Salim Kutta Dance Case: ती पार्टी भाजपाच्याच कार्यकर्त्याची; सलिम कुत्ता बडगुजर डान्सप्रकरणी खा. राऊत यांचा दावा

Salim Kutta Dance Case sanjay raut claims that dance party belongs to BJP worker nashik news
Salim Kutta Dance Case sanjay raut claims that dance party belongs to BJP worker nashik newsesakal
Updated on

Salim Kutta Dance Case : बहुचर्चित सलिम कुत्ता-सुधाकर बडगुजर डान्सपार्टी प्रकरणाला आता नवीन वळण लागले आहे.

शिवसेनेच्या उबाठा गटाचे खासदार संजय राऊत यांनी, ती पार्टी भाजपाच्याच कार्यकर्त्याने आयोजिक केल्याचा दावा करतानाच, बॉम्बस्फोटासारख्या गंभीर गुन्ह्यातील आरोपीला कोणी पॅरोल दिला याचीही सखोल चौकशी व्हायला पाहिजे अशीही मागणी खासदार राऊत यांनी केली. (Salim Kutta Dance Case sanjay raut claims that dance party belongs to BJP worker nashik news)

येत्या २२ व २३ जानेवारी रोजी नाशिकमध्ये शिवसेनेच्या उबाठा गटाचे राज्यस्तरीय महाअधिवेशन होते आहे. त्या पाशर्वभूमीवर खासदार राऊत हे नाशिकमध्ये पाहणी व नियोजन करण्यासाठी आले असता, प्रसार माध्यमांशी बोलत होते.

खा. राऊत म्हणाले, मकाऊमधील भाजपाचे प्रदेशअध्यक्ष बावणकुळे यांचा व्हिडिओ सुधाकर बडगुजर यांच्या कुटूंबियांनी काढलेला नाही. तर, भाजपाच्याच गोटातून तो आमच्यापर्यंत आलेला आहे. हे नागपूरवाल्यांना चांगले ठाऊक आहे. त्याचा त्यांनी शोध घ्यावा आणि करावी कारवाई. त्याबद्दल बडगुजर यांच्यावर कारवाईची गरज आहे. परंतु, शिवसेनेला बदनाम करण्याचे हे षडयंत्र असल्याचे ते म्हणाले.

बॉम्बस्फोटातला आरोपीला त्यावेळी पॅरोल कोणी दिला असा सवाल करीत, त्यावेळी गृहमंत्री शिवसेनेचा नव्हता. ज्या डान्सपार्टीबाबत चर्चा केली जात आहे, ती पार्टी भाजपाच्याच कार्यकर्त्याने आयोजित केली होती.

जेवायला बोलाविले असेल तर तेथे जाणे ही परंपरा असल्याचे सांगत खा. राऊत म्हणाले, ज्याने पार्टीचे आयोजन केले त्या व्यंकटेश मोरेचीही चौकशी करावी. तो आजही भाजपाचाच कार्यकर्ता असल्याचे सांगितले. यावेळी खा. राऊत यांनी व्यंकटेश मोरे याचे गृहमंत्री देवेंद्र फडणवीस व अन्य भाजपा पदाधिकार्यांसमवेतचे फोटोही दाखविले.

आमच्यासाठी पंचवटीच आयोध्या

२२ जानेवारी रोजी आयोध्येमध्ये श्रीराम मंदिराचे उद्‌घाटन सोहळ्ंयाचा मुहूर्त असला तरी आम्हालाही मुहूर्त पकडता येतो.

Salim Kutta Dance Case sanjay raut claims that dance party belongs to BJP worker nashik news
Salim Kutta Dance Case: सलिम कुत्ता- बडगुजर डान्सपार्टी ‘मे-16’ तील

त्याच दिवशी आमचे श्रीरामाच्या पदस्पर्शाने पावन झालेल्या पंचवटीत शिवसेनेचे अधिवेशन होते आहे. राम मंदिर यात्रेपासून शिवसेना जोडली गेली आहे. आमच्यासाठी पंचवटीच आयोध्या आहे.

नरेंद्र मोदी हे पंतप्रधान झाल्यानंतर आयोध्येला गेले. त्यापूर्वीपासून शिवसैनिक आणि आमचे नेते उध्दव ठाकरे आयोध्येला जात आहेत. आधी त्यांनी ज्यांच्यामुळे सत्ता उपभोगत आहेत, त्या लालकृष्ण अडवाणी यांना आमंत्रण दिलंय का? असा सवालही खा. राऊत यांनी केला.

जरांगे पाटलांना परावृत्त करावे

मराठा समाजासाठी एक माणूस सरकारकडे काही मागतो आहे, त्यासाठी त्याला वारंवार उपोषण करावे लागत असेल तर ते सरकारचे अपयश आहे. मनोज जरांगे पाटील यांच्यावर उपोषणाची वेळ येऊ नये यासाठी सरकारने त्यांना परावृत्त केले पाहिजे. उपोषणामुळे शारीरिक प्रकृती खालावते. त्यांच्यामागे कुटूंब आहे. तसेच या उपोषणामुळे मुंबईवरही अतिरिक्त ताण येऊ शकतो असेही खा. राऊत म्हणाले.

अधिवेशनाचे नियोजन

येत्या २२, २३ जानेवारी रोजी शिवसेनेचे अधिवेशन होत असून आगामी निवडणुकीचे रणशिंगच नाशिकमधून फुंकले जाणार आहे. यापूर्वीही नाशिकमधूनच रणशिंग फुंकले असता, राज्यात शिवसेनेची सत्ता आली होती. त्यामुळे याहीवेळी नाशिकमधूनच सुरुवात व्हावी अशी पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांची श्रद्धा आहे.

त्यानुसार, येथील नियोजनाबाबत आल्याचे खा. राऊत यांनी सांगितले. यावेळी माजी मंत्री सुभाष देसाई, खासदार अनिल देसाई, अरविंद सावंत, वरुण सरदेसाई यांच्यासह जिल्हाप्रमुख विजय करंजकर, महानगरप्रमुख सुधाकर बडगुजर, उपनेते सुनील बागुल, दत्ता गायकवाड, विलास शिंदे यांच्यासह पदाधिकारी उपस्थित होते.

Salim Kutta Dance Case sanjay raut claims that dance party belongs to BJP worker nashik news
Salim Kutta Dance Case: सलिम कुत्ताने गाठले पार्टीतून थेट कारागृह

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.