Founder-Editor of 'Sakal Newspaper Group' Dr. Art teacher Sanjay Jagtap drawing a portrait of Nanasaheb Parulekar.
Founder-Editor of 'Sakal Newspaper Group' Dr. Art teacher Sanjay Jagtap drawing a portrait of Nanasaheb Parulekar.esakal

Nashik News: डॉ. नानासाहेब परुळेकर यांना कुंचल्यातून रंगवंदना! कलाशिक्षक संजय जगताप यांनी रेखाटले चित्र

Published on

Nashik News : विद्यार्थ्यांसह पालक व समाजाला कलेचे महत्त्व पटविण्यासाठी, कलेच्या माध्यमातून समाजप्रबोधन करण्याच्या शुद्ध हेतूने पवननगर येथील केबीएच माध्यमिक व आरबीएच प्राथमिक विद्यालयाचे कलाशिक्षक संजय जगताप कार्य करीत आहेत.

समाजप्रबोधन करीत असताना कलेविषयी जागरूकता निर्माण करण्यासाठी ते प्रयत्नशील आहेत. कलाशिक्षक जगताप यांनी ‘सकाळ वृत्तपत्रसमूहा’चे संस्थापक-संपादक डॉ. नानासाहेब परुळेकर यांच्या जयंतीनिमित्त कुंचल्यातून आगळीवेगळी रंगवंदना अर्पण केली आहे. (Salute to dr Nanasaheb Parulekar from brush Picture drawn by art teacher Sanjay Jagtap Nashik News)

(लोकल ते ग्लोबल लेटेस्ट अपडेट मिळवा सकाळच्या व्हॉट्सअप चॅनेलवर फक्त एका क्लिकमध्ये)

इतकेच नव्हे, तर कलाशिक्षक जगताप यांनी यापूर्वी डॉ. बाबासाहेब आंबेडकर व छत्रपती शिवाजी महाराज यांची चित्रे स्वतःच्या रक्ताने रेखाटली आहेत. श्री. जगताप नेहमी चित्रांतूनही वेगवेगळ्या विषयांवर समाजजागृती करीत असतात.

ते पर्यावरणपूरक शाडूपासून गणेशमूर्ती बनविणे, कागदापासून आकाशकंदील तयार करणे असे अनेक उपक्रम शाळेत घेतात. ‘चिमणी वाचवा’ विषयावर अनेक वेगवेगळ्या भावमुद्रांतून त्यांनी चित्रे रेखाटली आहेत. त्याचप्रमाणे ‘वाघ वाचवा’ विषयावर वाघांच्या वेगवेगळ्या भावमुद्रांतून वाघाचे महत्त्व चित्रांतून दाखविले.

हेही वाचा : Credit Card फसवणूक....काय घ्याल काळजी?

Founder-Editor of 'Sakal Newspaper Group' Dr. Art teacher Sanjay Jagtap drawing a portrait of Nanasaheb Parulekar.
Inspirational News: सुई-दोरा बनला चांदवडच्या सुनंदाताईंच्या कुटुंबाचा आधार!

महापुरुष, क्रांतिकारक, समाजसुधारक, राष्ट्रीय नेते यांची मोठ्या प्रमाणात चित्रे रेखाटली आहेत. खडू शिल्पातून त्यांनी बुद्ध मूर्ती, नवरात्रोत्सवात नऊ देवींचे वेगवेगळे रूप, गणेश, वारली, एड्स प्रबोधन या विषयांवर चित्रे रेखाटली आहेत.

"विद्यार्थ्यांना व समाजाला कलेचे महत्त्व कळावे, तसेच कलेच्या माध्यमातून अंधश्रद्धा, पर्यावरण, सामाजिक प्रबोधनात्मक काम करण्याचा उद्देश यामागे आहे. कला क्षेत्रातही मोठे व्यासपीठ आहे. यामुळे इतर शिक्षणाबरोबर कला विषयासही महत्त्व द्यायला हवे."

- संजय जगताप, कलाशिक्षक

Founder-Editor of 'Sakal Newspaper Group' Dr. Art teacher Sanjay Jagtap drawing a portrait of Nanasaheb Parulekar.
Festival Unity: विसर्जनाच्या दुसऱ्या दिवशी ‘ईद मिलाद’ मिरवणूक! सलोख्याचे दर्शन; एकमेकांच्या मिरवणुकीचे स्वागत

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.