Nashik News: फाळके स्मारकासाठी पालकमंत्र्यांना साकडे; NMCकडून पर्यटन विभागाच्या निधीतून 40 कोटीची मागणी

Dadasaheb Phalke Smarak, Nashik
Dadasaheb Phalke Smarak, Nashikesakal
Updated on

Nashik News : खासगीकरणातून चित्रपटमहर्षी दादासाहेब फाळके स्मारकाच्या पुनर्विकासाची योजना गुंडाळण्यात आल्यानंतर महापालिकेने पर्यटन विभागाच्या निधीतून पुर्नविकासासाठी पालकमंत्री दादा भुसे यांना साकडे घातले असून, चाळीस कोटी रुपयांचा निधी उपलब्ध करून देण्याची मागणी केली आहे. (Sake to Guardian Minister for Phalke Memorial 40 crore from NMC demand from tourism department fund Nashik News)

महापालिकेने १९९९ मध्ये पाथर्डी शिवारातील त्रिरश्मी लेण्यांच्या पायथ्याशी २९ एकर जागेत चित्रपटमहर्षी दादासाहेब फाळके स्मारकाची उभारणी केली.

सुरवातीला महापालिकेचे आर्थिक उत्पन्नाचे साधन बनलेल्या या प्रकल्पाची कालांतराने दुरवस्था होऊन प्रकल्प तोट्यात गेला. या प्रकल्पाच्या देखभाल- दुरुस्तीवर आजवर ११ कोटी रुपयांचा खर्च झाला आहे.

मात्र त्यानंतरही या प्रकल्पाची दैना कायम राहिल्याने पीपीपी तत्त्वावर अर्थात खासगीकरणातून या प्रकल्प साकारण्याचा निर्णय घेण्यात आला होता. तत्कालीन आयुक्त कैलास जाधव यांनी कल्पना मांडली होती.

यासाठी निविदा प्रक्रिया अंतिम टप्प्यात असतानाच तत्कालीन पालकमंत्री छगन भुजबळ यांनी महापालिका मुख्यालयात झालेल्या आढावा बैठकीत या खासगीकरणाच्या प्रक्रियेला विरोध दर्शवीत महापालिकेच्या माध्यमातूनच हा प्रकल्प विकसित करण्याचे निर्देश दिले.

त्यामुळे खासगीकरणाची निविदा प्रक्रिया रद्द करत स्वनिधीतून हा प्रकल्प विकसित करण्याचे नियोजन तत्कालीन आयुक्त रमेश पवार यांनी केले. पवार यांनीही हैदराबाद येथील रामोजी फिल्मसिटीच्या धर्तीवर या प्रकल्पाचा विकास करण्याचे निर्देश दिले होते.

परंतु पवार यांची बदली झाली. त्यानंतर आयुक्त डॉ. चंद्रकांत पुलकुंडवार यांनी २०२३-२४ या आर्थिक वर्षाच्या अंदाजपत्रकात रामोजी फिल्मसिटीच्या धर्तीवर या प्रकल्पाचा पुनर्विकास करण्याचा निर्णय घेतला.

हेही वाचा : Credit Card फसवणूक....काय घ्याल काळजी?

Dadasaheb Phalke Smarak, Nashik
Nashik News: शिरवाडेच्या माळरानावर बहरली वनराई; सरपंच डॉ. आवारे यांच्या मेहनतीचे फळ

त्यासाठी प्रकल्प सल्लागार नियुक्तीसाठी निविदा काढून स्वारस्य देकार मागविले. सविस्तर प्रकल्प अहवाल तयार झाल्यानंतर स्मारकाच्या पुर्नविकासासाठी प्रशासनाने पावले उचलली आहेत.

चित्रनगरी म्हणून विकास

फाळके स्मारकाचा फिल्मसिटीच्या धर्तीवर विकास करण्यासाठी महापालिकेने सुरवातीला २५ कोटी रुपयांचा निधी लागेल, असा अंदाज होता. परंतु मध्यंतरीच्या काळात वाढलेली महागाई व अन्य बाबींचा विचार करून चाळीस कोटी रुपयांचा निधी स्मारक विकासासाठी लागणार असल्याने पालकमंत्री भुसे यांच्यामार्फत पर्यटन विभागाकडे निधीची मागणी केली आहे.

पर्यटनाचा निधी व पालिकेचा स्वनिधीतून स्मारकाचा चित्रनगरी म्हणून विकास केला जाणार आहे. फिल्मसिटीच्या धर्तीवर सुविधा पुरविणे, थीम पार्क, वॉटर पार्कमधील उपकरणे, अम्युझमेंट पार्क, अॅडव्हेंचर पार्क या ठिकाणी पर्यटकांना आकर्षित करण्यासाठी तयार केला जाणार आहे.

Dadasaheb Phalke Smarak, Nashik
Nashik Monsoon Update: इगतपुरी तालुक्यात संततधार सुरूच; एकाच दिवसात 50 मिमी पावसाची नोंद!

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()