Samagra Shikasha Abhiyan : जिल्हा परिषद शाळांमध्ये पटनोंदणी पंधरवडा! आशिमा मित्तल यांचे आदेश

samagra Shiksha Abhiyan
samagra Shiksha Abhiyanesakal
Updated on

Samagra Shikasha Abhiyan : शालेय शिक्षण विभागाच्या सूचनांनुसार समग्र शिक्षा अभियानांतर्गत नाशिक जिल्ह्यातील जिल्हा परिषदेच्या सर्व शाळांमध्ये येत्या १५ ते ३० जून या कालावधीत ६ ते १४ वयोगटातील सर्व मुलांना शाळेत दाखल करण्यासाठी पटनोंदणी पंधरवडा राबविण्यात येणार आहे.

या काळात सर्व शाळांमध्ये नवागतांचा प्रवोशोत्सवही साजरा करण्यात येणार आहे. (Samagra Shikasha Abhiyan Registration fortnight in Zilla Parishad schools Order by Ashima Mittal nashik)

नाशिक जिल्ह्यात प्रत्येक तालुक्यामध्ये पटनोंदणी व शाळा प्रवेशोत्सव उपक्रम राबविण्यात येणार असून, शाळेचा पहिलाच दिवस पुस्तक दिनाने साजरा करण्याबाबत आदेश देण्यात आले आहेत. जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी आशिमा मित्तल यांनी सर्व गटविकास अधिकारी व गटशिक्षणाधिकाऱ्यांना कार्यक्रम घेण्याचे निर्देश दिले आहेत.

तालुकास्तरीय सर्व खातेप्रमुख व अधिकारी यांना शाळा वाटप करून संपर्क अधिकाऱ्यांच्या नियुक्त्याही करण्यात आल्या असून जिल्हा व तालुकास्तरावर संपर्क दौरे करण्यात येणार आहेत.

असा असेल कार्यक्रम

१५ जूनला शाळा प्रवेश दिंडी, शाळा व्यवस्थापन समितीची बैठक, पालक-शिक्षक समिती बैठक, नवागतांचे स्वागत, मोफत पाठ्यपुस्तके वितरित करणे, मोफत गणवेश वाटप बाबतचा आढावा घेण्यात येणार आहे.

१५ ते २५ जून या कालावधीत शाळा प्रवेशासाठी पटनोंदणी पंधरवडा कार्यक्रमाचे शिबिर, २५ जूनला गावात शाळाबाह्य मुलांच्या भेटी घेणे, २५ ते ३० जून या कालावधीत प्रत्यक्ष पालकांच्या भेटी घेऊन मुलांना शाळेत प्रवेशित करून १ जुलैला पटनोंदणी पंधरवड्यात केलेल्या कार्यवाहीबाबत माहिती जिल्हास्तरावर सादर करण्याच्या सूचना मुख्य कार्यकारी अधिकारी आशिमा मित्तल यांनी सर्व गटशिक्षणाधिकाऱ्यांना केल्या आहेत.

हेही वाचा : Credit Card फसवणूक....काय घ्याल काळजी?

samagra Shiksha Abhiyan
Nashik News: मालेगावात प्रशिक्षणाच्या नावाखाली धार्मिक प्रचार! हिंदुत्ववादी कार्यकर्त्यांची धाव

पहिल्या दिवशी होणार जागर

नव्या सत्रातील शाळेच्या पहिल्या दिवशी देशभक्तिपर गीते, प्रभातफेरी, प्रवेशपात्र विद्यार्थ्यांची नावे लाऊड स्पीकरवर घोषित करण्यात येणार आहे. तसेच वर्षभर शंभर टक्के उपस्थिती ठेवण्यासाठी करावयाच्या प्रयत्नांची माहिती, एकही विद्यार्थी शाळेबाहेर राहणार नाही, याविषयी प्रतिज्ञा देण्यात येणार आहे.

वर्ग खोल्या होणार सुशोभित

शाळेचा प्रारंभ चैतन्यमय आणि उत्साहवर्धक झाल्यास शिक्षण क्षेत्रातील गुणात्मक वाटचालीसाठी गती मिळते ही वस्तुस्थिती लक्षात घेऊन शाळा प्रवेशोत्सव साजरा करण्यात येणार आहे. विद्यार्थी शाळेत येताच त्याला प्रसन्न वाटावे यासाठी शाळा सजावटीवर भर देण्यात येणार आहे. यासाठी शाळा परिसर स्वच्छ करून वर्ग खोल्या सुशोभित करण्यात येणार आहे.

"शाळा प्रवेशोत्सव सोहळ्यामुळे शैक्षणिक वातावरणात चैतन्य निर्माण होऊन लहान मुलांना आनंद होतो. यामुळे शाळेची गोडी लागते व भीती दूर होण्यास मदत होते. नाशिक जिल्ह्यातील सर्व शाळांमध्ये हा सोहळा साजरा करण्याच्या सूचना १५ तालुक्यातील गटविकास अधिकारी व गटशिक्षणाधिकारी यांच्या मार्फत संबंधित शाळांच्या सर्व शाळाप्रमुख व मुख्याध्यापकांना देण्यात आल्या आहेत." -आशिमा मित्तल, मुख्य कार्यकारी अधिकारी, जिल्हा परिषद नाशिक

samagra Shiksha Abhiyan
Gharkul Yojana Scam : घरकुल योजनेत जुनेच घर दाखवून अनुदानही लाटले; अनियमिततेची चौकशी सुरू

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.