सोयाबीनच्या 8 हजारांहून अधिक क्विंटल बियाण्याची विक्री

seeds
seedsesakal
Updated on

नाशिक : जिल्ह्यातील शेतकऱ्यांनी गेल्यावर्षी ५० हजार ६५१ क्विंटल बियाणे (Seeds) स्वतःकडील खरीपामध्ये (Kharif) वापरले. यंदाच्या खरीपासाठी ७९ हजार ३३३ क्विंटल बियाणे शेतकऱ्यांनी राखून ठेवले आहे, अशी माहिती खरीपाच्या तयारी आढाव्यावेळी देण्यात आली. प्रत्यक्षात मात्र सोयाबीनच्या ९७ हजार ८०२ हेक्टरसाठी २३ हजार ६७३ क्विंटल बियाण्याची आवश्‍यकता आहे. शिवाय जिल्ह्यात २५ हजार ६ क्विंटल बियाणे विक्रीसाठी उपलब्ध झाले असून, आतापर्यंत ८ हजार ६५ क्विंटल बियाणे शेतकऱ्यांनी विकत घेतले आहे. त्यामुळे खरीपामध्ये कृषी विभागाच्या माहितीचे काय, असा प्रश्‍न निर्माण झाला आहे. (Sale of more than 8000 quintals of soybean seeds Nashik Agriculture News)

बाजारात मका, सोयाबीन, कापसाला चांगला भाव राहिल्याने यंदाच्या खरीपात या पिकांकडे शेतकऱ्यांचा ओढा वाढेल. त्यादृष्टीने जिल्हास्तरीय यंत्रणांना तयारी करावी, अशा सूचना कृषी विभागाचे सचिव एकनाथ डवले यांनी दिली होती. कापसाचे बीटी वाणाचे प्रस्तावित क्षेत्र ४१ हजार ४१८ हेक्टर असून, त्यासाठी १ लाख ६५ हजार ५५६ पाकिटभर बियाण्यांची गरज आहे. त्यापैकी १ लाख ११ हजार ५६० पाकिटे कंपन्यांनी विक्रीसाठी उपलब्ध करून दिली आहेत. त्यातील २७ हजार १०० पाकिटांची विक्री झाली आहे. मक्याच्या २ लाख ३४ हजार ४७० हेक्टर क्षेत्रासाठी ४५ हजार ८९४ क्विंटल बियाण्यांची आवश्‍यकता आहे. त्यातील ३४ हजार ७४६ क्विंटल बियाणे विक्रीसाठी उपलब्ध झाले आहे. त्यापैकी १ हजार ८२१ क्विंटल बियाण्यांची विक्री आतापर्यंत झाली आहे. जिल्ह्यातील यंदाच्या खरीपासाठी ९६ हजार ४७ क्विंटल एकूण बियाण्यांची आवश्‍यकता असून, त्यापैकी ७९ हजार ५२७ क्विंटल बियाणे उपलब्ध झाले आहे. त्यातील १७ हजार ६९३ क्विंटल बियाणे विकले गेले.

संकरित व सुधारित बाजरीची पेरणी ७९ हजार ४०७ हेक्टरवर अपेक्षित आहे. त्यासाठी २ हजार ४०१ क्विंटल बियाण्यांची गरज आहे. प्रत्यक्षात २ हजार ९२८ क्विंटल बियाणे विक्रीसाठी बाजारात दाखल झाले आहे. त्यातील २११ क्विंटल बियाण्याची विक्री झाली. मॉन्सूनचा पाऊस वेळेवर सुरू न झाल्याने ज्वारी, मूग, उडीदचे क्षेत्र कमी होऊन बाजरी, तूर, कापसाचे क्षेत्र वाढण्याची शक्यता आहे. याच पार्श्‍वभूमीवर कंपन्यांनी बाजरीचे अधिकचे बियाणे उपलब्ध करून दिले आहे. तुरीचे ६ हजार ७३६ हेक्टरसाठी ३४५ क्विंटल बियाण्यांची गरज आहे. आता २७६ क्विंटल बाजारात दाखल झाले असून, ५५ क्विंटल बियाणे विकले गेले.

seeds
Nashik : बॅरिकेटस ठरताय चालकांसाठी डोकेदुखी

८६ हजार टन खते उपलब्ध

(आकडे टनांमध्ये दर्शवतात)

रासायनिक खत आवंटन मंजूर आता उपलब्ध खत

युरिआ १ लाख २१० २५ हजार ३७९

डीएपी २४ हजार ३२० ९ हजार २२०

एमओपी ५ हजार ७०० २ हजार १२

संमीश्र ७५ हजार ७४० ३७ हजार १९७

एसएसपी २६ हजार ८४० १२ हजार ९३

seeds
Corona Update : जिल्‍ह्यात 71 पॉझिटिव्‍ह

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()