Nashik: संभाजीनगरचा सलमान ठरला रिव्हॉल्व्हर ऑफ ऑनरचा मानकरी! 123 व्या प्रशिक्षणार्थी उपनिरीक्षकांचा दीक्षांत सोहळा उत्साहात

सेवानिवृत्ती अपर पोलीस महासंचालक व राज्य मानवी हक्क आयोगाचे सदस्य संजय कुमार यांची यावेळी प्रमुख उपस्थिती होती.
Salman of Sambhajinagar became the winner of Revolver of Honour Convocation of 123rd Trainee Sub Inspector in full swing Nashik
Salman of Sambhajinagar became the winner of Revolver of Honour Convocation of 123rd Trainee Sub Inspector in full swing Nashikesakal
Updated on

नाशिक : त्र्यंबकरोडवरील महाराष्ट्र पोलीस अकादमीमध्ये गुलाबी थंडीच्या आल्हाददायक वातावरणामध्ये १२३ व्या प्रशिक्षणार्थी पोलीस उपनिरीक्षकांच्या तुकडीचा दीक्षांत सोहळा उत्साहात पार पडला.

यावेळी रिव्हॉल्व्हर ऑफ ऑनरचा छत्रपती संभाजीनगरचा (औरंगाबाद) सलमान शेख मानकरी ठरला. सेवानिवृत्ती अपर पोलीस महासंचालक व राज्य मानवी हक्क आयोगाचे सदस्य संजय कुमार यांची यावेळी प्रमुख उपस्थिती होती. (Salman of Sambhajinagar became the winner of Revolver of Honour Convocation of 123rd Trainee Sub Inspector in full swing Nashik)

यावेळी अकादमीचे संचालक राजेश मोर उपस्थित होते. प्रारंभी सलमान शेख हे दीक्षांत परेड संचलनाचे मुख्य कमांडर होते. त्यांच्यासमवेत पथकांचे निरीक्षण करून मुख्य अतिथी संजय कुमार मंचावर गेले.

निशाण टोळीने राष्ट्रध्वज आणि अकादमीच्या ध्वजाचे शानदार संचलन केले. त्यानंतर संचालक राजेशकुमार यांनी उपनिरीक्षकांना कर्तव्याची शपथ दिली.

प्रशिक्षणार्थी पोलीस उपनिरीक्षकांच्या १२३ व्या तुकडीच्या प्रशिक्षण सत्राला एप्रिल २०२३ मध्ये प्रारंभ झाला. या प्रशिक्षणात खात्यांतर्गत विविध जिल्ह्यातील २४६ पुरुष व ५ महिला प्रशिक्षणार्थीचा समावेश होता.

२५१ पोलीस उपनिरीक्षकांपैकी ७५ टक्के प्रशिक्षणार्थी शेतकरी कुटूंबियांतील असल्याचे अकादमीचे संचालक राजेश मोर यांनी अहवाल वाचनात सांगितले. दीक्षांत सोहळ्यासाठी प्रशिक्षणार्थींचे कुटूंबिय मोठ्या संख्येने उपस्थित होते.

संभाजीनगरचा सलमान ठरला ‘रिव्हॉल्व्हर’चा मानकरी

संभाजीनगर जिल्ह्यातील पैंठण तालुक्यातल्या आढुळ हे सलमान जहीर शेख यांचे मूळ गाव. सलमान १२३ व्या उपनिरीक्षकांच्या तुकडीचा ‘रिव्हॉल्व्हर ऑफ ऑनर’चा मानकरी ठरला.

तसेच, यशवंतराव चव्हाण गोल्ड कप ऑल राऊंड कॅडेट ऑफ द बॅचचा चषकही सलमान यानेच पटकावला.

Salman of Sambhajinagar became the winner of Revolver of Honour Convocation of 123rd Trainee Sub Inspector in full swing Nashik
Nashik News : ओझरच्या विकासकामांसाठी 3 कोटी 60 लाखांचा निधी

सर्वाधिक प्रशिक्षणार्थी शेतकरी कुटूंबियातील

१२३ व्या प्रशिक्षार्थी तुकडीत मराठवाडा - ४५, पश्चिम महाराष्ट्र - ७४, कोकण - ५१, विदर्भ - ४९ आणि उत्तर महाराष्ट्र - ३२ यांचा समावेश आहे. तुकडीतील पोलिसांचे २५ ते ४७ वर्षे वयोगट असून, त्यापैकी २०८ पदवीधर आहेत. तर, ७० टक्के पेक्षा अधिक हे शेतकरी कुटूंबियांतील आहेत.

पारितोषिक :

- मीना केशवराव झाडे ( अहिल्याबाई होळकर कप - ऑल राऊंड वूमन कॅडेट ऑफ द बॅच)

- संतोष नारायण काळोगे (बेस्ट कॅडेट इन ड्रील)

- रामचंद्र किसन बहुरे (बेस्ट कॅडेट इन शुटिंग)

- निलेश विठ्ठल तळेकर (बेस्ट कॅडेट इन आऊटडोअर)

- दीपक सयाजी रहाणे (द्वितीय, बेस्ट कॅडेट इन बॅच)

- अंकुश विठ्ठल दुधाळ (बेस्ट कॅडेट इन स्टडिज्‌ व बेस्ट कॅडेट इन लॉ)

- सलमान जहिर शेख (रिव्हॉल्व्हर ऑफ ऑनर व यशवंतराव चव्हाण गोल्ड कप ऑलराऊंड कॅडेट

Salman of Sambhajinagar became the winner of Revolver of Honour Convocation of 123rd Trainee Sub Inspector in full swing Nashik
Nashik Pre Wedding Photoshoot: मंदिरे, जुन्या वाड्यांचीही अनेकांना भुरळ! ‘प्री- वेडिंग शूट’साठी गोदाघाटाला मिळतेय पसंती

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.