Sakal Special : चालता...बोलतो...!

उद्धव ठाकरे यांना कुरिअरच्या माध्यमातून का होईना अयोध्येतील प्राणप्रतिष्ठा सोहळ्याचे निमंत्रण आले होते.
uddhav thackeray
uddhav thackerayesakal
Updated on

उद्धव ठाकरेंना काळाराम पावणार का?

उद्धव ठाकरे यांना कुरिअरच्या माध्यमातून का होईना अयोध्येतील प्राणप्रतिष्ठा सोहळ्याचे निमंत्रण आले होते. मात्र त्यांनी आपल्या पक्षाची घडी बसविण्याच्या उद्देशाने शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या जयंती दिनी पक्षाचं राज्यस्तरीय अधिवेशन घेण्याचं ठरवलं. अधिवेशनाच्या पूर्वसंध्येला त्यांनी शहरातील काळाराम मंदिरात पूजा व आरती केली.

पक्षात उभी फूट पडल्यानंतर पक्षाची परिस्थिती सावरतानाच नेमकं त्यांनी अयोध्येच्या सोहळ्याला पाठ फिरवली, त्यामुळे आता त्यांना काळाराम पावणार का? अशी चर्चा उद्धव ठाकरेंच्या मंदिरातील आरतीवेळी मंदिराबाहेर उभ्या नागरिकांमध्ये रंगली होती.

(sakal special chalta bolta Will Uddhav Thackeray get Kalaram nashik news)

युती, आघाडी की स्वबळ...

भाजपसोबत युती, काँग्रेससोबत आघाडी असा प्रवास करताना पक्षाचचं विभाजन झाल्याने आता शिवसेनेच्या नेतृत्वाची पुढची भूमिका काय असेल, याबाबत सामान्यांना मोठ कुतूहल आहे. पक्षात उभी फूट पडल्यानंतर पक्षप्रमुख उद्धव ठाकरे नाशिकमध्ये त्यांच्या पक्षाचं राज्यस्तरीय अधिवेशन घेत आहेत.

या अधिवेशनात आम्हाला काही निर्णय घ्यावे लागतील, असं विधान संजय राऊत यांनी केलं होतं. युतीसोबत काडीमोड अन् आघाडीसोबत वाटचाल करताना पक्षाची झालेली दैना पाहताना उद्धव ठाकरे स्वबळाचा नारा देतील का? याकडे सर्वसामान्यांचं लक्ष लागलं आहे.

uddhav thackeray
Sakal Special : चालता...बोलता...! गुवाहाटीमध्ये इतिहास घडला!

नेत्याला हार घालण्यासाठी कार्यकर्त्याच्या खांद्यावर

सोमवारी दुपारी पाथर्डी गाव चौफुलीवर उद्धव आणि आदित्य ठाकरे यांच्या स्वागतासाठी मोठी गर्दी झाली होती. येथील उपविभाग प्रमुखांनी ठाकरे यांना शाल आणि पुष्पहार घालायचाच असा चंग बांधला होता. ठाकरे यांच्या वाहनांचा ताफा येथे थांबला. मात्र मोठी गर्दी असल्याने चंग बांधणारा पदाधिकारी काहीसा मागे लोटला गेला.

ठाकरेंना हार तर घालायचा, मग करायचे काय? अशा विचारात ते असताना त्यांच्याच एका कार्यकर्त्याने पदाधिकाऱ्याला थेट खांद्यावर घेण्याची शक्कल लढवली. आदित्य ठाकरे यांनी हा प्रकार बघितल्यानंतर त्यांनाही हसू आले. पदाधिकारी खांद्यावर बसूनच पुढे गेले आणि ठाकरे यांनीही पुढे झुकून त्यांचा पुष्पहार आणि शाल गळ्यात घालून घेतली. ठरवलेले काम पूर्ण झाल्याने उपस्थित सर्वांनीच मग त्यांचे अभिनंदन केले.

uddhav thackeray
Sakal Special : चालता...बोलता...!

फक्त पाहून निघून जातात...

चित्रपटात दिसणारा अभिनेता प्रत्यक्षात कसा दिसतो, हे पाहण्याची उत्सुकता त्याच्या चाहत्यांना नेहमी असते. मग तो एखाद्या गाण्यातून प्रसिद्धीझोतात आलेला गायक असला, तरी त्याची ‘क्रेझ’ तरुणांमध्ये टिकून असते. अशाच एका शॉर्टफिल्ममध्ये नायकाची भूमिका केलेला युवक अचानकपणे नायिकेच्या घरी अगदी सहज भेटीसाठी जातो.

औपचारिक गप्पा सुरू असतानाच काही मुली बाहेरून घरात यायच्या आणि दोन मिनिटांत पुन्हा निघून जायच्या. असे एक-दोनदा घडल्यावर शेवटी नायकाने हा काय प्रकार आहे म्हणून विचारले; तर नायिका म्हणाली, ‘या माझ्या मैत्रिणी आहेत आणि त्यांनी आपली शॉर्टफिल्म पाहिली आहे.’ त्यामुळे तुम्ही प्रत्यक्ष कसे दिसतात, हे पाहण्यासाठी त्या येत असल्याचा खुलासाही तिने केला. आपली ‘क्रेझ’ वाढल्याचे या नायकाच्या लक्षात आल्यावर त्यालाही हसू आले...

uddhav thackeray
SAKAL Special : चालता... बोलता;..जणू ZPवर आली संक्रात!

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.