गडी निघाला एकटा
निवडणूक म्हटले की उमेदवाराबरोबर शेकडो कार्यकर्त्यांची फौज लागते. प्रचारासाठी गाड्या, रात्री हॉटेलमध्ये कार्यकर्त्यांना जेवण असा सगळा लवाजमा सांभाळणे येड्यागबाळ्याचे काम नाही. त्यामुळेच निवडणुका म्हटले, की भल्याभल्यांना घाम फुटतो; पण नाशिकमध्ये असाही एक उमेदवार आहे, ज्याला कार्यकर्त्यांची काहीच आवश्यकता भासत नाही.
स्वत:च्या दुचाकीवर स्वत:च्या नावाचा फलक लावून हा उमेदवार प्रचार करीत आहे. परवानगीसाठी जिल्हाधिकारी कार्यालयात आलेल्या चारचाकी वाहनांच्या गराड्यात भाऊंची दुचाकी शिरते. यांची गाडी कशाला आली म्हणून ‘आरटीओ’वाले त्यांना अडवितात.
आपणही उमेदवारांच्या आखाड्यात असल्याचे त्यांनी सांगितले आणि आपणच खासदार होणार, अशा आविर्भावात ते परवानगी घेऊन निघून जातात, जणू आता दिल्लीतच थांबतील.
(SAKAL Special Chalta Bolta There is also candidate in Nashik who does not seem to need workers)
याचसाठी केला होता का अट्टाहास!
निवडणुका म्हटले, की उमेदवारांच्या अंगात नुसते भूत संचारते. काय करू अन् काय नको, अशी गत इच्छुकांची होते. उमेदवारी मिळविण्यासाठी इच्छुक अगदी जंग जंग पछाडतात. इच्छुकांसोबत त्यांचे ठराविक कार्यकर्ते कम स्वीय सहाय्यक उमेदवाराला घोड्यावर बसविण्यासाठी आघाडीवर असतात.
त्यात आता देशातील सर्वांत मोठा उत्सव असलेल्या लोकसभेची निवडणुक सुरू आहे. त्यामुळे पहिल्या दिवसापासून उमेदवारी अर्ज भरतात. विजय आता आपलाच, अशा आविर्भावात चार दिवस प्रचारही करून घेतात. माघारीचा दिवस जसा उजाडतो तसा भाऊचा चेहरा पडायला सुरवात होते.
भरदुपारी आपल्याला कोणी पाहणार नाही, याची काळजी घेत अलगदपणे आपला अर्ज माघारी घेतात. आपल्यासोबत अर्ज भरायला आलेले कार्यकर्तेही तितंपर्यंत येण्याचा त्रास करून घेत नाही. मग हेच कार्यकर्ते भाऊंना सोशल मीडियावर मेसेज करतात, की याचसाठी केला होता का अट्टाहास!
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.