diwali shopping
diwali shopping

SAKAL Special: चालता... बोलता...!

Published on

टार्ली घेऊन का फिरू राहिला, भाऊ?

सध्या सगळीकडं दिवाळीचा जल्‍लोष पाहायला मिळतोय. काय बाजारपेठ अन्‌ काय मॉल, सगळीकडं ग्राहकांची तुडूंब गर्दी होतेय. शहरातील अशाच एका मॉलमध्ये घसघशीत सवलत दिली असल्‍याने ग्राहकांची तुफान गर्दी झालेली होती. गर्दी इतकी की वस्‍तू खरेदीची ट्रॉली घेऊन एका रांगेतून दुसऱ्या रांगेत जाणेही कठीण होते.

अशाच गर्दीत एक ग्राहक या रांगेतून त्‍या रांगेत कशीबशी वाट मिळवत जात होता; पण त्‍याला खरेदी करायची वस्‍तू काही सापडेना. हैराण, परेशान होऊन गर्दीतून वाट काढताना भिरभिरत्‍या नजरांनी तो वस्‍तूंचा शोध घेत होता. कुठलीही जास्‍त डिस्‍काउंटची वस्‍तू आपल्‍या नजरेतून सुटू नये, यासाठी सर्वच ग्राहक जवळपास तणावात दिसत होते.

संबंधित ग्राहकाची दोन-तीन वेळा इतर ग्राहकांशी नजरेला नजर झाली. अन्‌ त्‍याची घालमेल लक्षात आलेला ग्रामीण भागातील एक ग्राहक म्‍हणाला, ‘काय रे भाऊ, रिकामी टार्ली घेऊन का फिरू राहिला?’ त्‍याचे हे वाक्‍य ऐकून संबंधित ग्राहकासह आजूबाजूच्‍यांना काही हसू आवरले नाही. अन्‌ काही सेकंदांच्या या विनोदी किस्स्यानंतर सर्व आपापल्‍या खरेदीकडे वळाले.

diwali shopping
SAKAL Special : चालता... बोलता...!

किडकिड्या डॉनची डायरी

‘अॅंग्री यंग मॅन’ अमिताभ बच्चन यांच्या डॉन चित्रपटात प्रसिद्ध लाल डायरी असते. त्यात अनेक काळ्या धंद्यांचा चिट्टाचपाटा लिहिलेला असतो. तशीच एक लाल डायरी सध्या केटीएचएम महाविद्यालयात गाजत असून, त्या डायरीला ‘डॉन’ची डायरी संबोधले जाते.

किडकुसा असलेल्या एकाला महाविद्यालयात फारसे महत्त्व नाही; परंतु त्याच्याकडे असलेली डायरी म्हणजे प्रत्येक मुला-मुलीचा सात-बारा उताराच समजला जातो. अमूक मुलाचे अमूक मुलीबरोबर ‘अफेअर’ आहे किंवा तमूक मुलीचे तमूक मुलाबरोबर ‘अफेअर’ आहे, हे विश्वासपूर्वक समजून घेण्यासाठी त्या ‘डॉन’ला पाचारण केले जाते.

त्याच्याकडून माहिती मिळाल्यानंतरच पुढील ‘अॅक्शन’ घेतली जाते. अशा या ‘डॉन’च्या डायरीची प्रत्येक मुला-मुलीला भुरळ पडली आहे.

diwali shopping
SAKAL Special : चालता... बोलता...!

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.