SAKAL Special : Child Car मुळे तरुणांना रोजगार; खेळणीतील कारमधून शोधले उत्पन्नाचे साधन!

Working young people making a car trip for a small child
Working young people making a car trip for a small childesakal
Updated on

जुने नाशिक : सर्वत्र बेरोजगारी पसरली असताना खेळणीतील चाइल्ड कारच्या माध्यमातून स्वतःसह इतरांना रोजगार उपलब्ध करून देण्याची किमया सागर जाधव तरुणाने करून दाखवली. यामुळे तिघांच्याही कुटुंबीयांचा त्यातून उदरनिर्वाह होण्यास मदत होत आहे.

‘वाळूचे कण रगडीता तेलही गळे’ या वाक्यास सार्थक करून दाखवण्याचा प्रयत्न सागर जाधव तरुणाने केला. बेरोजगारीत जखडून न राहता. चाइल्ड कारच्या माध्यमातून स्वयंरोजगार उभा केला.

त्यातून त्याने स्वतःसाठीच रोजगार उपलब्ध करून न घेता इतर दोघांनाही रोजगार दिला. (SAKAL Special Employment for youth due to Child Car source of income invented from toy car Nashik News)

आधुनिक बॅटरीवर चालणारी चाइल्ड कार पाहून त्यातून रोजगार निर्मिती करू शकतो, अशी कल्पना त्यास सुचली. कुटुंबीयांच्या मदतीने त्याने ती कल्पना प्रत्यक्षात उतरवली. कुटुंबीयांकडून आर्थिक मदत घेत त्याने सुमारे १६ हजार रुपये किमतीची चाइल्ड कार खरेदी केली.

नागरिक तसेच पर्यटकांची गोदावरी काठावर होणाऱ्या गर्दीची संधी साधत त्याने गांधी तलाव येथे त्या कारमध्ये लहान मुलांना कारमध्ये बसून रिमोटच्या माध्यमातून चक्कर मारण्याचा व्यवसाय सुरू केला. ३०० मीटरची प्रतिचक्कर दर आकारणी केली.

काही दिवसांच्या कालावधीत व्यवसायात तेजी आली. कुटुंबीयांच्या मदतीने घेतलेल्या एक कारला नागरिकांचा मिळत गेलेल्या प्रतिसादाने तरुणाने त्यातून मिळणाऱ्या उत्पन्नावर आणखी दोन कारची खरेदी केली.

हेही वाचा : बँक खात्याला जोडलेल्या सिमकार्डबाबत बाळगा ही काळजी...

Working young people making a car trip for a small child
Onion Demand : देशांतर्गत राज्यांकडूनही कांद्याची मागणी घटली

त्यांना ऑपरेट करण्यासाठी अन्य दोघांना कामावर ठेवले. दैनंदिन ज्या प्रमाणात उत्पन्न होईल त्या प्रमाणात त्या दोघांनाही प्रतिदिन दोनशे ते अडीचशे तर शनिवार आणि रविवार अधिक गर्दी होत झाल्यास ३०० ते ४०० रोज अशा पद्धतीने कार चालवण्यासाठी असलेल्या दोघा कामगार तरुणांना महिनाकाठी सुमारे ७ ते ८ हजार पेक्षाही अधिक वेतन मिळत असते. त्यामुळे तिघांच्या कुटुंबाच्या उदरनिर्वाहासाठी त्यातून मदत होत आहे.

सापुतारा ठरला टर्निंग पॉइंट

जाधव कुटुंबीय सापुतारा येथे फिरण्यासाठी गेले होते. त्या ठिकाणी पर्यटकांचे लहान मुले चाइल्ड कारचा आनंद घेताना दिसले. ते पाहून सागरला शहरातील गंगा गोदावरी काठावरील गांधी तलावावर अशा प्रकारे व्यवसाय सुरू करता येऊ शकतो. कल्पना सुचली आणि व्यवसायाला सुरवात झाली. सापुतारा पर्यटन टर्निंग पॉइंट ठरला.

"कुटुंबाच्या उदरनिर्वाहासाठी व्यवसायाची मोठी मदत होत आहे. जिद्द असेल तर सर्व काही शक्य होऊ शकते. बॅटरी आणि इतर देखभालीसाठी तीन ते चार महिन्यात केवळ दोन हजार रुपयांचा खर्च येतो." - सागर जाधव

Working young people making a car trip for a small child
Nashik ZP News : गतिमान प्रशासनासाठी तरतुदींचा पाऊस; कर्मचाऱ्यांनाही केले खूश

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()