College Teacher Election : कॉलेज टीचर्स सोसायटीवर समर्थ सेवक पॅनेलचा झेंडा

Candidates jubilating after winning the District College Teachers' Cooperative Credit Union elections.
Candidates jubilating after winning the District College Teachers' Cooperative Credit Union elections. esakal
Updated on

Nashik News : येथील नाशिक जिल्हा कॉलेज टीचर्स सहकारी पतसंस्थेची निवडणूक काल (ता.२४) पार पडली. निवडणुकीत मविप्र संस्थेचे शिक्षणाधिकारी व समाजकार्य महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. विलास देशमुख यांच्या नेतृत्वाखालील समर्थ सेवक पॅनेलने बाजी मारली आहे. (Samarth Sevak Panel wins College Teachers Society election)

गेल्‍या २२ वर्षांपासून पतसंस्‍थेवर वर्चस्‍व राखलेल्‍या प्रा. नानासाहेब दाते यांच्‍या पॅनेलला चार जागांवर समाधान मानावे लागले.

या निवडणुकीत प्राचार्य डॉ. देखमुख यांचे समर्थ सेवक पॅनेल आणि प्रा. नानासाहेब दाते यांच्या मार्गदर्शनाखाली समर्थ पॅनेल यांच्‍यात लढत होती. समर्थ सेवक पॅनलचे सर्वसाधारण गटात चार उमेदवार कमी असल्याने एकूण तेरा उमेदवार रिंगणात होते. डॉ. देशमुख यांच्या नेतृत्वाखालील समर्थ सेवक पॅनेलच्या उमेदवारांनी सर्व १३ जागांवर यश मिळविले आहे. प्रा. नानासाहेब दाते यांचे पॅनेलचे ४ उमेदवार विजयी झाले.

हेही वाचा : Credit Card फसवणूक....काय घ्याल काळजी?

Candidates jubilating after winning the District College Teachers' Cooperative Credit Union elections.
NMC Recruitment : जुलै महिन्यात नोकरभरतीचा बार; ‘TCS’ मार्फत होणार भरती

प्राचार्य डॉ. विलास देशमुख यांनी निवडणुकीत सर्वाधिक मते घेऊन विजय मिळविला. माघारीच्या दिवशी समर्थ पॅनेलने उमेदवारी न दिल्याने शेवटच्या अर्ध्या तासात समर्थ सेवक पॅनेलची निर्मिती करण्यात आली होती.

समर्थ सेवक पॅनलला प्राचार्य संजय बोरस्ते, ज्ञानदेव जाधव, बाबा तिडके, मुन्ना कोकाटे, प्रा.विष्णुपंत सोनवणे, प्रा.किरण रेडगावकर, प्रा. निरंजन जाधव यांचे सहकार्य लाभले.

विजयी उमदेवार खालीलप्रमाणे - (कंसात मिळालेली मते)

प्रा. डॉ. विलास देशमुख (९१२), प्रा. महेश वाघ (८६६), ज्ञानेश्वर सोनवणे (८३९), प्रा. राजेंद्र पाटील (८१३), मोहन धारराव (७८९), बाळू टर्ले (७८५), डॉ. जितेंद्र कोडीलकर (७७२), कैलास बोरसे (७५०). इतर मागास प्रवर्ग गटात संतोष मोगल (८३६), भटके विमुक्त गटात डॉ. अशोक बोडके (८३१),

अनुसूचित जाती/जमाती गटात डॉ. राजेंद्र घोलप (८१०), महिला राखीव गटात प्रा. वैशाली कोकाटे (८२५), डॉ. आशा कदम (७४६) या तेरा उमेदवारांची निवड झाली. सत्ताधारी गटाला सर्वसाधारण गटात चार जागा मिळाल्या. यातून अण्णा टर्ले (८११), अविनाथ कदम (७३१), अशोक बाजारे (७२६), डॉ. नंदकुमार काळे (७१९) यांचा विजय झाला.

Candidates jubilating after winning the District College Teachers' Cooperative Credit Union elections.
Sakal Exclusive : महापालिकेच्या शाळांमध्ये वॉटर बेल; विद्यार्थ्यांना आजारापासून वाचविण्यासाठी उपक्रम

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.