर काँग्रेसच्या डॉक्टर असलेल्या एका ज्येष्ठ नेत्यास खटकली. त्यांनी आंदोलनानिमित्त जमलेल्या कार्यकर्त्यांस ‘अरे आपली घोषणा जय सियाराम आहे. जय श्रीराम तर, सत्ताधाऱ्यांचा नारा आहे. आपण जय सियारामची घोषणा देत व्हॉट्स अॅपवर जनजागृती करा’, असा सल्ला दिला.

(Sakal Special chalta bolta Shout Jai Siyaram not Jai Shri Ram nashik news)

राजकारणाचे हॉट केंद्र नाशिक

आगामी लोकसभा निवडणुकीचे पडघम वाजू लागले आहेत. सत्ताधाऱ्यांसह विरोधकांकडून निवडणुकीची तयारी सुरू झाली आहे. नाशिकमध्ये राष्ट्रीय युवा महोत्सवाच्या माध्यमातून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना बोलावून निवडणुकीचा जणू नारळच फोडला. शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी पक्षाचे अधिवेशन नाशिक येथे घेत जाहीर सभाही घेतली.

या पाठोपाठ आता केंद्रीय सहकारमंत्री अमित शहा शहरात येत आहेत. या पार्श्वभूमीवर शासकीय कार्यालयांत पुन्हा धावपळ सुरू झाली आहे. जिल्हा परिषदेतील एका कार्यालयात याच विषयावर चर्चा रंगली. यात एका कर्मचाऱ्याने सांगितले की, हल्ली नाशिकचे महत्त्व वाढले आहे.

पंतप्रधान मोदी, केंद्रीयमंत्री अमित शहा, शिवसेनेचे पक्षप्रमुख ठाकरे शहरात येत आहेत. नाशिक तर, राजकारणाचे हॉट केंद्र झाले आहे जणू असे मत मांडले. यावर दुसऱ्या कर्मचाऱ्याने ‘यात आपल्याला काही मिळणार आहे का? आपल्या कामात बदल होणार का? चल काम कर’, अशी प्रतिक्रिया देत चर्चेची हवाच काढून घेतली.

Ayodhya Ram Mandir
SAKAL Special : चालता... बोलता;..जणू ZPवर आली संक्रात!

..अन् स्वत:लाच दिला रिप्लाय

निवडणुकीचे वारे जसजसे वाहू लागले आहेत तसे सर्वच राजकीय पक्षांचे पदाधिकारी, आजी-माजी लोकप्रतिनिधी ‘ॲक्टिव्ह’ होऊ लागले आहेत. आपल्या संपर्कातील मतदारांना स्वत:हून संपर्क साधू लागले आहेत. जाता-येता विचारपूसही करू लागले आहेत. काहींना तर अशा मंडळीच्या वागण्याचा धक्का बसू लागलाय तर काहींना ‘निवडणूक आली ना...’ याची जाणीव होत आहे.

अशाच एका माजी लोकप्रतिनिधीने बऱ्याच दिवसांनी नव्हेतर तीन वर्षांनी एका मेडिकल दुकानचालकाला फोन करून विचारपूस केली. चांगल्या गप्पा-टप्पाही झाल्या. जरा वेळाने मेडिकल दुकानदाराने उधारीची नोंद असलेली वही काढून फोन करणाऱ्या माजी लोकप्रतिनिधीच्या नावासमोर असलेल्या उधारीचा फोनमध्ये फोटो काढला आणि माजी लोकप्रतिनिधींचा मूड चांगला असल्याचे पाहून लागलीच त्यांच्या व्हॉटसॲपला सेंड केला.

त्या माजी लोकप्रतिनिधीने मेसेज पाहिलाही पण, रिप्लाय काही दिला नाही. मेडिकल दुकानदाराने जरावेळाने न राहून फोन लावला तर फोनच लागेना. त्या माजी लोकप्रतिनिधीने फोनच ब्लॉक केल्याचे मेडिकलवाल्याच्या लक्षात आले अन्‌ मनातल्या मनात काय रिप्लाय द्यायचा तो स्वत:लाच दिला.

Ayodhya Ram Mandir
Sakal Special : चालता...बोलता...! गुवाहाटीमध्ये इतिहास घडला!

ऑनलाइनचा धसका

कालानुरुप तंत्रज्ञान अवगत करून न घेतल्यास कालबाह्य ठरण्याची शक्यता अधिक असते. पारंपारिक पध्दतीने शिकवणारे शिक्षक याच घटकांमध्ये मोडतात. खडू अन्‌ फळा या प्राचीन पद्धतीला छेद देवून ‘टॅब’द्वारे शिक्षण देण्याचा प्रयत्न काही शिक्षक करत आहेत. तशी घोषणाच शासनाने केल्यामुळे एका ज्येष्ठ शिक्षकाची मात्र भंबेरी उडाली.

त्यांनी तत्काळ तंत्रस्नेही ज्युनिअर शिक्षकांना फोन केला. शासनाने अमुक तमूक निर्णय घेतल्यामुळे आता मला टॅबवर सगळी माहिती भरायची आहे. त्यामुळे तूच मला यातून वाचवू शकते, म्हणून ज्येष्ठ शिक्षक विनंती करतात. एरवी आपल्याशी तोलून मापून बोलणारे हे गुरुजी आज इतके उदार कसे झाले म्हणून हा नवोदित शिक्षकही बुचकळ्यात पडला नसेल तरच नवल...

Ayodhya Ram Mandir
Sakal Special : चालता...बोलतो...!

नातू उपसरपंच झाल्याचे बघायला मिळावं

पिंपळगाव बसवंत ग्रामपंचायतीमध्ये एका पदाधिकाऱ्याच्या निवडीनंतर सोसायटी संचालकांनी शुभेच्छा देताना केलेल्या वक्तव्यामुळे उपस्थितांमध्ये हास्याचे फवारे उडाले. पदाधिकाऱ्याचे वडील माजी ग्रामपंचायत सदस्य असून तेदेखील व्यासपीठावर उपस्थित असल्याने सोसायटी संचालकाने त्यांना उद्देशून तुमच्या नशिबी उपसरपंचपद नव्हते पण तुमच्या मुलांच्या भाळी ते लिहिलेले होते. भविष्यात तुमचा नातूही उपसरपंच होईल, असे भाकीत केले.

त्यावर माजी सदस्य राहिलेल्या या ज्येष्ठाने नातू उपसरपंच होईल तेव्हा ते बघायला मी हयात पाहिजे, अशी कोटी केली. यामुळे सभागृहातील उपस्थितांना हसू आवरले नाही. तर पदाधिकाऱ्याने राजकारण प्रवेशाचा किस्सा सांगताना पिंपळगाव सोसायटी निवडणुकीत वडीलांच्या अर्जाला डमी अर्ज माझा भरल्याचे सांगितले. त्यावर एका मित्राने अप्पाच डमी झाले, अशी प्रतिक्रिया दिल्याने उपस्थितांना पुन्हा खदखदून हसू आले.

Ayodhya Ram Mandir
SAKAL Special : चालता...बोलता...! उद्धव ठाकरेंनी रुद्राक्ष घेतला हाती..

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.