SAKAL Workshop : प्रात्यक्षिकांसह जाणून घ्या व्यावसायिक मसाले बनविण्याचे तंत्र! या तारखांना मिळेल प्रशिक्षण

Indian Spices
Indian Spicesesakal
Updated on

SAKAL Workshop : घरगुती चवीचे, विविध प्रकारचे, झणझणीत कोल्हापूर स्टाइल व्यावसायिक मसाले प्रात्यक्षिकासह बनविण्यासंबंधी सविस्तर मार्गदर्शन करणारे दोन दिवसीय विशेष प्रशिक्षण १३ आणि १४ मे रोजी सकाळ- ॲग्रोवन संलग्न शैक्षणिक संस्था एसआयआयएलसीतर्फे नाशिक सातपूर सकाळ कार्यालयात आयोजिले आहे. (SAKAL Workshop Learn techniques of making commercial spices with demonstrations Training will 13 14th may nashik news)

यात सुमारे दहा प्रकारचे व्यावसायिक मसाले प्रत्यक्ष बनवून शिकविले जाणार आहेत. त्यासंबंधी नोट्सही पुरवल्या जातील. शिवाय मसाला उद्योगाला बाजारपेठेत असलेल्या विविध संधी, मसाला व्यवसाय काळाची गरज का आहे, मसाला व्यवसायाचे पॅकिंग ब्रॅण्डिंग परवाने इ. विषयी माहिती, व्यवसायाचे अर्थशास्त्र, व्यवसाय कसा सुरु करावा,

व्यवसायासाठी लागणाऱ्या मशिनरी इ. विषयी आजवर अनेक मसाला उद्योजक घडविणाऱ्या तज्ज्ञ गंधाली दिंडे या मार्गदर्शन करणार आहेत. प्रतिव्यक्ती चार हजार रुपये शुल्क आहे. एकत्रित पाच नोंदणी समूहाला दीड हजार रुपये सवलत आहे. आगाऊ नोंदणी आवश्यक आहे. नावनोंदणीसाठी संपर्क: ९२८४७७४३६३

प्रशिक्षण: १३ आणि १४ मे २०२३

वेळ: सकाळी १०.३० ते ५

शुल्क: प्रति व्यक्ती चार हजार रुपये

ठिकाण: सकाळ कार्यालय, सातपूर एमआयडीसी, त्र्यंबक रोड, नाशिक

संपर्क: ९२८४७७४३६३

हेही वाचा : संतुलित आहारातून रोखा फॅटी लिव्हरचा आजार

Indian Spices
Mahavitaran : अतिरिक्त सुरक्षा ठेवीचे बिल नियमानुसारच; 6 मासिक हप्त्यांत भरण्याची सोय

या मसाल्यांचे प्रात्यक्षिक होणार

गरम मसाला

बिर्याणी मसाला

चिकन मसाला

मटण मसाला

चाट मसाला

मिसळ मसाला

चहा मसाला

गोडा मसाला

कोल्हापुरी कांदा लसूण चटणी

काळा मसाला

Indian Spices
Dhule News : मराठी विषयाचे मूल्यमापन आता ‘श्रेणी’ स्वरूपात! मविआ’चा निर्णय शिंदे-फडणवीस सरकारने फिरविला

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.