कुटुंबातूनच बोलती झाली बंद
इलेक्ट्रॉनिक व्होटिंग मशिन हा सध्या चर्चेचा विषय आहे. निवडून आलेल्या पक्षाकडून त्याचे समर्थन केले जाते. परंतु विजयाची गॅरंटी असूनही पराभव झाल्यानंतर ईव्हीएमवर बोट ठेवले जाते.
त्यामुळे निवडणूक आयोगाने ईव्हीएम मशिनवरचा विश्वास अधिक वृद्धिंगत होण्यासाठी सध्या सेशन सुरू केले आहे. ईव्हीएमसंदर्भात माहिती, त्याचे फायदे पटवून दिले जात आहेत. सध्या पराभूत झालेल्या उमेदवारांकडून इव्हीएम बदनाम होत आहे.
सार्वजनिक ठिकाणी चर्चा घडविताना थेट विरोध होत असला तरी घरात मात्र चांगलीच पंचायत होते. त्याचे असे झाले. विरोधी पक्षाचा पदाधिकारी असलेल्या एकाने विरोधी पक्ष पाचही राज्यांत बाजी मारेल, असा दावा केला होता.
परंतु प्रत्यक्षात निवडणुकीचा निकाल वेगळा आल्यानंतर ईव्हीएमला दोष देण्यात आला. त्यावर पत्नीने कर्नाटक व तेलंगणाबाबत काय म्हणाल? असे विचारताच त्याची बोलती बंद झाली. (SAKAL Special chalta bolta tragedy comedy political satire movies nashik)
स्पर्धेमध्ये चक्क सिरियलचं प्रमोशन
नाशिकमध्ये सध्या ६२ वी राज्य नाट्य स्पर्धा सुरू असल्याने नाट्यरसिकांना रोजच नाटकांची मेजवानी मिळत आहे. हौशी कलावंतांचे हक्काचे व्यासपीठ मानल्या जाणाऱ्या या स्पर्धेत कलावंत आपली कला प्रेक्षकांसमोर सादर करत आहेत.
गुरुवारी (ता. ७) असाच एका नाटकाचा प्रयोग सुरू होता. त्यात एका मराठी मालिकेत काम करणाऱ्या कलावंतांचा सहभाग होता.
नाटकाच्या सादरीकरणात एका प्रसंगात त्यांच्या मालिकेचा उल्लेख करण्यात आला अन् मागे बसलेले काही दर्दी रसिक कुजबूज करायला लागले. ‘अरेच्चा, स्पर्धेच्या नाटकात चक्क सिरियलचं प्रमोशन, हे तर अनोखच आहे बाबा...’
राजे जिथे-तिथे तुमचीच चर्चा...
मराठा योद्धा मनोज जरांगे-पाटील आणि हेविवेट नेते छगन भुजबळ यांनी राज्यभरात आरोप-प्रत्यारोपांची राळ उठवली आहे. जरांगे यांनी तर भुजबळांना लोळवण्याची भाषा केली आहे.
अर्थात, निवडणुकीत बरं का... नाही तर तुम्हाला वाटेल कुस्तीच्या आखाड्यात. यावरून सध्या गावोगावी चर्चा सुरू झाली आहे. त्याचे झाले असे की, येवला मतदारसंघातून भुजबळांना नेहमी आवाहन देत असलेले राजे.
यंदा चांगलेच फॉर्मात आहेत. मिनी मंत्रालयात राजे नेहमीप्रमाणे दाखल झाले, तेथे त्यांना मतदारसंघातील ग्रामपंचायतीतील पदाधिकारी भेटले. या भेटीत राजकीय चर्चेला फोडणी तर मिळणारच. राजे गावा- गावांत तुमच्याच नावाची चर्चा सुरू झाली आहे.
खरं सांगतो बरं का. तेव्हा तुम्ही आता जोमाने कामाला लागा, असे एका पदाधिकाऱ्याने राजेंच्या कानात सांगितले. त्यावर राजे मनसोक्त हसले. निवडणुकीला टाइम आहे, लई घडामोडी होणार आहेत. त्यामुळे बघू काय होत, ते असे सांगत राजे चालते झाले.
वाट, बघतोय रिक्षावाला...
काही लोकांना फिरण्याची भारी हौस असते. दर वर्षी वेगवेगळ्या राज्यांत जाऊन तेथील प्रसिद्ध ठिकाणांना ते भेट देत असतात. असेच दोन मित्र दक्षिण भारताच्या भ्रमंतीला निघाले. ऐन दिवाळीच्या काळात त्यांचे भ्रमण सुरू झाले.
मात्र रेल्वेगाड्या आधीच गर्दीने तुडुंब. या गर्दीत आपली जागा शोधून प्रवासाचा आनंद घेत पुढे-पुढे जाणाऱ्या या मित्रांनी एक दिवस ‘शेअरिंगची रिक्षा’ भाड्याने घेतली. त्यात तेलगू भाषिक नवविवाहित दांपत्य बसले.
त्यांना जरा हौस करायची म्हणून ते सेल्फी घेत असतात. पण हे काही रिक्षावाल्याला सहन होईना. त्याने तामिळ भाषेत आकाडतांडव करायला सुरवात केली.
हा रिक्षावाला ज्यांना बोलत होता, ते तेलगू भाषिक आणि ज्यांच्यासमोर बोलत होता, ते मराठी भाषिक. यात कोणालाच काही कळले काही, फक्त त्याचा आक्रस्ताळेपणाच तेवढा लक्षात राहिला...
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.