Sambhajiraje Chhatrapati : शेतकरी त्रस्त, कृषिमंत्री उत्तर सभेत व्यस्त! संभाजीराजे छत्रपतींची धनंजय मुंडेंवर टीका

Sambhajiraje Chhatrapati
Sambhajiraje Chhatrapatiesakal
Updated on

Sambhajiraje Chhatrapati : पावसाअभावी शेतमालाला भाव नसल्याने शेतकरी त्रस्त असून, आत्महत्या वाढत आहेत. राज्यात बीड जिल्ह्यात आत्महत्यांचे सर्वाधिक प्रमाण आहे.

मात्र त्याच जिल्ह्यातील कृषिमंत्री धनंजय मुंडे उत्तर सभा घेण्यात व्यस्त आहेत,, अशी टीका स्वराज्य पक्षाचे प्रमुख संभाजीराजे छत्रपती यांनी सोमवारी (ता. ११) येथे केली (Sambhaji Raje Chhatrapati statement about Agriculture Minister Dhananjay Munde nashik news)

पक्ष विस्तारानिमित्त संभाजीराजे छत्रपती नाशिक दौऱ्यावर आहेत. सोमवारी त्यांनी माध्यमांशी संवाद साधला. ते म्हणाले, की ब्रिटिशांच्या कार्यकाळात तयार केलेले कृषी धोरण आजही अस्तित्वात आहे. यात अजिबात बदल झालेला नाही. सरकारने यासंदर्भात दीर्घकालीन धोरण अमलात आणायला हवे.

मात्र सध्या राजकारण सुरू आहे. लोकांना राजकारणात कुठलाही रस नाही, त्यांची कामे होणे गरजेचे आहे. शेतकरी आत्महत्या रोखण्याचे सध्याचे आव्हान आहे.

हेही वाचा : Credit Card फसवणूक....काय घ्याल काळजी?

Sambhajiraje Chhatrapati
Sambhajiraje Chhatrapati: संभाजीराजे छत्रपती यांचा भावी 'मुख्यमंत्री' म्हणून उल्लेख! स्वराज्यची राजकीय योजना काय?

मराठा आरक्षणासंदर्भात सरकारने बैठकीसाठी सर्वपक्षीय नेत्यांना बोलावलं, याचे स्वागत आहे. भावना व न्याय भूमिका यांचा समन्वय साधावा, अशी अपेक्षा आहे.

मनोज जरांगे-पाटील यांच्यासोबत मराठा समाज उभा आहे. गरीब मराठा समाजाला बाहेर का ठेवलं, या सरकारने दीड वर्षात भूमिका घेतली नाही, ही बाब दुर्दैवी आहे.

मागच्या सरकारला आणि सध्या अस्तित्वात असलेल्या सरकारलाही आम्ही जाब विचारणार असल्याचे त्यांनी सांगितले. काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांच्या वक्तव्यावर त्यांनी बोलणे टाळले.

Sambhajiraje Chhatrapati
Sambhajiraje Chhatrapati : स्वराज्य भवनातून समाजकारणाचे काम; संभाजीराजे छत्रपती यांचे आश्वासन

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()