Nashik News: सकाळे -भोसले गटात काटे की टक्कर; जिल्हा मजूर फेडरेशन अध्यक्ष, उपाध्यक्षांची आज निवड

Election News
Election Newsesakal
Updated on

नाशिक : जिल्ह्यातील ठेकेदारांच्यादृष्टीने प्रतिष्ठेचा विषय असलेल्या जिल्हा मजूर संघ फेडरेशनच्या अध्यक्ष व उपाध्यक्ष पदासाठी मंगळवारी (ता.१०) निवडणूक आहे. या निवडणुकीत माजी अध्यक्ष संपतराव सकाळे व राजेंद्र भोसले यांच्या गटात चुरस निर्माण झाली असून, काटे की टक्कर आहे.

अध्यक्ष निवडीच्या पार्श्वभूमीवर दोन्ही गटातील संचालक सहलीसाठी रवाना झाले आहेत. आमदार सुहास कांदे, त्र्यंबकेश्वर-इगतपुरीचे आमदार हिरामण खोसकर व भाजपचे जिल्हाध्यक्ष केदा आहेर यांची भूमिका देखील निर्णायक ठरणार असल्याने त्यांच्या भूमिकेकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. (Sakale vs Bhosle Group Election of District Labor Federation President Vice President today Nashik News)

जिल्हा मजूर संघाच्या २० जागांसाठी झालेल्या निवडणुकीत आठ जागा बिनविरोध झाल्यानंतर १२ जागांसाठी मतदान झाले होते. यात येवला, सिन्नर, देवळा, नाशिक, सुरगाणा, पेठ व चांदवड या ठिकाणी अत्यंत चुरशीची लढाई झाली. तर ओबीसी, एससी, एसटी व महिलांच्या दोन जागांसाठीही मतदान झाले.

निवडणुकीत पॅनल करायचा नाही, असे निश्चित झालेले असताना पॅनल निर्मिती झाली. या निवडणुकीत तीन पॅनल रिंगणात उतरले होते. आपलं पॅनलच्या मागे फेडरेशनवर वर्चस्व असलेले राजेंद्र भोसले यांनी ताकद पणाला लावली होती. तर, सहकार पॅनेलमागे संपतराव सकाळे यांनी ताकद लावली.

यात आपलं पॅनलने एक तर, सहकार पॅनलने दोन जागांवर बाजी मारली. राखीव महिला उमेदवारांना दोन्ही पॅनलचा पाठिंबा होता. निवडणुकीनंतर मात्र, सकाळे व भोसले गट कार्यरत होऊन त्यांच्याकडून जुळवाजुळव सुरू झाली. आता दोन्ही गटाकडून अध्यक्ष, उपाध्यक्षपद मिळवण्याच्यादृष्टीने प्रयत्न सुरु आहेत.

हेही वाचा : योग्य वेळेतच करा इच्छापत्र आणि व्हा चिंतामुक्त

Election News
Legislative Council Elections : नाशिक विभागीय आयुक्तांकडून विधान परिषद निवडणुकीचा आढावा

त्यासाठी दोन्ही गटाने संचालकांना गळाला लावण्याचा प्रयत्न सुरू केला आहे. दोन्ही गटाने गळाला लावलेले संचालक सहलीसाठी बाहेरगाव नेले आहेत. रात्री उशिरापर्यंत सकाळे-भोसले यांच्या गटाकडे सम-समान संचालक झाले होते.

ते तीन संचालकांची भूमिका स्पष्ट झालेले नसल्याने मंगळवारी सकाळी त्यांची भूमिका निश्चित होईल असे सांगितले जात आहे. अध्यक्ष-उपाध्यक्षपदाची निवडणूक बिनविरोध करण्याचा प्रयत्न सुरू गटाकडून सुरू आहे. त्यामुळे चुरशीच्या झालेल्या या निवडणुकीत कोण बाजी मारणार याकडे लक्ष लागून आहे.

Election News
Dhule News : मुंबई सेंट्रल ते भुसावळ प्रवासी रेल्वे सुरू

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.