SAKAL Special : राज्यात सर्वाधिक अपघाती मृत्यूमध्ये नाशिक अग्रस्थानी आहे. शहर वाहतूक विभागाकडून बेशिस्त वाहनचालकांविरोधात कारवाई करण्यासाठी प्रबोधनात्मक उपक्रमांसह दंडात्मक कारवाईही केली जाते.
असे असतानाही गेल्या ऑगस्ट महिन्यातील आकडेवारी पाहता, तब्बल २६ हजार बेशिस्त वाहन चालकांविरोधात वाहतूक नियमांचे उल्लंघन केल्याप्रकरणी केसेस करण्यात आल्या आहेत.
यात अर्थातच सर्वाधिक विनाहेल्मेट आणि सिग्नल जंपींगच्या केसेस असून, वाहतूक शाखेकडून ठोस कारवाई होत नसल्याने बेशिस्तवाहनचालकांना ‘लगाम’ बसलेला नाही. (SAKAL Special Unruly drivers have no rein Violation of traffic rules rampant in city nashik)
शहरात वाहतूक कोंडीची समस्या मोठी आहे. वाहतूक कोंडीला प्रमुख कारण बेशिस्त वाहनचालक आहेत. वाहतूक नियमांचे सर्रासपणे उल्लंघन केले जाते.
वाहतूक विभागाकडून कोंडीच्या ठिकाणी वाहतूक पोलिसांची नियुक्ती केली जाते, परंतु त्यांच्याकडून कोंडी सोडविण्याऐवजी दंडात्मक कारवाई केली जाते.
शहरातील काही पॉईंट हे वसुलीसाठी प्रसिद्ध असल्याने वाहतूक कर्मचाऱ्यांमध्ये त्या पॉईंटसाठी स्पर्धा असते. परिणामी, शहरातील वाहतुकीला शिस्त लागावी यासाठी वाहतूक शाखेकडून उपक्रमांचा फार्स केल्याचेच दिसून येते.
गेल्या ऑगस्ट २०२३ या महिनाभरातील आकडेवारी पाहता, सर्वाधिक कारवाई ही विनाहेल्मेटची आहे. सर्वाधिक अपघाती मृत्यूंमध्ये दुचाकीस्वार आणि तेही विनाहेल्मेट असल्याचेच आत्तापर्यंतच्या निरीक्षणातून समोर आलेले असतानाही दुचाकीस्वार हेल्मेटचा वापर करीत नाहीत.
वाहतूक शाखेकडूनही सक्तीची कारवाई होत नसल्याने दुचाकीस्वारांचे फावते. तसेच, सिग्नल जंपींग करण्यात लहान-मोठे सर्वच वाहनचालक पटाईत आहेत. रस्त्यावर विरुद्ध दिशेने वाहन चालविण्याचे प्रमाणही वाढलेले आहे.
महाविद्यालयीन तरुणाई ट्रिपलसीट वाहन चालवितात. अगदी, पोलिस आयुक्तालय समोरून शेकडो दुचाकीस्वार हे ट्रिपलसीट जात असताना त्यांच्यावर कारवाई होताना दिसत नाही.
ऑगस्टच्या एक महिन्यात वाहतूक शाखेने सुमारे दीड कोटींचा दंड केला असला तरी त्यातील निम्म्यापेक्षा अधिक दंड इ-चलानने केलेला असल्याने थकीत आहे.
ऑगस्ट २०२३ मधील आकडेवारी
युनिट ......विना हेल्मेट.....ट्रिपलसीट......सिग्नल जंप......नोपार्किंग......राँगसाईड.......एकूण केसेस......एकूण दंड
युनिट-१....३१३०......१२२.....११७०.....२७४.......४०१.....६५०२......३३,०६,८००
युनिट-२....३७४७....४००.....१८५६.....११५७...२२२१....१०७४४....६२,०३,०५०
युनिट-३...२५४७....८६....३७६.....७०....६३...३८६६....१९,०६,२५०
युनिट-४...१७४१...९३...२१२४...१८०...४२४....५३६०....३२,२३,८५०
एकूण : ....१११६५...७०१...५५२६...१६८१...३१०९....२६४७२...१,४६,३९,९५०
- सिग्नल रेड असतानाही दुचाकी, रिक्षाचालकांकडून जंपींग
- सिटीलिंक बसेसकडूनही सर्रास नियमांचे उल्लंघन
- स्मार्टरोडलगत सर्रारपणे वाहनांची पार्किंग
- चौकांमध्ये रिक्षाचालकांची मुजोरी
"वाहतुकीचे नियमांचे पालन करणे प्रत्येक वाहन चालकांचे कर्तव्य आहे. नियम मोडणाऱ्यां विरोधात कारवाई केली जाते. दुचाकीस्वारांनी किमान स्वत:च्या सुरक्षिततेसाठी हेल्मेटचा वापर केला पाहिजे. अपघात झाल्यास गंभीर इजा टाळता येते. वाहतूक शाखेकडून प्रबोधनात्मक उपक्रमांसह दंडात्मक कारवाईही केली जाते. ती आणखी तीव्र केली जाईल."
- चंद्रकांत खांडवी, पोलिस उपायुक्त, शहर वाहतूक विभाग.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.