असा अधिकारी हवा ना भाऊ...
गुरुवारी राज्यातील शासकीय कर्मचाऱ्यांनी जुन्या पेन्शन योजनेसाठी संप पुकारला. जिल्हा रुग्णालयातील वर्ग तीन व चारचे कर्मचारीही संपात सहभागी झाले होते. संप यशस्वी व्हावा आणि कर्मचाऱ्यांनी सहभागी व्हावे, यासाठी संघटनांचे पदाधिकारी परिश्रम घेत होते.
काही पदाधिकारी रुग्णालयात फिरून संपात सहभागी न होणाऱ्या कर्मचाऱ्यांवर लक्ष ठेवून होते. त्यातच शासनाने संप बेकायदेशीर ठरविल्याने अनेक कर्मचाऱ्यांसमोरही संपात सहभागी व्हावे की नाही, याबाबत पेच होता.
असाच एक कर्मचारी संपात सहभागी झालेला नसल्याचे पाहून पदाधिकाऱ्याने त्याला जाब विचारला. त्याने नकार देत, भाऊ, निवृत्त व्हायला एकच वर्ष राहिले. कशाला रेकॉर्ड खराब करता.
उद्या शासनाने काही उलटासुलटा निर्णय घेतला, तर माझं सारेच अडकून पडेल, अशी विनवणी केली. परंतु पदाधिकारी मानायला तयार नव्हता. अखेर तो पदाधिकारी त्यास मुख्य अधिकाऱ्याकडे घेऊन गेला आणि त्याला संपात सहभागी होऊ द्या म्हणून सांगू लागला.
त्यांनी तर कडीच केली. संप पुकारणारे जे मुख्य पदाधिकारी आहेत ना, ते सारे निवृत्त झालेत. त्यांना पेन्शन सुरू आहे.
तुम्ही संपावर जाण्याऐवजी त्यांना उपोषणाला बसवा ना... कशाला कामावरच्या माणसांना संपात घेता.... बिचारा पदाधिकारी खाली मान घालून त्याने काढता पाय घेतला.
रंगसंगतीचा खेळ
निसर्गाने माणसाला दोनच रंग दिले आहेत. एक सावळा आणि दुसरा गोरा. गोरा रंग असलेल्या व्यक्तींना स्वत:बद्दल फार आत्मविश्वास असतो. अशीच एक व्यक्ती (शिक्षक) स्वत:बद्दल स्तुती करत असताना त्यांच्याकडून नकळतपणे आपल्या रंगाचा उल्लेख होतो.
त्यामुळे दुखावलेले वरिष्ठ त्यांना कार्यालयात बोलवून घेतात. पण थेट रंगावर कसे बोलणार, म्हणून इकडच्या तिकडच्या गप्पा मारतात.
‘तुम्ही विद्यार्थ्यांना बसूनच शिकवता’ असा आरोप करून त्यांना यापुढे असे करू नका म्हणून सुनावतात. पण त्यांना काय माहिती वरिष्ठांनी वड्याचे तेल वांग्यावर काढले आहे म्हणून इतर शिक्षकांत मात्र याची खमंग चर्चा सुरू होती.
ते सारे एकच, आपण कशाला भांडायचे...
राजकारणात विविध पक्षाचे नेते पक्षाची भूमिका घेऊन एकमेकांवर आरोप-प्रत्यारोप करतात. काही नेते अगदीच टोकाला जाऊन टीकास्त्र सोडतात. त्यामुळे अनेकदा दोन नेत्यांमधील वाद टोकाला जाऊन कार्यकर्ते हातघाईवर येतात.
मात्र, एकमेकांना पाण्यात बघणारे हेच नेते रात्री सोबत राहतात, असे अनेकदा दिसते. प्रत्यक्षात, याचा अनुभव एका कार्यकत्यार्त्याला आली. झाले असे की, नागपूरला विधिमंडळाचे हिवाळी अधिवेशन सुरू आहे.
त्यामुळे मंत्री, लोकप्रतिनिधींचे कार्यकर्ते, समर्थक नागपूरला हजेरी लावत आहेत. यातील हेवीवेट नेत्याच्या कार्यकर्त्यांने कामानिमित्त नागपूरवारी केली. या वारीनंतर मिनी मंत्रालयात या कार्यकर्त्याने अधिवेशनातील अनुभव कथन केले.
यात कार्यकर्त्याने सांगितले, की अहो, येथे आपण म्हणतो ते एकमेकांचे लई दुश्मन आहे. एकमेकांवर टीका करतात. पण रात्र झाली की सारे एकत्र येतात. मस्त गप्पागोष्टी करता. काय सांगायचे ते चित्र तुम्हाला... त्यामुळे कशाला आपण भांडायचे चला.. चहा घेऊया.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.