Sambhajiraje Chhatrapati : स्वराज्य भवनातून समाजकारणाचे काम; संभाजीराजे छत्रपती यांचे आश्वासन

Sambhajiraje Chhatrapati
Sambhajiraje Chhatrapatiesakal
Updated on

Sambhajiraje Chhatrapati : स्वराज्य पक्षाचे उत्तर महाराष्ट्रातील कार्यालय हे सर्वसामान्यांचे प्रश्न सोडविण्यासाठी असून, येथे आलेल्या प्रत्येक व्यक्तीच्या चेहऱ्यावर विश्वास निर्माण होईल, असे काम होईल, अशी अपेक्षा स्वराज्य पक्षाचे प्रमुख संभाजीराजे छत्रपती यांनी व्यक्त केले.

मुंबई नाका येथे स्वराज्य पक्षाच्या उत्तर महाराष्ट्र विभागीय कार्यालयाचा लोकार्पण सोहळा शनिवारी (ता. ९) पार पडला. यानंतर तुपसाखरे लॉन्समध्ये पदाधिकारी व कार्यकर्त्यांचा मेळावा झाला.

या वेळी बोलताना संभाजीराजे छत्रपती म्हणाले, की स्वराज्य पक्षाची संघटना स्थापन झाल्यावर लोकांचा प्रतिसाद मिळाला. (Sambhaji Raje Chhatrapati promise of social work from Swaraj Bhawan nashik news)

इतर राजकीय पक्षांपेक्षा काहीतरी नवीन देण्याची व नवा विचार मांडणारे व्यासपीठ निर्माण झाल्याने त्या व्यासपीठाचे पक्षात रूपांतर करण्याचा निर्णय घेतला. छत्रपती शिवाजी महाराज यांनी अठरापगड जातींना बरोबर घेऊन स्वराज्याची स्थापना केली. तोच विचार स्वराज्य पक्षाच्या माध्यमातून अमलात आणण्याचे ध्येय डोळ्यांसमोर ठेवून वाटचाल करीत आहोत.

स्वराज्य पक्षाच्या माध्यमातून सर्वांचे प्रश्न सोडवायचे आहेत. स्वराज्य भवनातून समाजाचे काम होईल, लोकांचे प्रश्न सोडविले जातील, न्यायाची भूमिका घेतली जाईल. प्रत्येकाला स्वराज्य पक्षाच्या कार्यालयात आल्यावर विश्वास निर्माण व्हावा, असे काम करावे, अशा सूचना संभाजीराजे छत्रपती यांनी दिल्या.

राज्य संपर्कप्रमुख करण गायकर, सरचिटणीस धनंजय जाधव, विनोद साबळे, केशव गोसावी, मनोरमा पाटील, गुंडाप्पा देवकर, शिवाजी मोरे, संजय पवार, जिल्हाप्रमुख डॉ. रूपेश नाठे, विजय वाहुळे, गणेश कडू, पुष्पा जगताप आदींनी या वेळी भाषणे केली.

हेही वाचा : Credit Card फसवणूक....काय घ्याल काळजी?

Sambhajiraje Chhatrapati
Sambhajiraje Chhatrapati : ‘त्‍यांना’ महाराष्ट्रात राहण्याचा अधिकार नाही : संभाजीराजे छत्रपती

भावना व न्यायाचा समेट

मराठा समाजाला आरक्षण मिळावे, यासाठी उपोषणास बसलेले मनोज जरांगे-पाटील यांच्यावर बोलताना संभाजीराजे छत्रपती म्हणाले, की भावना व न्याय या दोन्हींचा समेट होणे महत्त्वाचे आहे. जरांगे-पाटील यांनी त्यांची तब्येत सांभाळावी. त्यांच्या सहकाऱ्यांशी बोलून पुढे कसे जाता येईल, याबाबत चर्चा करावी.

सरकारने आरक्षण देताना टिकणारे आरक्षण दिले पाहिजे, असे ते म्हणाले. स्वराज्य भवन उद्‌घाटनप्रसंगी बॅनरवर भावी मुख्यमंत्री म्हणून राजेंचा उल्लेख करण्यात आला होता. त्यावर बोलताना लिहिणे व होणे या दोन्ही गोष्टी वेगळ्या असल्याची टिपण्णी त्यांनी केली.

Sambhajiraje Chhatrapati
Sambhajiraje Chhatrapati: संभाजीराजे छत्रपती यांचा भावी 'मुख्यमंत्री' म्हणून उल्लेख! स्वराज्यची राजकीय योजना काय?

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.