SAKAL Special: चालता- बोलता

Bike Challan
Bike Challanesakal
Updated on

ते रेटकार्ड ठेवा तुमच्या खिशात

नाशिक शहराच्या मध्यवर्ती भागात दुचाकीस्वाराला सिग्नल तोडल्याने पोलिसदादांनी अडवलं. ‘तुम्ही सिग्नल तोडला आहे, आता तुम्हाला दंड भरावा लागेल’ असं म्हणत दंडाची रक्कम असलेला एक चार्ट या दुचाकीस्वाराला दाखविला.

मात्र, त्यावर हा दुचाकीस्वार लागलीच उत्तरला, ‘साहेब, ते रेटकार्ड ठेवा तुमच्या खिशात. काय घ्यायचं ते घेऊन टाका आणि मला जाऊ द्या, घाई आहे...’ आता हे महाशय घेऊन टाका म्हणत असल्याने पोलिसदादा तरी काय करणार..? (SAKAL Special chalta bolta traffic police tragedy comedy humour nashik)

मोबाईल व्यसनाचा असाही प्रताप

मोबाईलचे व्यसन माणसाला जडलं आहे, हे आता लपून राहिले नाही; परंतु मोबाईलचे वेड किती असावे, यालाही काही मर्यादा आहे. मर्यादा तोडणारी अशीच एक घटना नाशिकमध्ये चवीने चर्चेला येत आहे.

त्याचे झाले असे : एका महाशयाला मोबाईलचे वेड इतके लागले, की गाडीवर फेरफटका मारतानाही त्याच्या कानाला मोबाईल लागलेलाच असतो. एके दिवशी असाच टू-व्हीलरवर फेरफटका मारताना ओळखीचा एकजण भेटला.

त्याला हात देण्याच्या नादात महाशय गाडीवरून पडले. बरे पडले तर उठून सारवासारव करायचे सोडून, कसे काय बरे ना असे झोपूनच समोरच्याला विचारत मोबाईलवर बोलण्याचा उपक्रम सुरू ठेवला. त्यांच्या या मोबाईल व्यसनाला लोकांनी वेडं ठरवतं हसू आवरले.

Bike Challan
SAKAL Special: चालता... बोलता...

ही नोट पाकिस्‍तानची आहे का..?

बरं तर ऑनलाइन व्‍यवहारांमुळे सुटे पैसे अन्‌ कळकटलेल्‍या नोंटांचे व्‍यावसायिकांचे टेन्‍शन कमी झाले आहे. पण, व्‍यवहारातील गमतीजमती घडल्‍यावाचून राहत नाहीत. चहाच्‍या दुकानात असाच एक रंजक किस्सा घडला.

दोन मित्र चहाचा आस्‍वाद घेण्यासाठी दुकानात दाखल झाले अन्‌ चहाची ऑर्डर दिली. सेल्‍फ सर्व्हिस असल्‍याने एकाने पुढे होत खिशातून नोटा काढल्‍या. चोवीस रुपये बिल झालेले असताना, दोन दहाच्‍या जरा जुन्‍याच अन्‌ एक पाच रुपयांची कोरी करकरीत नोट काढली.

नोट नवी असल्‍याने द्यावी की नाही, या मोहात काही क्षण विचार करताना अखेर युवकाने पैसे देण्यासाठी नोटा पुढे केल्‍या. सध्याच्‍या डॉलरच्‍या जमान्‍यात पाचची नोट दुकानातील कामगाराने कदाचित पाहिलेली नसावी.

अशात ही नोट पाहत जणू ग्राहकाने चूकच केली की काय, अशा नजरेने पाहत आपल्‍या शेठला त्‍याने झटक्‍यात नोट दाखवत विचारले, ‘यांनी पाचची नोट दिली आहे, घेऊ की नको’ करकरीत नोट मोडावी लागलेली असतानाही अनपेक्षित प्रश्‍न ऐकून ग्राहक म्‍हणाला,

‘अहो ही काय पाकिस्‍तानची नोट आहे का, घेऊ की नको म्‍हणताय.’ इतक्‍यात शेठ, कामगार अन्‌ दोन्‍ही युवकांसह उपस्‍थित सर्वांच्‍या चेहऱ्यावर हसू सुटले अन्‌ पुन्‍हा सर्व आपापल्‍या कामाला लागले.

Bike Challan
SAKAL Special: चालता...बोलता

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.