SAKAL Special : चालता... बोलता...!

Hiraman Khoskar and Narhari Zirwal
Hiraman Khoskar and Narhari Zirwalesakal
Updated on

डिसेंबरमध्ये बघतो...

आपल्या जिल्ह्यात दोनच टोपीवाले आमदार आहेत. त्यांची साधी राहणी आणि विनोदी स्वभावामुळे ते सर्वांना सुपरिचित झाले आहेत. एक विधासनभेचे उपाध्यक्ष आहेत. दुसरे जिल्ह्यातील काँग्रेसचे एकमेव आमदार.

दोघांचे पक्ष वेगवेगळे असले तरी पोशाख मात्र एकसारखा आहे. हे दोघेही आमदार सोमवारी जिल्हाधिकारी कार्यालयात पाणी आरक्षणाच्या बैठकीला उपस्थित होते. पदानुरुप झिरवाळ व्यासपीठावर तर खोसकर व्यासपीठासमोर विराजमान होते.

झिरवाळ बोलत असताना त्यांना थांबवून खोसकर मध्येच बोलायला उभे राहिले. पण पालकमंत्र्यांनी त्यांना थांबविण्याचा प्रयत्न केला. ‘अहो, अगोदर विधानसभा उपाध्यक्षांना बोलू द्या,’ अशी विनंतीही केली.

पण आमदार खोसकर थांबतील तर ना... आपले म्हणणे पुढे रेटवतच राहिले. खोसकर थांबायला तयार नसल्याचे बघून झिरवाळ त्यांना म्हणाले, ‘डिसेंबरमध्ये बघतो तुम्हाला.’ अधिवेशनात कोणाला किती बोलू द्यायचे हे माझ्याच हातात असते, असा इशाराच जणू त्यांनी दिला, आता बोला!

(SAKAL Special chalta bolta tragedy comedy political satire nashik)

ग्रामपंचायतींत कसेल आले पक्ष

गावच्या राजकारणाचे केंद्रबिंदू ग्रामपंचायत असते. ग्रामपंचायतीची निवडणूक तशी ही गावातील गट-तट, भाऊबंदकीभोवती फिरणारी असते. गावातच एकाच पक्षातील कार्यकर्त्यांचे दोन गटांत विभागणी होऊन समोरासमोर आलेले असतात.

काही ठिकाणी एकाच वाड्यात भाऊ-भाऊ, जावा-जावा एकमेकांसमोर ठाकले जातात. पक्षाचे कार्यकर्ते असल्याने नेमका कोणाला पाठिंबा द्यायचा; या गटासोबत गेल्यास समोरचा गट नाराज होतो.

त्यामुळे तालुक्याचे नेते असो की आमदार, सहसा गावाच्या राजकारणात भाग घेत नाही. एच चिन्हावर ही निवडणूक होत नसल्याने पक्षाचा फारसा संबंध येत नसतो. याच पार्श्वभूमीवर मिनी मंत्रालयातील कट्ट्यावर ग्रामपंचायत निवडणूक निकालाचे फड रंगले होते.

यात या गावात, त्यांची चांगलीच जिरविली. लई उड्या मारत होता. लोकांनी दणका दिला, बरे झाले, असे एक जण सांगत होता. त्यातील एकाने जिल्ह्यात कोणत्या पक्षाने बाजी मारली, अशी विचारणा केली.

त्यावर लागलीच समोरच्याने ग्रामपंचायत निवडणुकीत कसला आला पक्ष. येथे गट-तटावर निवडणूक होती. पक्षबिक्ष नसतो राव..., असे खाद्यांवर हात टाकत सगळे निघून गेले.

Hiraman Khoskar and Narhari Zirwal
SAKAL Special: चालता...बोलता

...तर लगेच गाडी बुक करूया!

वर्ल्डकप क्रिकेट स्‍पर्धेची सध्या सर्वत्र चर्चा आहे. स्‍पर्धेतील विजेतेपदासाठीचे दावेदार भारत व दक्षिण आफ्रिका यांच्‍यातील सामन्‍याकडे क्रीडाप्रेमींचे लक्ष होते. पण सटोड्यांचेही या सामन्‍याकडे चांगलेच लक्ष होते.

ॲपद्वारे स्‍पर्धेत सहभागी होणाऱ्या युवकांच्‍या एका समूहातील चर्चा चांगलीच रंगली होती. दोघा-तिघांनी सामने तयार केले होते अन्‌ आज आपण कोटीचे बक्षीस जिंकणारच, या तयारीने सर्वच उत्‍साही होते. बक्षीस जिंकलं की काय करायचं, यावर चर्चा सुरू झाली.

साधारणतः एक इनिंग पूर्ण झाल्‍यावर अंदाज येईल, असे सांगिल्‍यानंतर दुसरा युवक म्‍हणाला, ‘मग आपण जाऊ फोर व्‍हीलरच्‍या शोरूममध्ये. गाडी बुक करून टाकू.’

