Unlock Nashik : सलून, ब्यूटी पार्लर व्यवसाय ४० टक्केच सुरू

salon and beauty parlor
salon and beauty parlorGoogle
Updated on

नाशिक : कोरोनामुळे (Corona Virus) अन्य व्यवसायांप्रमाणे सलून, ब्यूटी पार्लर व्यवसाय प्रभावित झाला. उत्पन्नाचे साधन असलेल्या लग्नसराईवर अजूनही बंधन असल्यामुळे अनलॉकनंतर (Unlock) सलून (Salon), ब्यूटी पार्लर (Beauty Parlor) व्यवसाय ४० टक्केच सुरू झाला असून, उदरनिर्वाह होऊ शकेल एवढाच व्यवसाय चालू आहे. असे व्यावसायिकांचे म्हणणे आहे. (Salon, beauty parlor business decreased during the unlock)

सोशल मीडीया, दाढी-कटिंग मशिनमुळे फटका

नाशिक शहरात सलून, ब्युटी पार्लरचे साधारण एक हजार दोनशेहून अधिक व्यावसायिक आहेत. त्यात २५० मोठे दुकानदार व्यावसायिक आहेत. या सर्व व्यावसायिकांना लॉकडाउनमध्ये मोठे नुकसान सहन करावे लागले. गेल्या १५ दिवसांत ४० टक्के प्रतिसाद असून दुकानाचे भाडे, हप्ता, वीजबिल निघेल एवढाच व्यवसाय आहे. ग्राहकांच्या सुरक्षिततेसाठी डिस्पोजल टॉवेल, नॅपकिनचा वापर करावा लागत असल्यामुळे दर वाढविले होते. कोरोनाची अजूनही भीती असल्यामुळे पुरुष मंडळी घरीच दाढी करत असून, कटिंगसाठीही उशिराने येत असल्याचे चित्र आहे. सर्व नियम पाळून व्यवसाय सुरळीत झाले असले तरी ग्राहकांची प्रतीक्षा आहे. नवरदेव-नवरीचे मेकअप कसा करावा याचे सोशल माध्यमावर उपलब्ध असलेले व्हिडिओ, तसेच दाढी-कटिंग मशिनचा वाढता वापर याचाही फटका सलून, ब्यूटी पार्लर व्यवसायाला बसला आहे.

salon and beauty parlor
एकीकृत नियमावलीच्या ऑनलाइन परवानगीचा पहिला मान नाशिकला

फोनवरूनच ग्राहकांना टिप्स

सलून व्यावसायिक दुकानात हातमोजे, अ‍ॅप्रॉन आणि मास्कचा वापर करत आहे. दुकानात खुर्च्या निर्जंतूक करणे. ग्राहकांना दुकानात बसून न ठेवता त्यांना फोन करून बोलावले जात असल्यामुळे गर्दी टाळली जात आहे. ग्राहकांच्या सुरक्षिततेत भर पडली आहे. दुसरीकडे काही प्रमाणात लग्न समारंभ होत आहे. नवरदेव-नवरीचे मेकअप करताना सलून, ब्यूटी पार्लर व्यावसायिक मेकअप कसा करावा याचे फोनवरूनच टिप्स देत आहे. पूर्णवेळ व्यवसाय सुरू नसल्याने व्यावसायिकांचे नुकसान होत आहे.

ग्राहकांचा दुकानात येण्यास कंटाळा

''नाभिक व्यावसायिकांकडे सरकारने लक्ष दिले नाही. ग्राहक अजूनही दुकानात येण्यास कंटाळा करत आहे. व्यवसाय ४० टक्के सुरू आहे. कमीत-कमी लोकांमध्ये लग्नाला परवानगी असल्याने सलून, ब्यूटी पार्लर व्यावसायिकांचा व्यवसाय कमी झाला आहे.'' -नाना वाघ, शहराध्यक्ष, महाराष्ट्र नाभिक महामंडळ

''लॉकडाउननंतर ग्राहकांचा प्रतिसाद चांगला असला तरी ग्राहक कटिंगशिवाय दुसरे काहीच करत नाही. त्यात सुरक्षिततेसाठी डिस्पोजल टॉवेल, नॅपकिनचा वापर होत असल्याने खर्च वाढला आहे. त्या तुलनेत कमाई होत नसल्याने फक्त उदरनिर्वाह होऊ शकेल एव्हढाच व्यवसाय होत आहे. -अशोक ईशी, अध्यक्ष सलून असोसिएशन, नाशिक

salon and beauty parlor
पुणे विद्यापीठाच्‍या जुलै-ऑगस्‍टमध्ये ऑनलाइन उन्हाळी परीक्षा

ग्राहकांची घेतली जातेय काळजी

''ग्राहकांची काळजी घेतली जात असून, चांगला प्रतिसाद मिळतो आहे.''

-विकास पगारे, सलून व्यावसायिक

''लग्नसमारंभावरील निर्बंध अजूनही शिथिल झालेले नाही, त्यामुळे लग्नाच्या ऑर्डरची संख्या ७० ते ७५ टक्क्यांनी घटली आहे. काळजी घेऊन व्यवसाय सुरळीत झाले आहे. ज्यांना येणे शक्य नाही त्यांना फोनवरून सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे.''

- वर्षा बोराडे, ब्यूटी पार्लर व्यावसायिक.

(Salon, beauty parlor business decreased during the unlock)

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.