Salher Fort : साल्हेर गावाला फलकाची प्रतिक्षा; ट्रेकिंगसाठी येणाऱ्या पर्यटकांची दिशाभूल

Salher Fort is a tourist spot.
Salher Fort is a tourist spot.esakal
Updated on

Salher Fort : बागलाण तालुक्यातील पश्चिम आदिवासी पट्ट्यातील पर्यटनस्थळ साल्हेर किल्ला ट्रेकिंगसाठी देखील प्रसिद्ध आहे. याठिकाणी सुट्टीच्या दिवसांमध्ये महाराष्ट्र राज्यासह गुजरात राज्यातून मोठ्या संख्येने पर्यटक साल्हेर किल्ल्यावर ट्रेकिंगसाठी साल्हेर किल्ल्यावर येतात.

मात्र बऱ्याच पर्यटकांची साल्हेर किल्ल्यावर जाण्यासाठी दिशादर्शक फलक कुठेच नसल्यामुळे त्यांना अक्षरशः साल्हेर मध्ये येऊन ग्रामस्थांना साल्हेर कुठे आहे अशी विचारण्याची वेळ येते.

त्यामुळे साल्हेरसह किल्ला परिसरातील सातही गावांमध्ये संबंधित विभागाने गावाचे नाव असलेले फलक तत्काळ बसवावे अशी मागणी ग्रामस्थांसह पदाधिकाऱ्यांकडून केली जात आहे. (Salher Fort Waiting for plaque to Salher village Misguided tourists coming for trekking nashik)

साल्हेर किल्ला सैर करण्यासाठी पावसाळ्यात गुजरात राज्यातून मोठ्या प्रमाणे पर्यटक येत असतात. साल्हेर किल्ला परिसरात दिशादर्शक फलक तसेच गावांना त्यांच्या नावाचे फलकच नसल्यामुळे पर्यटकांची मोठी दिशाभूल होते.

पर्यटकांना किल्ल्यावर कसं जायचं कुठून जायचं याची कुठलीच माहिती नसल्याने ते अवघड वाटेनेही किल्ल्यावर जातात. त्यामुळे किल्ल्यावर दुर्घटना घडण्याची दाट शक्यता असते.

साल्हेर ग्रामपंचायत अंतर्गत एकूण सात गाव येतात साल्हेरसह सातही गावांमध्ये गाव आहे. पण गावाच्या नावाचा फलक नसल्याने बाहेरून येणाऱ्या ग्रामस्थांना गावात येऊन गावाची विचारणा करावी लागत आहे.

त्यामुळे साल्हेर सह किल्ला परिसरात व सातही गावांमध्ये गाव फलक तत्काळ बसवण्यात यावे अशी मागणी आता ग्रामस्थांकडून केली जात आहे.

हेही वाचा : Credit Card फसवणूक....काय घ्याल काळजी?

Salher Fort is a tourist spot.
Nashik News: मालेगावच्या फळबाजारात डाळिंबाची आवक वाढली! घाऊक बाजारात 80 ते 110 रुपये किलो डाळिंबाची विक्री

"साल्हेर ग्रामपंचायत अंतर्गत एकूण सात गाव येतात. त्यागावांमध्ये अद्याप कुठल्याही प्रकारचा गाव फलक नसल्यामुळे बाहेरून येणाऱ्या पर्यटक व ग्रामस्थांना गावांमध्ये येऊन गाव कुठे आहे असे विचारण्याची वेळ येते. ही खेदाची बाब आहे. या संदर्भात ग्रामसेवकांना गावात व पर्यटनस्थळ साल्हेर गावासह किल्ला परिसरात फलक लावण्याच्या सूचना देण्यात येईल."

- राणी भोये, सरपंच साल्हेर

"साल्हेर किल्ल्यावर पर्यटकांसाठी जात असताना कोणत्याच दिशेने कुठे जायचं कसं जायचं या संदर्भात कुठल्याही प्रकारे सूचनाफलक नसल्यामुळे पर्यटकांची मोठी दिशाभूल होत आहे. त्यामुळे तत्काळ स्थानिक ग्रामपंचायत वनविभागाने लक्ष घालून ठिकठिकाणी सूचनाफलक लावावे." - समाधान वाघ ग्रामपंचायत सदस्य, निकवेल

Salher Fort is a tourist spot.
UAE Ashadhi Ekadashi: दुबईत रंगला विठूनामाचा गजर! यूएईमधील श्री गणेश मंडळ, शारजाह मंडळाचा पुढाकार

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.