त्‍यावर तिसरा युवक म्‍हणाला, ‘‘तेव्‍हापर्यंत काही अंदाज यायचा नाही, आपण फस्‍ट इनिंग संपली की पासबुक, आधारकार्ड अन्‌ बाकी कागदपत्रं शोधायला सुरवात करू.’ या युवकांचे खयाली पुलाव शिजलेले असतानाच त्‍यांच्‍या रंजक गप्पा सभोवतालच्‍यांना खिदखिदवून हसवत होत्‍या.

थांब टकल्या भांग पाडतो..!

मराठी भाषेत एका शब्दाचे अनेक अर्थ निघतात. तो अर्थ परिस्थितीजन्य असेल, तर चटकन लक्षात येतो; अन्यथा भानगडी ठरलेल्याच. शहरात गजबजलेल्या ठिकाणी टवाळखोर एकमेकांची चेष्टामस्करी करत असताना भांगेचा विषय आला.

वर्दळीचा रस्ता असल्याने नेमके कोण कोणाला बोलले, हे लक्षात येत नाही. त्यात एकाच्या डोक्यावर केस असले, तरी त्याचे गल्लीतल्या पोरांनी ‘टकल्या’ असे नामकरण लहानपणापासूनच केले आहे.

त्यामुळे त्याला कितीही टकल्या ओरडले तरी फरक पडायचा नाही. भांगेचा विषय सुरू असताना टोळक्यातील एकाने ‘थांब टकल्या भांग पाडतो’, असा विषय काढल्यानंतर जवळूनच जाणाऱ्या डोक्यावर केस नसलेल्या टकल्याने आपल्यालाच बोलल्याचा समज करून घेतला.

त्यानंतर सुरू झालेली शिवीगाळ अर्धा तास सुरू होती. एका जाणत्याने टकल्या म्हणजे अमुक-तमुक असे सांगितल्यानंतर खरोखर टकला असलेल्या व्यक्तीचा पारा खाली आला. परंतु तोपर्यंत आपण टकले आहोत, हे उपस्थित सर्वांना समजल्याची अपराधी भावना घेऊन त्याला परतावे लागले.

Hiraman Khoskar and Narhari Zirwal
Maratha Reservation: चालता-बोलता

मार्केटिंग फंडा

कोणत्याही स्वरूपाचा व्यवसाय असो, त्यामागे मार्केटिंग ही आलीच. मार्केटिंग नसेल, तर कितीही चांगला व्यवसाय असेल तर तो यशस्वी होईलच याची कोणतीही शाश्वती देता येणार नाही.

त्यातही खवय्येगिरीचा व्यवसाय असेल तर स्पर्धाच अधिक. त्यामुळे आपल्या व्यवसायाची मार्केटिंग करण्यासाठी व्यावसायिकांकडून ना-ना क्लृप्त्या वापरल्या जातात. नाशिकची मिसळ सर्वांत फेमस अन्‌ नाशिकमध्ये स्पर्धाही खूप.

त्यामुळे शहरातच असलेल्या छोटेखानी चहाच्या व्यवसायातून एकाने मिसळ-पावचे हॉटेल सुरू केले. मार्केटिंग करण्यासाठी या व्यावसायिकाने जो फंडा वापरला तो लाजवाब असाच. आधी म्हटल्याप्रमाणे, या व्यावसायिकाचा चहाचा व्यवसाय.

त्यामुळे त्यांच्या चहाच्या दुकानात नियमित रोज येणारे ग्राहक शेकडो होते. या व्यावसायिकाने त्यांच्या मोबाईलमध्ये त्यांच्या मिसळ-पाव हॉटेलचा व्हिडिओ शूट केला. त्याचे संपादन करून काही मिनिटांची चित्रफीत तयार केली.

ही चित्रफीत मोबाईलमध्ये ते चहाच्या दुकानात येणाऱ्यांना दाखवू लागले. चहा घेण्यासाठी ग्राहक आला, की ते काउंटर सोडून त्या ग्राहकाजवळ येऊन अगदी आदबीने तो मिसळ-पावच्या त्यांच्या नवीन हॉटेलचा तो व्हिडिओ दाखवायचे.

तो दाखविताना त्यांच्या हॉटेलमध्ये असलेल्या सोयीसुविधांचीही माहिती देत. त्यामुळे तो ग्राहक खूश होऊन, काका, सुटीच्या दिवशी फॅमिलीसह येतो मिसळ-पाव खायला, असे आश्वासन द्यायचा. यासाठी या व्यावसायिकाने वापरलेल्या मार्केटिंग फंड्याला अनेकांनी दादही दिली.

Hiraman Khoskar and Narhari Zirwal
SAKAL Special: चालता- बोलता

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.