Nashik Crime : शरीरास आवश्यक असलेल्या प्रोटीन्ससाठी बाजारात मिळणाऱ्या विविध औषधींच्या हुबेहूब बनावट औषधींची राज्यभरात विक्री करणाऱ्या टोळीचा पर्दाफाश करण्यात आला आहे.
त्यातून कळमेश्वर पोलिसांनी येथील साई लॉजिस्टिक डिस्ट्रिब्यूटर स्वप्नील बाबूराव कल्लूरवार याच्यासह नऊ जणांवर गुन्हा दाखल केला. अन्न व औषध प्रशासन विभागाचे अधिकारी नितीन भांडारकर यांनी दिलेल्या तक्रारीवरून हा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
दरम्यान, या विक्रीच्या टोळीत नाशिकच्या सिद्धिविनायक फार्माचा समावेश आहे. (Sale of fake drugs in state Crimes filed against 9 people Nashik Crime)
सय्यद मुदस्सर अली हसन (राहुरी, अहमदनगर), अमित दास (नाशिक), सागर मेडिसीन (अहमदाबाद), किशोर खिबूराम गगलाणी (दाभा, नागपूर), सुजान सुपरस्पेशिया (अमरावती), साई श्रद्धा इंटरप्रायझेस (छत्रपती संभाजीनगर), सिद्धिविनायक फार्मा आणि एका अनोळखी व्यक्तीचा समावेश आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, राहुरी येथे राहणारा सय्यद मुदस्सर अली हसन याच्यामार्फत राज्यातील अमरावती, नागपूर, नाशिक आणि छत्रपती संभाजीनगर येथे विविध औषधांची विक्री करणाऱ्या डिस्ट्रीब्यूटरच्या माध्यमातून बनावट औषधांची विक्री करण्यात आल्याची बाब अन्न व औषध प्रशासन विभागाच्या निदर्शनास आली.
त्यांनी याबाबत औषधाचे नमुने घेत, ते तपासणीसाठी पाठविले. दरम्यान, त्यातील काही माल नागपूर जिल्ह्यातील गौंडखैरी येथे असलेल्या स्वप्नील कल्लूरवार याच्या साई लॉजिस्टिक डिस्ट्रिब्यूटरकडे आल्याची माहिती समोर आली.
त्याच्याकडून हा माल पाच ते सहा औषधांच्या दुकानांत विक्रीसाठी पाठविण्यात आला. ही बाब विभागाच्या निदर्शनास येताच विभागाचे औषध निरीक्षक नितीन भांडारकर यांनी त्याची तपासणी करीत, कळमेश्वर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल केला.
हेही वाचा : Credit Card फसवणूक....काय घ्याल काळजी?
या वेळी पोलिस निरीक्षक यशवंत सोलसे यांनी गुन्हा नोंदवून आरोपींची चौकशी सुरू केली. अशाच प्रकारे अहमदनगर, अमरावती, नागपूर आणि छत्रपती संभाजीनगर येथेही पोलिसांकडून गुन्हे दाखल केले आहेत. या गुन्ह्यांतील अमित दास हा फरारी असून, त्याचा शोध पोलिस घेत आहेत.
सिद्धिविनायक फार्माची चौकशी
नाशिक येथील मुंबई नाका परिसरात असलेल्या चेतन भामरे संचलित सिद्धिविनायक फार्माच्या चौकशीसाठी अन्न व औषध प्रशासन विभागाचे पथक गेले होते.
त्यांनी साठ्याची तपासणी केली असता संबंधित उत्पादनाची काही व्हायल विक्री झाली, तर काही व्हायल संबंधितास परत केले असल्याचे दिसून आले.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.