SAKAL Special: व्हिडिओ एडिटिंगचा सुधारला दर्जा! नाशिकमध्ये हीट गाणी, लघुपटांचे होतेय संकलन

video editing course
video editing courseesakal
Updated on

SAKAL Special : येथील नैसर्गिक सौंदर्य चित्रपटसृष्टीला नेहमीच आकर्षित करत आले आहे. गत काही वर्षात हिंदी चित्रपटांसह मराठी चित्रपट, मालिका, लघुपट तसेच विविध गाणी चित्रफीत, रेकॉर्डिंग करण्यासाठी निर्माते, दिग्दर्शक, कलाकार यांची पावले नाशिक परिसराकडे वळली आहे.

या अनुषंगाने महत्त्वाचा असणारा व्हिडिओ एडिटिंगचा भागही नाशिकमधील विविध स्टुडिओतच उपलब्ध झाल्याने निर्माते दिग्दर्शकांना मुंबई, पुण्यामध्ये मिळणारा दर्जा नाशिकमध्ये मिळत आहे. (SAKAL Special Improved quality of video editing Compilation of hit songs short films happening in Nashik)

नाशिकमध्ये सध्या पंधरा व्यावसायिक व्हिडिओ एडिटिंगचे काम पाहत आहे. काहींनी मुंबई, पुणे या ठिकाणी व्हिडिओ एडिटिंगचे कोर्सेस करून नाशिकमध्ये स्थिरस्थावर होताना दिसत आहे.

नाशिकमध्ये टेक्नोलॉजी नसल्याने चित्रपट, मालिकांचे एडिटिंग होत नसले तरी जाहिरात, लघुपट, गाणी, डॉक्युमेंटरी आदींचे व्हिडिओ एडिटिंग स्थानिक स्तरावरच होत आहे.

यातून अनेकांना रोजगारही मिळाला असून तरुण या कामाकडे आकर्षित होत आहे. सोशल मीडियामुळे व्हिडिओ कसा असावा, त्यात नेमके काय असावे यावर विचार व्हायला लागल्याने व्हिडिओ एडिटर्सलाही महत्त्व आले आहे.

नाशिक शहरात स्टुडिओत व्हिडिओ एडिटिंगचा सेटअप असला तरी नाशिकमधील काहीजण व्हिडिओ एडिटिंग करण्यासाठी आजही पुणे, मुंबई येथे जात आहे. मुळात मोठ्या शहरांच्या दर्जाचेच नाशिकमध्ये काम होत असल्याचे येथील व्हिडिओ एडिटर सांगतात.

हेही वाचा : Credit Card फसवणूक....काय घ्याल काळजी?

video editing course
Monsoon: पावसाअभावी खरीप पेरण्या गेल्या वर्षीपेक्षा 10 टक्क्यांनी कमी; 1 हजार 300 गावे- वाड्या तहानलेल्या

खानदेशातील कलावंतांची नाशिककडे धाव

खानदेशात अहिराणी गाण्यांची मोठी चलती आहे. अहिराणी गाणी महाराष्ट्रात सुपरहिट ठरली आहे.

खानदेशात स्टुडिओ किंवा व्यावसायिक व्हिडिओ एडिटर नसल्याने विविध गाण्यांचे निर्माते, कलाकार नाशिकच्या एडिटरकडे धाव घेत आहे. मात्र दुसरीकडे नाशिकमधील कलाकार पुणे, मुंबई येथे जात असल्याची स्थिती आहे.

"नाशिकचे नैसर्गिक सौंदर्य पाहून निर्माते याठिकाणी शूटिंगसाठी येतात. मात्र टेक्निशिअनसह टेक्नॉलॉजी नसल्याने चित्रपट, मालिकांची व्हिडिओ एडिटिंग होत नाही."

-अमित कुलकर्णी, एकदंत फिल्म्स

"नाशिकही व्हिडिओ एडिटिंगसाठी प्रगत झाले आहे. मुंबई, पुण्यातून बरेचजण व्हिडिओ एडिटिंगचे कोर्सेस करून नाशिकमध्ये आले आहे. आता मुंबई, पुण्याच्या दर्जाचे काम नाशिकमध्ये होत असून आजही काही जणांचा दर्जेदार काम होत नाही असा समज असून हे दुर्दैव आहे."- महेश कावळे, व्हिडिओ एडिटर

"नाशिकमध्ये व्हिडिओ एडिटिंगसह रेकॉर्डिंग होत आहे. खानदेशातील सुपरहिट झालेली गाणी नाशिकमध्येच झाले आहे. सोशल मीडियातील विविध व्हिडिओ, डॉक्युमेंटरीने या क्षेत्राला नवा आयाम मिळाला आहे."- श्याम लोंढे, समिती प्रमुख, मराठी चित्रपट महामंडळ

video editing course
Nashik News: ‘सिव्हिल’च्या अंगणातच ‘आरोग्या’ची वाताहत! उघड्या गटारी, ढापे अन्‌ जागोजागी डबकी, चिखल

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.