जुनी शेमळी (जि. नाशिक) : जिल्ह्यात शिक्षण विभागाने एक दिवसात प्राथमिक शिक्षकांचे वेतनासाठीच धनादेश बँकेत जमा केल्यानंतरही केवळ बँक अधिकारी व कर्मचारी यांच्या ढिसाळ नियोजनामुळे बागलाण तालुक्यातील एक हजार शिक्षकांचे वेळेत वेतन जमा होत नसल्याने शिक्षकांनी बँकेच्या या कारभारावर आपला संताप व्यक्त केला आहे. ऐन सणाला अनेकांना उसने पैसे घेऊन सण साजरा करण्याची वेळ आल्याचे शिक्षकांनी सांगितले. (Salary of 1 thousand teachers of Baglan late Teachers upset with management of bank Nashik News)
बागलाण तालुक्यात एक हजाराहून अधिक प्राथमिक शिक्षक कार्यरत आहे. वेतनासाठीच धनादेश हा इतर तालुक्यात पंचायत समितीकडून बँकेत जमा केल्यानंतर तत्काळ तो वटला जाऊन शिक्षकांच्या खात्यावर वेतन अदा होते. मात्र बागलाण तालुक्यातील शिक्षकांना पंचायत समितीकडून धनादेश वेळेत अदा होऊनही एक किंवा दोन दिवस थांबण्याची वेळ सतत प्रत्येक महिन्यात येत आहे.
बागलाण तालुक्यातील या सर्व शिक्षकांचे माहे डिसेंबरच्या वेतनाचा धनादेश हा पंचायत समितीकडून बँकेत अदा केल्यानंतर तो १६ जानेवारी रोजी वटून शिक्षकांच्या खात्यावर वेतन जमा होणे अपेक्षित होते. मात्र केवळ बँकेच्या ढिसाळ नियोजन व गलथान कारभार व अपुऱ्या मनुष्यबळामुळे हे वेतन सणाला होऊ न शकल्याचा आरोप शिक्षक संघटनांनी केला आहे. दर महिन्याला केवळ बँकेच्या अशा कारभारामुळे ही परिस्थिती येत असल्याचे शिक्षकांनी सांगितले.
"बागलाण तालुक्यातील प्राथमिक शिक्षकांचे डिसेंबर महिन्याचे वेतनाचा धनादेश पंचायत समितीने एक दिवसा पूर्वी जमा करून केवळ येथील राष्ट्रीयकृत बँकेच्या नियोजन अभावी वेळेत वेतन जमा केले नाही. बँकेचा कायम असाच अनुभव दर महिन्याला येतो. यावर ठोस उपाय होणे गरजेचे आहे."-अंबादास अहिरे, जिल्हाध्यक्ष पदवीधर शिक्षक संघटना
"शिक्षकांचे वेतन का जमा झाले नाही. याविषयी बँकेत चौकशी केली असता कायम स्वरुपी व्यवस्थापक व कर्मचारी यांच्याकडून उडवाउडवीचे उतर दिले जातात."
- प्रकाश सोनवणे, जिल्हा सरचिटणीस राष्ट्रवादी शिक्षक संघटना
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.