लॉकडाउन काळात 'या' कंपनीत घसघशीत वेतनवाढ! मेडिक्लेमची सुविधा

company employee
company employeeesakal
Updated on

सिडको (नाशिक) : एकीकडे लॉकडाऊनमुळे (lockdown) रोजगाराचा (employment) प्रश्न निर्माण झाला असताना अशातच मात्र 'या' कंपनीतील कामगारांना (workers) सुखावणारी बातमी आली.अंबड औद्योगिक वसाहतीतील नोवातियार इलेक्ट्रिकल ॲन्ड डिजिटल सिस्टिम प्रायव्हेट लिमिटेड लिग्रांड या कंपनीतील कामगारांचा वेतनवाढीचा करार करण्यात आला. आणखी काही सुविधा कर्मचाऱ्यांना देण्यात आल्या आहेत. (salary-increment-in-company-nashik-marathi-news)

कंपनीत वेतनवाढ! मेडिक्लेमची सुविधा

कामगारांच्या वेतनवाढीचा करारामुळे कामगारांचे वेतन दरमहा ६० हजार सातशे रुपये होईल. याव्यतिरिक्त निवृत्त झालेल्या कामगारांचाही विचार युनियन आणि व्यवस्थापनाने केला आहे. त्या कामगार कुटुंबास वयाच्या ७५ वर्षांपर्यंत मेडिक्लेमची सुविधा सुरू राहणार आहे. त्याचा प्रीमियम कंपनी भरणार आहे. यामुळे निवृत्त झालेल्या कामगारांच्या आरोग्याची काळजी युनियन व व्यवस्थापनाने घेतली आहे. याव्यतिरिक्त निवृत्त होणाऱ्या कामगारांना दुप्पट ग्रॅच्युईटी देण्याचेही निश्चित करण्यात आले.

वेतन करार : निवृत्त कर्मचाऱ्यांना पंच्याहतरीपर्यंत मेडिक्लेमची सुविधा

सध्याच्या कायद्यानुसार निवृत्त कामगारांना एक वर्षाच्या सेवेसाठी पंधरा दिवसांचा बेसिक डी. ए. याप्रमाणे ग्रॅच्युइटी दिली जाते. परंतु या करारानुसार कामगारांना एक वर्षाच्या सेवेसाठी ३० दिवसांचे बेसिक डी.ए. या दराने सेवेच्या सर्व वर्षासाठी ग्रॅच्युईटी मिळणार आहे. त्यामुळे कामगारांना निवृत्त होताना मोठी रक्कम हातात पडेल. कामगारांना टर्म लाइफ इन्शुरन्स योजना लागू करण्यात आली आहे. त्यामुळे कामगारांना वार्षिक वेतनाच्या तीनपट रक्कम मिळेल. हा करार १ जुलै २०१९ पासून तीन वर्षासाठी म्हणजे २९ जून २०२२ पर्यंत लागू राहणार आहे. वेतनवाढीच्या फरकापोटी कामगारांना सुमारे सव्वालाख रुपये प्रत्येकी मिळतील. कोरोनामुळे असुरक्षितेचे वातावरण निर्माण झालेल्या औद्योगिक परिसरात हा करार झाल्याने कामगारांनी एकच जल्लोष करीत करारचे स्वागत करीत व्यवस्थापन व संघटना पदाधिकाऱ्यांचे आभार मानले.

company employee
VIDEO : मोदी सरकार सर्वच पातळ्यांवर अपयशी - महसूलमंत्री थोरात

दर वर्षी २० टक्के बोनस

या करारानुसार कामगारांना ११ हजार ५५० रुपये वेतनवाढ मिळणार आहे. तसेच सात रुपये पर पॉइंट या दराने महागाई भत्ताही मिळणार आहे. दर वर्षी २० टक्के बोनस (सुमारे ७६ हजार रुपये) पूर्ण बेसिक डीएवर दिला जाणार आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()