SAKAL Special : चालता...बोलता...!

मी मंत्री गिरीश महाजन असे सांगण्याची वेळ जेव्हा आली, त्या वेळी मंत्र्यांना अजून नाशिकमध्ये खूप काम करण्याची आवश्‍यकता वाटली.
Girish Mahajan
Girish Mahajanesakal
Updated on

मी मंत्री गिरीश महाजन

पंतप्रधान मोदी यांचा कार्यक्रम ज्या स्थळी होता, त्या जागेवर मोठा बंदोबस्त होता. पंतप्रधान ओझर विमानतळावर उतरल्याचे कळल्यावर सुरक्षा यंत्रणा ‘अलर्ट’ झाली. सभास्थळी मुख्य रस्त्यावरून जाताना मंत्र्यांच्या वाहनांनाही प्रवेश नव्हता.

अशात ग्रामविकासमंत्री गिरीश महाजन यांच्या वाहनालाही अडविण्यात आले. सभास्थळी लवकर जायचे म्हणून मुख्य रस्त्यावर अडकलेल्या एकाच्या दुचाकी वाहनाला हात देत महाजन सभास्थळी निघाले.

त्यावेळी सभेच्या ठिकाणी पोलिसांकडून जाऊ दिले जात नसल्याबद्दल चर्चा झाली. त्या वेळी दुचाकीधारकाने मी पत्रकार असूनही मला जाऊ देत नाही. तुम्ही कोण, असा सवाल केला.

त्या वेळी तुम्ही मला ओळखले का? मी मंत्री गिरीश महाजन असे सांगण्याची वेळ जेव्हा आली, त्या वेळी मंत्र्यांना अजून नाशिकमध्ये खूप काम करण्याची आवश्‍यकता वाटली. (SAKAL Special chalta bolta tragedy comedy political satire nashik news)

विभागप्रमुखांचा प्रमुख झाला ना..!

जिल्हा परिषदेत प्रशासन प्रमुख मुख्य कार्यकारी अधिकारी असून, त्या अंतर्गत विभागप्रमुख कार्यरत आहेत. विभागांमध्ये होणाऱ्या निर्णय, अडचणी याची माहिती देण्याची जबाबदारी ही विभागप्रमुख यांची राहिलेली.

आजवर ही माहिती देण्याचे काम विभागप्रमुख करीत आले आहेत. मात्र, प्रशासकीय राजवट आल्यापासून हा पायंडा बदलला असून, प्रशासन प्रमुखच सर्व माहिती देतील, ही नवीन पद्धत सुरू झाली आहे. तर झाले असे, की विभागप्रमुखांकडून वेळेत माहिती मिळत नसल्याची ओरड खालपासून वरपर्यंत सुरू झाली.

त्यावर प्रशासन प्रमुख यांनीच रोख लावल्याची सबब विभागप्रमुखांकडून पुढे केली जात आहे. यावर, प्रशासन प्रमुख यांना विचारणा झाली असता, सर्व माहिती प्रशासनाकडून दिली जाईल, त्यासाठी काम करीत असलेला कर्मचारी ही माहिती देईल, असे सांगितले.

यावर विभागांमध्ये एकच चर्चा झाली, यात एका अधिकाऱ्याने माहिती देणे अधिकाऱ्याचे काम आहे, त्यांनी दिली पाहिजे, असे सांगितले. एका कर्मचाऱ्याकडे कशी माहिती द्यायची? म्हणजे तो विभागप्रमुखांचा प्रमुख झाला का, असे काही नसते, असे सुनावले.

Girish Mahajan
SAKAL Special : चालता...बोलता...!

काय गरिबाची मज्‍जा घेता..?

नाशिककरांच्‍या तोंडी काही वाक्ये अगदी नित्‍याचीच. त्‍यापैकी एक म्‍हणजे ‘काय गरिबाची मज्‍जा घेता..?’ कुणी विकेट घ्यायला लागलं की हे वाक्‍य बोलून गप्प करण्याची संधी अनेक जण साधतात; पण कधी-कधी त्‍यातून विनोदी किस्सा खिदखिदवून हसविणारा ठरतो.

