Salim Kutta Dance Case: सलिम कुत्ताने गाठले पार्टीतून थेट कारागृह

सलिम कुत्ता डान्सपार्टी प्रकरणात सुधाकर बडगुजर यांची गेल्या दहा दिवसांपासून शहर गुन्हेशाखेच्या युनिट एकच्या कार्यालयात चौकशी सुरू आहे.
Salim Kutta Dance Case
Salim Kutta Dance CaseEsakal
Updated on

Salim Kutta Dance Case : मुंबई बॉम्बस्फोटातील आरोपी सलिम कुत्ता याच्यासमवेतचा डान्स पार्टी व्हिडिओप्रकरणी शिवसेनेच्या उबाठा गटाचे नाशिकचे महानगरप्रमुख सुधाकर बडगुजर यांची पोलिसांकडे चौकशी सुरू आहे.

परंतु चौकशीत बडगुजर यांच्याकडून पोलिसांना समाधानकारक उत्तरे मिळालेली नाही. (Salim Kutta immediately reached Nashik Road Central Jail after dance party was over nashik news)

तर, दुसरीकडे पोलीसांनी पार्टीत उपस्थित असलेल्या साक्षीदारांचे जबाब घेतले आहे. तसेच, कारागृहाकडून आलेल्या अहवालातूनही महत्त्वाच्या घटना उघडकीस आल्या असून, २४ मे २०१६ रोजी रात्री डान्सपार्टी आटोपल्यानंतर सलिम कुत्ता याने लगेचच नाशिकरोड मध्यवर्ती कारागृह गाठले होते.

सलिम कुत्ता डान्सपार्टी प्रकरणात सुधाकर बडगुजर यांची गेल्या दहा दिवसांपासून शहर गुन्हेशाखेच्या युनिट एकच्या कार्यालयात चौकशी सुरू आहे. मात्र, या चौकशीमध्ये बडगुजर यांनी पोलिसांना डान्सपार्टी संदर्भात कोणतेही समाधानकारक उत्तरे दिलेली नाही. एवढेच नव्हे तर, पार्टीचे ठिकाण, उद्देश, सलिम कुत्ताशी झालेली ओळख अशा बहुतांशी प्रश्नांची उत्तरे बडगुजर यांनी दिलेली नाहीत. त्यामुळे पोलिसांनीही चौकशी करताना पार्टीत उपस्थित असणार्यांची चौकशी करीत जबाब नोंदविले आहेत.

त्याचप्रमाणे, नाशिकरोड मध्यवर्ती कारागृहाकडे सलिम कुत्ता याच्यासंदर्भातील २०१६ मधील माहिती मागविली होती. त्याबाबतचा अहवाल शहर गुन्हेशाखेला प्राप्त झाल्याने अनेक महत्त्वाची माहिती पोलिसांनी मिळाली आहे.

Salim Kutta Dance Case
Salim Kutta Death Fact Check: उबाठा आमदार दावा करतात त्याप्रमाणे सलीम कुत्ता खरंच मेलाय का? काय घडलंय नेमकं

त्यानुसार पोलिसांच्या तपासालाही वेग आला आहे. सलग तीन सुट्टी आल्याने बडगुजर यांची येत्या मंगळवारी (ता.२६) गुन्हेशाखेकडून चौकशी होण्याची शक्यता आहे.

पार्टीचा उद्देशाचे गुढ कायम

डान्सपार्टीबाबत सुधाकर बडगुजर यांनी एकही माहिती पोलिसांना दिलेली नाही. मात्र, कारागृह प्रशासनाचा जो अहवाल पोलिसांना मिळाला त्यावरून पोलिसांनी बहुतांशी माहिती मिळाली. सलिम कुत्ता याला २५ एप्रिल ते २५ मेपर्यंत कारागृहाने पॅरोल रजा मंजूर केली होती. तर, सुधाकर बडगुजर हे त्याचवर्षी पाच दिवस राजकीय आंदोलनाप्रकरणी पाच दिवस न्यायालयीन कोठडीत असताना मध्यवर्ती कारागृहात होते. त्यावेळी त्यांची ओळख झाली असावी अशी शक्यता आहे.

सलिम कुत्ता पॅरोलवर असताना सुधाकर बडगुजर यांच्या आप्तस्वकियांच्या आडगाव परिसरातील फार्महाऊसवर २४ मे २०१६ रोजी पार्टीचे आयोजन करण्यात आले होते. याच पार्टीतील सलिम कुत्ता व बडगुजर डान्स करीत असल्याचे व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झालेला आहे. पार्टीनंतर मध्यरात्रीच सलिम कुत्ता याने नाशिकरोड मध्यवर्ती कारागृह गाठून दाखल झाल्याच अहवालातून स्पष्ट झाले आहे. असे असले तरी अद्यापही या पार्टीमागील उद्देश काय, हा प्रश्न अनुत्तरीत असून त्याचा शोध पोलीस घेत आहेत.

Salim Kutta Dance Case
Salim Kutta Dance Case: सलिम कुत्ता- बडगुजर डान्सपार्टी ‘मे-16’ तील

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.