Sambhaji Raje : इतिहास, संस्कृती धार्मिक पर्यटनाने नाशिकला महत्त्व : संभाजीराजे

Sambhaji Raje Bhosle
Sambhaji Raje Bhosle Esakal
Updated on

नाशिक रोड (जि. नाशिक) : नाशिकला इतिहास, संस्कृती, धार्मिक पर्यटन व पर्यावरणाला प्रचंड महत्त्व आहे. नाशिकची (Nashik) कोल्हापूर स्पर्धा करावी इतके नाशिकला महत्त्व आहे.

महाराष्ट्राच्या प्रत्येक जिल्ह्यात जाऊन मी लोकांशी बोलत असून, त्यांच्या सूचना मार्गदर्शन जाणून घेत आहे. असे प्रतिपादन संभाजीराजे छत्रपती यांनी केले. (Sambhaji Raje Chhatrapati statement about importance nashik news)

नाशिक- त्र्यंबकेश्वर रोडवर ग्रेप काउंटिंग हॉटेल येथे संभाजीराजे छत्रपती यांच्या वाढदिवसानिमित्त कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता.

या वेळी नाशिक येथील साहित्य- कला, सांस्कृतिक, वैद्यकीय, शिक्षण, सहकार, राजकारण, अर्थकारण, समाजकारण, कृषी उद्योग यासंबंधी विविध तज्ञांनी महाराष्ट्राच्या दशा आणि दिशेवर विचार मंथन केले. या वेळी प्रसिद्ध डॉ. अतुल वडगावकर यांनी सांगितले, की भविष्यात निसर्ग पाहण्यासाठी झगडावे लागणार आहे.

माणसाला जाणण्यासाठी झाडे तोडावी लागत आहे. यावर पर्यायी यंत्रणा उभी करायला हवी. माजी महापौर प्रकाश मते म्हणाले, की शिक्षण, रोजगार शेती या विषयांवर गांभीर्याने लक्ष द्यायला हवे. राजकारणात स्वार्थ आणि तरुणांचा दुरुपयोग चालला आहे. मानसोपचार तज्ञ डॉ. शैलेंद्र गायकवाड यांनी म्हणाले, की ऑनलाइन जुगार खेळले जात आहेत.

हेही वाचा : संतुलित आहारातून रोखा फॅटी लिव्हरचा आजार

Sambhaji Raje Bhosle
MSEDCL : राजपूर पांडे फाट्यावर शेतकऱ्यांचा रास्ता रोको; गलथान कारभाराविरोधात रोष

चांगल्या घरातले लोक याला बळी पडून करोडो रुपये हरत आहे. कृषीतज्ज्ञ सुरेश कळमकर यांनी सांगितले, की सेंद्रिय शेतीला मोल मिळण्यासाठी झगडले पाहिजे. नाशिकचे सहाय्यक धर्मदाय आयुक्त रामानंद लिप्ते यांनी सांगितले, की गडकिल्ले संवर्धनासाठी स्वयंसेवी संस्थांना शासन व्यवस्थेने आवाहन करायला हवे.

शिक्षण संस्थांना गडकिल्ले विविध शैक्षणिक योजनेतून दत्तक द्यायला हवेत. या वेळी सपकाळ नॉलेज हबचे रवींद्र सपकाळ, उद्योजक मयूर शहाणे, साहित्यिक डॉ. भास्कर ढोके, डॉ. शंकर बोऱ्हाडे, जयप्रकाश जातेगावकर, कॉ. राजू देसले, उद्योजक किरण चव्हाण, दुर्ग अभ्यास रमेश पडवळ, ज्येष्ठ पत्रकार किरण लोखंडे, जयप्रकाश पवार, संपत देवगिरे यांच्यासह विविध क्षेत्रातील मान्यवर उपस्थित होते.

नाशिकला वैविध्यपूर्ण संधी : डॉ. रनाळकर

‘सकाळ’ उत्तर महाराष्ट्र आवृत्तीचे संपादक डॉ. राहुल रनाळकर म्हणाले, की नाशिकला वैविध्य प्रकारच्या संधी आहेत. करिअर संधी निर्माण व्हायला हवी. उद्योग नाशिकला आल्यास मुंबई पुण्याला जाण्याची गरज नाही.

नाशिक ज्येष्ठ नागरिकांची शहर म्हणून ओळखले जात आहे. वेलनेस हबसह फार्मासिटिकल हबसाठी नाशिक ओळखलेले जात असताना नाशिकच्या विमानसेवा सातत्याने सुरू राहायला हव्यात. चांगले नेतृत्वाचा अभाव असून सर्वसमावेशक नेतृत्व नाशिकला हवे आहे.

Sambhaji Raje Bhosle
Onion Rate : रस्त्यावर कांदे फेकत शेतकऱ्यांचा रास्तारोको

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.