अशोक स्‍तंभ परिसरात आपल्‍या ग्रुपने जाणाऱ्या युवकांबरोबर असाच एक रंजक किस्सा घडला. झालं असं, की हे युवक मेहेर सिग्‍नलपासून अशोक स्‍तंभाच्‍या दिशेने जात होते.

त्‍यातच रिक्षावाले त्‍यांच्‍यापुढे आडवे येत ‘गंगापूर गाव आहे का भाऊ?’ अशी विचारणा करीत होते. एक-दोन वेळा दुर्लक्षित केल्‍यावर तिसऱ्यांदा मात्र ग्रुपमधील एका युवकाने मनोमनी रिक्षाचालकाची मज्‍जा घेण्याचे ठरविले.

त्‍यानुसार रिक्षाचालकाने विचारताच होकारार्थी मान हलविली. एकाच वेळी तीन-चार प्रवासी मिळाल्‍याने आता आपली रिक्षा फुल्‍ल होणार, याचा आनंद रिक्षाचालकाच्‍या चेहऱ्यावर झळकत होता.

तितक्‍यात ग्रुपमधील अन्‍य युवक म्‍हणाला, ‘नाही ओ, आम्‍हाला नाही जायचं कुठेच, याचं कुठं ऐकता..?’ तितक्‍यात ‘काय गरिबाची मज्‍जा घेता..?’ असं म्‍हणत रिक्षाचालकाने उत्तर दिले. अन्‌ रिक्षात बसलेले प्रवासी, चालक अन्‌ युवकांचा समूह सर्वांनी खिदखिदून हसताना गमतीशील किस्स्याला पूर्णविराम दिला.

Girish Mahajan
SAKAL Special: चालता-बोलता : रश्‍श्‍याने मास्तरांना पळविले...

अधिकाऱ्यांना समजले ‘एसपीजी’चे महत्त्व

‘एसपीजी’ म्हणजे स्पेशल प्रोटेक्शन ग्रुप. पंतप्रधान, राष्ट्रपती यांसारख्या अतिमहत्त्वाच्या व्यक्तींच्या दौऱ्यावेळी या ग्रुपचे महत्त्वाचे काम असते.

नुकतेच पंतप्रधान नरेंद्र मोदी नाशिक दौऱ्यावर येऊन गेले. त्यांच्या दौऱ्यानिमित्त कडेकोट सुरक्षा व्यवस्था होती. सुरक्षा व्यवस्थेचे काम ‘एसपीजी’चे होते.

‘एसपीजी’कडे स्थानिक आयोजकांनी व सरकारी यंत्रणांनी कार्यक्रमाचे नियोजन पाठविणे बंधनकारक असते. त्या वेळी वापरल्या जाणाऱ्या वस्तूंची यादीही पाठविली जाते.

पंतप्रधानांच्या दौऱ्यावेळी ते गोदापूजनाला बसणार असल्याचे निश्‍चित झाले. त्यांच्या हस्ते पूजा होणार असल्याने त्या जागेवर ‘टेबल फॅन’ ठेवण्याचे सांगण्यात आले.

अधिकाऱ्यांनी वेळेवर कसेबसे ‘फॅन’ अर्थात पंख्यांची व्यवस्था केली; परंतु ‘एसपीजी’ने ‘फॅन’ सुस्थितीत असल्याचे पत्र लिहून घेतले. एवढेच काय, पंखे सुरू करण्यासाठी वीजपुरवठा दिला जाणार असल्याने त्या सॉकेटचेही लेखी अधिकाऱ्यांकडून घेतले.

पंतप्रधान पूजेला पाण्यात उतरणार, अभिप्राय नोंदवहीत अभिप्राय नोंदविणार हेही ‘एसपीजी’ला कळविणे बंधनकारक असताना तसे कळविले गेले नाही; परंतु पंतप्रधानांनी अभिप्राय नोंदविला.

मात्र, कार्यक्रमात नोंद नसल्याने आयोजकांना लेखी देण्याची वेळ आली. त्यामुळे ‘एसपीजी’ म्हणजे काय रे भाऊ, असे अधिकाऱ्यांना विचारल्यास त्यांच्यासारखी व्याख्या ‘एसपीजी’ची कोणी करू शकत नाही.

Girish Mahajan
SAKAL Special : चालता... बोलता;..जणू ZPवर आली संक्रात!

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.